वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • एस्तेर ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

एस्तेर रूपरेषा

      • राजा हामानला उच्च पद देतो (१-४)

      • यहुद्यांचा नाश करण्याचा हामानचा कट (५-१५)

एस्तेर ३:१

समासातील संदर्भ

  • +एस्ते ३:१०; ८:७; ९:२४
  • +एस्ते १:१४
  • +निर्ग १७:१६; गण २४:७; अनु २५:१९; १शमु १५:८, ३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १५१

एस्तेर ३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १५१

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००६, पृ. ५

    ४/१/१९८६, पृ. २५-२६

एस्तेर ३:४

समासातील संदर्भ

  • +दान ६:१३
  • +एस्ते २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००६, पृ. ५

एस्तेर ३:५

समासातील संदर्भ

  • +एस्ते ५:९

एस्तेर ३:७

तळटीपा

  • *

    अति. ख१५ पाहा.

  • *

    अति. ख१५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +एस्ते ९:२४
  • +एस्ते १:३; २:१६
  • +एस्ते ९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५०८, २६२८

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८६, पृ. २६

एस्तेर ३:८

समासातील संदर्भ

  • +एस्ते १:१
  • +अनु ४:२७; नहे १:८; यिर्म ५०:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १५१-१५२

एस्तेर ३:९

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

  • *

    किंवा कदाचित, “हे काम करणाऱ्‍या लोकांना देण्यासाठी मी शाही खजिन्यात १०,००० तालान्त जमा करीन.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १५१-१५२

एस्तेर ३:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:४२
  • +गण २४:७; १शमु १५:८, ३२
  • +एस्ते ३:१; ८:२

एस्तेर ३:१२

समासातील संदर्भ

  • +एस्ते ८:९
  • +दान ६:८
  • +एस्ते ८:८; दान ६:१७

एस्तेर ३:१३

समासातील संदर्भ

  • +एस्ते ९:१
  • +एस्ते ८:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १५२-१५३

एस्तेर ३:१५

तळटीपा

  • *

    किंवा “सूसा.”

  • *

    किंवा “सूसा.”

समासातील संदर्भ

  • +एस्ते ८:१४
  • +एज ४:९; नहे १:१; दान ८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १५२-१५३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

एस्ते. ३:१एस्ते ३:१०; ८:७; ९:२४
एस्ते. ३:१एस्ते १:१४
एस्ते. ३:१निर्ग १७:१६; गण २४:७; अनु २५:१९; १शमु १५:८, ३२
एस्ते. ३:४दान ६:१३
एस्ते. ३:४एस्ते २:५
एस्ते. ३:५एस्ते ५:९
एस्ते. ३:७एस्ते ९:२४
एस्ते. ३:७एस्ते १:३; २:१६
एस्ते. ३:७एस्ते ९:१
एस्ते. ३:८एस्ते १:१
एस्ते. ३:८अनु ४:२७; नहे १:८; यिर्म ५०:१७
एस्ते. ३:१०उत्प ४१:४२
एस्ते. ३:१०गण २४:७; १शमु १५:८, ३२
एस्ते. ३:१०एस्ते ३:१; ८:२
एस्ते. ३:१२एस्ते ८:९
एस्ते. ३:१२दान ६:८
एस्ते. ३:१२एस्ते ८:८; दान ६:१७
एस्ते. ३:१३एस्ते ९:१
एस्ते. ३:१३एस्ते ८:११, १२
एस्ते. ३:१५एस्ते ८:१४
एस्ते. ३:१५एज ४:९; नहे १:१; दान ८:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
एस्तेर ३:१-१५

एस्तेर

३ या घटना घडल्यावर, अहश्‍वेरोश राजाने हामानला+ बढती दिली आणि त्याच्या सोबतच्या इतर सर्व अधिकाऱ्‍यांपेक्षा त्याला उच्च पद दिलं.+ हामान हा अगाग+ वंशातल्या हम्मदाथाचा मुलगा होता. २ राजमहालाच्या दरवाजाजवळ बसणारे राजाचे सर्व सेवक हामानला वाकून नमन करायचे आणि त्याला दंडवत घालायचे. कारण राजाने तसा हुकूमच दिला होता. पण मर्दखयने मात्र त्याला वाकून नमन करायला किंवा दंडवत घालायला साफ नकार दिला. ३ म्हणून राजमहालाच्या दरवाजाजवळ बसणाऱ्‍या राजाच्या सेवकांनी मर्दखयला विचारलं: “तू राजाचा हुकूम का मानत नाहीस?” ४ ते दररोज त्याला हाच प्रश्‍न विचारायचे. पण तो त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही. मग त्यांनी ही गोष्ट हामानला सांगितली. मर्दखयचं हे वागणं हामान कितपत खपवून घेईल हे त्यांना पाहायचं होतं.+ कारण आपण यहुदी आहोत हे मर्दखयने त्यांना सांगितलं होतं.+

