एज्रा
२ बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ज्या लोकांना बंदी बनवून बाबेलला घेऊन गेला होता,+ त्यांपैकी प्रांतातले हे यहुदी नंतर यरुशलेम आणि यहूदा इथे आपापल्या शहरांत परत आले.+ २ ते जरूब्बाबेल,+ येशूवा,+ नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बानाह यांच्यासोबत परत आले.
परत आलेल्या इस्राएली पुरुषांची संख्या पुढीलप्रमाणे होती:+ ३ परोशची मुलं,* २,१७२; ४ शपत्याहची मुलं, ३७२; ५ आरहची+ मुलं, ७७५; ६ पहथ-मवाबचे+ वंशज येशूवा व यवाब यांची मुलं, २,८१२; ७ एलामची+ मुलं, १,२५४; ८ जत्तूची+ मुलं, ९४५; ९ जक्काईची मुलं, ७६०; १० बानीची मुलं, ६४२; ११ बेबाईची मुलं, ६२३; १२ अजगादची मुलं, १,२२२; १३ अदोनीकामची मुलं, ६६६; १४ बिग्वईची मुलं, २,०५६; १५ आदीनची मुलं, ४५४; १६ हिज्कीयाच्या घराण्यातल्या आटेरची मुलं, ९८; १७ बेजाइची मुलं, ३२३; १८ योराची मुलं, ११२; १९ हाशूमची+ मुलं, २२३; २० गिबारची माणसं, ९५; २१ बेथलेहेमची माणसं, १२३; २२ नटोफाची माणसं, ५६; २३ अनाथोथची+ माणसं, १२८; २४ अजमावेथची माणसं, ४२; २५ किर्याथ-यारीमची, कफीराची आणि बैरोथची माणसं, ७४३; २६ रामाची+ आणि गेबाची+ माणसं, ६२१; २७ मिखमासची माणसं, १२२; २८ बेथेलची आणि आयची+ माणसं, २२३; २९ नबोची+ माणसं, ५२; ३० मग्वीशची माणसं, १५६; ३१ दुसऱ्या एलामची मुलं, १,२५४; ३२ हारीमची मुलं, ३२०; ३३ लोद, हादीद आणि ओनो यांची मुलं, ७२५; ३४ यरीहोची माणसं, ३४५; ३५ सनाहची माणसं, ३,६३०.
३६ याजकांची+ संख्या पुढीलप्रमाणे होती: येशूवाच्या+ घराण्यातली यदायाची+ मुलं, ९७३; ३७ इम्मेरची+ मुलं, १,०५२; ३८ पशहूरची+ मुलं, १,२४७; ३९ हारीमची+ मुलं, १,०१७.
४० लेव्यांची+ संख्या पुढीलप्रमाणे होती: होदव्याहच्या घराण्यातल्या येशूवा आणि कदमीएल+ यांची मुलं, ७४. ४१ गायकांची+ संख्या पुढीलप्रमाणे होती: आसाफची+ मुलं, १२८. ४२ द्वारपालांच्या+ मुलांची संख्या पुढीलप्रमाणे होती: शल्लूम, आटेर, तल्मोन,+ अक्कूब,+ हतीता आणि शोबाई यांची मुलं एकूण १३९.
४३ मंदिरातले सेवक*+ पुढीलप्रमाणे होते: सीहाची मुलं, हसूफाची मुलं, तब्बावोथची मुलं, ४४ केरोसची मुलं, सीयाची मुलं, पादोनची मुलं, ४५ लबानाची मुलं, हगाबाची मुलं, अक्कूबची मुलं, ४६ हागाबची मुलं, सल्माईची मुलं, हानानची मुलं, ४७ गिद्देलची मुलं, गहरची मुलं, रायाची मुलं, ४८ रसीनची मुलं, नकोदाची मुलं, गज्जामची मुलं, ४९ उज्जाची मुलं, पासेहाची मुलं, बेसाईची मुलं, ५० अस्नाची मुलं, मऊनीमची मुलं, नफ्सीमची मुलं, ५१ बकबुकची मुलं, हकूफाची मुलं, हरहूरची मुलं, ५२ बस्लूथची मुलं, महीदाची मुलं, हरशाची मुलं, ५३ बर्कोसची मुलं, सीसराची मुलं, तामहाची मुलं, ५४ नसीहाची मुलं आणि हतीफाची मुलं.
५५ शलमोनच्या सेवकांची मुलं पुढीलप्रमाणे होती: सोताईची मुलं, सोफेरेथची मुलं, परूदाची मुलं,+ ५६ यालाची मुलं, दर्कोनची मुलं, गिद्देलची मुलं, ५७ शपत्याहची मुलं, हत्तीलची मुलं, पोखेरेथ-हस्सबाईमची मुलं आणि आमीची मुलं.
५८ मंदिरातल्या सर्व सेवकांची* आणि शलमोनच्या सेवकांच्या मुलांची एकूण संख्या ३९२ इतकी होती.
५९ तेल-मेलह, तेल-हर्शा, करूब, अद्दोन आणि इम्मेर इथून जे आले आणि ज्यांना आपलं कूळ आणि वंश दाखवून आपण इस्राएली आहोत हे सिद्ध करता आलं नाही त्यांची नावं अशी:+ ६० दलायाची मुलं, तोबीयाची मुलं, नकोदाची मुलं, ६५२; ६१ याजकांच्या मुलांची नावं पुढीलप्रमाणे होती: हबायाची मुलं, हक्कोसची+ मुलं, बर्जिल्ल्यची मुलं; (बर्जिल्ल्य याने गिलादमध्ये राहणाऱ्या बर्जिल्ल्यच्या+ मुलीशी लग्न केलं होतं आणि तिच्या घराण्यावरून त्याचं बर्जिल्ल्य असं नाव पडलं.) ६२ त्यांनी आपली वंशावळ सिद्ध करण्यासाठी वंशावळींची पुस्तकं शोधली, पण त्यांना ती सापडली नाहीत, म्हणून त्यांना याजकपदासाठी अयोग्य ठरवण्यात आलं.*+ ६३ राज्यपालाने* त्यांना सांगितलं, की जोपर्यंत उरीम आणि थुम्मीम*+ वापरून देवाला विचारणारा याजक येत नाही, तोपर्यंत ते परमपवित्र गोष्टी खाऊ शकत नाहीत.+
६४ संपूर्ण मंडळीतल्या लोकांची एकूण संख्या ४२,३६० इतकी होती.+ ६५ त्यांच्या दासदासींची संख्या ७,३३७ इतकी होती आणि याशिवाय त्यांच्याकडे २०० गायक व गायिकाही होत्या. ६६ त्यांच्याकडे ७३६ घोडे, २४५ खेचरं, ६७ तसंच, ४३५ उंट आणि ६,७२० गाढवं होती.
६८ ते यरुशलेम इथे यहोवाच्या मंदिराजवळ आले तेव्हा इस्राएली लोकांच्या कुळांच्या काही प्रमुखांनी, खऱ्या देवाचं मंदिर त्याच्या मूळच्या ठिकाणी पुन्हा बांधण्यासाठी*+ स्वेच्छेने अर्पणं+ दिली. ६९ त्यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे, या कार्याकरता असलेल्या भांडारासाठी सोन्याचे ६१,००० ड्राख्मा,* चांदीच्या ५,००० मिना*+ आणि याजकांसाठी १०० झगे दिले. ७० याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातले सेवक* आणि इतर काही लोक आपापल्या शहरांत आणि बाकीचे सर्व इस्राएली* आपापल्या शहरांत राहू लागले.+