स्तोत्र
देवाच्या पवित्र मंदिरातून त्याची स्तुती करा.+
त्याच्या सामर्थ्याची साक्ष देणाऱ्या आकाशाखाली, त्याची स्तुती करा.+
२ त्याच्या पराक्रमांबद्दल त्याची स्तुती करा.+
त्याच्या असीम वैभवाबद्दल त्याची स्तुती करा.+
३ शिंग फुंकून त्याची स्तुती करा.+
तंतुवाद्य आणि वीणा* वाजवून त्याची स्तुती करा.+
४ डफ+ वाजवून आणि फेर धरून नाचत त्याची स्तुती करा.
तंतुवाद्यं+ आणि बासरी+ वाजवून त्याची स्तुती करा.
५ खणखणत्या झांजांनी त्याची स्तुती करा.
झणझणत्या झांजांनी त्याची स्तुती करा.+
६ श्वास घेणारा प्रत्येक जीव याहची स्तुती करो.