५ मर्दखय आपल्याला वाकून नमन करत नाही आणि आपल्याला दंडवत घालत नाही हे पाहून हामान संतापला.+ ६ पण एकट्या मर्दखयला मारून हामानचं समाधान झालं नसतं. कारण त्याला मर्दखयच्या लोकांबद्दल, म्हणजे यहुद्यांबद्दलही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे हामान, अहश्‍वेरोशच्या साम्राज्यात असलेल्या मर्दखयच्या सर्व लोकांना मारून टाकण्याची संधी शोधू लागला.

७ त्यासाठी एक विशिष्ट महिना आणि दिवस ठरवण्यासाठी हामानसमोर पूर, म्हणजे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.+ त्या चिठ्ठ्या अहश्‍वेरोश राजाच्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षातल्या पहिल्या महिन्यात, म्हणजे निसान* महिन्यात टाकण्यात आल्या.+ तेव्हा १२ व्या महिन्याची, म्हणजे अदार*+ महिन्याची चिठ्ठी निघाली. ८ मग हामान अहश्‍वेरोश राजाला म्हणाला: “तुमच्या साम्राज्याच्या सर्व प्रांतांतल्या+ लोकांमध्ये असे काही लोक विखुरलेले आहेत+ ज्यांचे कायदे-कानून बाकीच्या लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत. ते राजाचे कायदे मानत नाहीत. आणि अशा लोकांना राहू देणं राजासाठी चांगलं नाही. ९ आता जर राजाला योग्य वाटत असेल, तर या लोकांचा नाश करावा असं एक लिखित फर्मान आपण काढावं. त्यासाठी मी अधिकाऱ्‍यांना शाही खजिन्यात जमा करायला १०,००० तालान्त* चांदी देईन.”*

१० तेव्हा राजाने आपल्या बोटातली मुद्रेची अंगठी+ काढून अगागी+ हम्मदाथाच्या मुलाला आणि यहुद्यांच्या शत्रूला, म्हणजे हामानला+ दिली. ११ राजा हामानला म्हणाला: “ते लोक आणि त्यांची चांदी मी तुझ्या हवाली करतो. त्यांच्या बाबतीत तुला जे योग्य वाटतं ते कर.” १२ मग पहिल्या महिन्याच्या १३ व्या दिवशी राजाच्या सचिवांना+ बोलावण्यात आलं. आणि त्यांनी हामानच्या सर्व आज्ञा राजाच्या सुभेदारांसाठी, प्रांतांच्या राज्यपालांसाठी आणि सगळ्या लोकांच्या अधिकाऱ्‍यांसाठी लिहून काढल्या.+ प्रत्येक प्रांतात राहणाऱ्‍या लोकांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत त्या लिहिण्यात आल्या. त्या अहश्‍वेरोश राजाच्या नावाने लिहून त्यांवर राजमुद्रेच्या अंगठीची मोहर लावण्यात आली.+

१३ मग ही पत्रं दूतांच्या हातून राजाच्या सर्व प्रांतांत पाठवण्यात आली. पत्रांमध्ये असा हुकूम देण्यात आला होता की सर्व यहुदी लोकांना, म्हणजे तरुण-वृद्ध आणि बायका-मुलं अशा सर्वांना एकाच दिवशी मारून टाकावं. अदार+ या १२ व्या महिन्याच्या १३ व्या दिवशी त्या सगळ्यांचा समूळ नाश करून त्यांची मालमत्ता लुटावी.+ १४ सगळ्या लोकांनी त्या दिवसासाठी तयार राहावं, म्हणून पत्रातल्या माहितीला सर्व प्रांतांत कायद्याचं स्वरूप द्यायचं होतं. आणि सगळ्या लोकांमध्ये त्याची जाहीर घोषणा करायची होती. १५ राजाच्या हुकमाप्रमाणे सगळे दूत लगेच निघाले;+ हा कायदा शूशन*+ राजवाड्यातून देण्यात आला. मग राजा आणि हामान प्यायला बसले. पण शूशन* शहरात मात्र खळबळ माजली होती.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा