स्तोत्र
३३ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंदाने जयजयकार करा!+
सरळ मनाच्या लोकांनी त्याची स्तुती करणं योग्य आहे.
३ कुशलपणे वाद्य वाजवून, आनंदाने जल्लोष करत
त्याच्यासाठी एक नवीन गीत गा.+
४ कारण यहोवाचा शब्द खरा आहे,+
आणि त्याची सर्व कार्यं भरवशालायक आहेत.
५ न्याय आणि नीती त्याला प्रिय आहेत.+
सबंध पृथ्वी यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाने भरलेली आहे.+
७ बांध घालून अडवावं, तसं तो महासागरांचं पाणी अडवतो;+
तो उसळतं पाणी कोठारांत साठवतो.
८ पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी यहोवाचं भय मानावं.+
जगातल्या रहिवाशांनी त्याचा धाक बाळगावा.
११ पण यहोवाचे निर्णय सर्वकाळ टिकून राहतील;+
त्याच्या मनातले विचार पिढ्या न् पिढ्या कायम राहतात.
१२ ज्या राष्ट्राचा देव यहोवा आहे;
ज्या लोकांना त्याने आपली संपत्ती म्हणून निवडलंय, ते सुखी आहेत!+
१३ यहोवा स्वर्गातून खाली पाहतो;
तो सर्व माणसांना न्याहाळतो.+
१४ आपल्या निवासस्थानातून,
तो पृथ्वीच्या रहिवाशांना पाहतो.
१५ तोच सर्वांचं हृदय घडवतो;
तो त्यांच्या सर्व कार्यांचं परीक्षण करतो.+
१७ विजय मिळवण्यासाठी* घोड्यावर भरवसा ठेवणं व्यर्थ आहे;+
त्याची प्रचंड ताकद सुटकेची खातरी देऊ शकत नाही.
२० आमचे डोळे यहोवाकडे लागले आहेत.
तोच आमचा सहायक आणि आमची ढाल आहे.+
२१ आमच्या मनाला त्याच्यामुळे आनंद होतो,
कारण आम्ही त्याच्या पवित्र नावावर भरवसा ठेवतो.+
२२ हे यहोवा, आम्ही तुझी वाट पाहत आहोत.+
तू नेहमी आमच्यावर एकनिष्ठ प्रेम करत राहा.+