ईयोब
१० मला माझ्या जीवनाची घृणा वाटते.+
मी माझ्या तक्रारी बोलून दाखवीन;
माझं भयंकर दुःख मी व्यक्त करीन!
२ मी देवाला म्हणीन: ‘मला दोषी ठरवू नकोस.
तू माझ्याशी का भांडत आहेस, ते तरी सांग.
३ तू माझ्यावर अत्याचार करतोस;
आपल्याच हाताच्या निर्मितीला+ तुच्छ लेखतोस,
आणि दुष्टांचा सल्ला मान्य करतोस,
असं करून तुला काय मिळेल?
४ तुझे डोळे माणसासारखेच आहेत का?
तुझी दृष्टी नाशवंत मानवांसारखीच आहे का?
५ तुझे दिवस मनुष्यांच्या दिवसांसारखे;
किंवा तुझी वर्षं मानवांच्या वर्षांसारखी आहेत का?+
६ माझा अपराध सापडावा म्हणून तू माझी झडती का घेतोस?
आणि माझ्यात पाप का शोधत राहतोस?+
८ तू स्वतःच्या हातांनी मला आकार देऊन घडवलंस,+
आणि आता तूच माझा सर्वनाश करणार?
१० तू मला दुधासारखं ओतलं नाहीस का?
आणि दह्यासारखं विरजवलं नाहीस का?
११ तू मला मांसाने आणि त्वचेने झाकलंस;
हाडांनी आणि स्नायूंनी मला एकत्र जोडलंस.+
१३ तरी या सर्व गोष्टी करायचं तू मनात ठरवलं होतंस.*
या गोष्टी तूच केल्या आहेस हे मला माहीत आहे.
१४ मी पाप केलं असतं, तर तुझ्या नजरेतून ते सुटलं नसतं,+
तू माझ्या अपराधाची क्षमा केली नसतीस.
१५ मी दोषी असेन, तर माझी दुर्दशा होईल!
आणि मी निर्दोष असलो, तरी मान वर करून चालू शकणार नाही,+
कारण माझं जीवन अपमानाने आणि दुःखाने भरलं आहे.+
१६ मी मान वर केली, तर तू सिंहासारखा+ माझा पाठलाग करतोस
आणि पुन्हा माझ्याविरुद्ध आपली ताकद दाखवतोस.
१७ तू माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार उभे करतोस,
आणि माझ्यावर आणखी संतापतोस.
माझ्यावर एकापाठोपाठ एक संकटं येतच राहतात.
१८ मग तू मला माझ्या आईच्या पोटातून बाहेर का आणलंस?+
कोणी मला पाहायच्या आधीच मी मरून जायला हवं होतं.
१९ म्हणजे मला जन्मताच कबरेकडे नेण्यात आलं असतं,
मी कधी अस्तित्वातच नव्हतो, असं झालं असतं.’
२० माझे थोडेच दिवस उरले आहेत ना?+ मग त्याने मला सोडून द्यावं;
त्याने माझ्यावरून आपली नजर हटवावी, म्हणजे मला थोडा तरी आराम मिळेल.*+
२१ लवकरच मी निघून जाईन आणि कधीच परत येणार नाही.+
मी गडद अंधकाराच्या* देशात निघून जाईन.+
२२ तो घोर अंधकाराचा;
काळोखाचा आणि गोंधळाचा देश आहे.
तिथे प्रकाशही अंधारासारखा आहे.”