स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी.
१४० हे यहोवा, दुष्ट माणसांपासून मला सोडव;
हिंसाचार करणाऱ्यांपासून माझं रक्षण कर.+
२ ते आपल्या मनात दुष्ट योजना आखतात+
आणि दिवसभर भांडणं उकरून काढतात.
४ हे यहोवा, दुष्टांच्या हातून मला सोडव;+
हिंसाचार करणाऱ्यांपासून माझं रक्षण कर.
मी अडखळून पडावं, म्हणून ते कट रचतात.
५ गर्विष्ठ माझ्यासाठी पाश लपवून ठेवतात;
रस्त्याच्या कडेला ते दोरांनी जाळं पसरवून ठेवतात.+
ते माझ्यासाठी सापळे रचतात.+ (सेला )
६ मी यहोवाला म्हणतो: “तू माझा देव आहेस.
हे यहोवा, माझ्या मदतीच्या याचना ऐक.”+
७ हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझं तारण करणाऱ्या शक्तिशाली देवा,
युद्धाच्या दिवशी तू माझ्या डोक्याचं रक्षण करतोस.+
८ हे यहोवा, दुष्टांच्या इच्छा पूर्ण होऊ देऊ नकोस.
त्यांनी बढाई मारू नये, म्हणून त्यांच्या योजना सफल होऊ देऊ नकोस.+ (सेला )
९ मला घेरणाऱ्या लोकांचे शिव्याशाप,
त्यांच्याच माथी येऊ दे.+
१० त्यांच्यावर निखाऱ्यांचा वर्षाव होवो.+
ते आगीत फेकले जावोत.
वर येता येणार नाही, अशा खोल खड्ड्यांत* ते पडोत.+
११ बदनामी करणाऱ्याला पृथ्वीवर* थारा न मिळो.+
हिंसाचार करणाऱ्यांच्या मागे संकटं लागोत
आणि ती त्यांचा नाश करोत.
१२ यहोवा दीनदुबळ्यांची बाजू घेईल
आणि गोरगरिबांना न्याय देईल, हे मला माहीत आहे.+
१३ नीतिमान लोक नक्कीच तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील;
सरळ मनाचे लोक तुझ्यासमोर राहतील.+