स्तोत्र
दावीदचं गीत.
तुझ्या विश्वासूपणामुळे आणि नीतिमत्त्वामुळे मला उत्तर दे.
२ तुझ्या या सेवकाला तुझ्या न्यायासनापुढे आणू नकोस,
कारण कोणीही जिवंत माणूस तुझ्यासमोर नीतिमान ठरू शकत नाही.+
३ शत्रू माझा पाठलाग करतोय;
त्याने मला पायांखाली तुडवून धुळीला मिळवलंय.
फार पूर्वी मेलेल्या लोकांसारखं, त्याने मला अंधारात राहायला लावलंय.
५ मला पूर्वीचे दिवस आठवतात;
मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन* करतो;+
तुझ्या हाताच्या कार्यांबद्दल मी विचार करतो.
६ मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो;
कोरड्या पडलेल्या जमिनीसारखा, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.+ (सेला )
८ पहाटे मला तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल ऐकू दे,
कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.
ज्या मार्गावर मी चाललं पाहिजे तो मला दाखव,+
कारण मी तुझ्याकडे वळतो.
११ हे यहोवा, तुझ्या नावासाठी मला जिवंत ठेव.