वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • यहूदाचा राजा अहज्या (१-९)

      • अथल्या राज्यपद बळकावते (१०-१२)

२ इतिहास २२:१

तळटीपा

  • *

    २इति २१:१७ मध्ये याला यहोआहाज म्हटलं आहे.

समासातील संदर्भ

  • +२इत २१:१६, १७
  • +२रा ८:२४-२६

२ इतिहास २२:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलगी.”

समासातील संदर्भ

  • +२रा ११:१, १३, १६; २इत २४:७
  • +१रा १६:२८

२ इतिहास २२:३

समासातील संदर्भ

  • +१रा १६:३३; २रा ८:२७, २८; मीख ६:१६

२ इतिहास २२:५

समासातील संदर्भ

  • +२रा ८:१५; १०:३२
  • +१रा २२:३; २इत १८:१४

२ इतिहास २२:६

तळटीपा

  • *

    किंवा “आजारी असल्यामुळे.”

  • *

    काही हिब्रू हस्तलिखितांमध्ये याला “अजऱ्‍या” म्हटलं आहे.

समासातील संदर्भ

  • +यहो १९:१८, २३
  • +२रा ९:१५
  • +२रा ३:१
  • +२रा ९:१६
  • +२रा ८:१६

२ इतिहास २२:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलगा.”

समासातील संदर्भ

  • +१रा १९:१६; २रा ९:२०, २१
  • +२रा ९:६, ७

२ इतिहास २२:८

समासातील संदर्भ

  • +२रा १०:१०-१४

२ इतिहास २२:९

समासातील संदर्भ

  • +२रा ९:२७, २८
  • +२इत १७:३, ४

२ इतिहास २२:१०

समासातील संदर्भ

  • +२इत २२:२
  • +२रा ११:१-३

२ इतिहास २२:११

समासातील संदर्भ

  • +२रा ११:२१
  • +२रा ८:१६
  • +२इत २३:१
  • +२शमु ७:१२, १३; १रा १५:४; २इत २१:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. २२:१२इत २१:१६, १७
२ इति. २२:१२रा ८:२४-२६
२ इति. २२:२२रा ११:१, १३, १६; २इत २४:७
२ इति. २२:२१रा १६:२८
२ इति. २२:३१रा १६:३३; २रा ८:२७, २८; मीख ६:१६
२ इति. २२:५२रा ८:१५; १०:३२
२ इति. २२:५१रा २२:३; २इत १८:१४
२ इति. २२:६यहो १९:१८, २३
२ इति. २२:६२रा ९:१५
२ इति. २२:६२रा ३:१
२ इति. २२:६२रा ९:१६
२ इति. २२:६२रा ८:१६
२ इति. २२:७१रा १९:१६; २रा ९:२०, २१
२ इति. २२:७२रा ९:६, ७
२ इति. २२:८२रा १०:१०-१४
२ इति. २२:९२रा ९:२७, २८
२ इति. २२:९२इत १७:३, ४
२ इति. २२:१०२इत २२:२
२ इति. २२:१०२रा ११:१-३
२ इति. २२:११२रा ११:२१
२ इति. २२:११२रा ८:१६
२ इति. २२:११२इत २३:१
२ इति. २२:११२शमु ७:१२, १३; १रा १५:४; २इत २१:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास २२:१-१२

२ इतिहास

२२ मग यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांनी यहोरामच्या सगळ्यात लहान मुलाला, म्हणजे अहज्याला* त्याच्या जागी राजा बनवलं. कारण, अरबी लोकांसोबत यहूदाच्या छावणीत आलेल्या लुटारूंच्या टोळ्यांनी त्याच्या सगळ्या मोठ्या मुलांना मारून टाकलं होतं.+ म्हणून यहोरामचा मुलगा अहज्या हा यहूदावर राज्य करू लागला.+ २ अहज्या राजा बनला त्या वेळी तो २२ वर्षांचा होता. त्याने एक वर्ष यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अथल्या+ असून ती अम्री+ याची नात* होती.

३ अहज्या हा अहाबच्या घराण्यासारखाच वागला;+ कारण वाईट कामं करायला त्याची आई त्याला सल्ला द्यायची. ४ अहाबच्या घराण्याप्रमाणेच तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला; कारण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अहाबच्या घराण्यातले लोक त्याचे सल्लागार बनले होते; आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. ५ त्यांचा सल्ला ऐकून तो इस्राएलचा राजा अहाब याच्या मुलासोबत, म्हणजे यहोरामसोबत सीरियाचा राजा हजाएल+ याच्याशी युद्ध करायला रामोथ-गिलाद+ इथे गेला. पण तिथे तिरंदाजांनी यहोरामला जखमी केलं. ६ म्हणून मग बरं होण्यासाठी तो इज्रेलला+ परत आला; कारण, सीरियाचा राजा हजाएल याच्याशी रामा इथे युद्ध करत असताना त्यांनी त्याला जखमी केलं होतं.+

अहाबचा मुलगा यहोराम+ जखमी झाल्यामुळे,*+ यहूदाचा राजा यहोराम+ याचा मुलगा अहज्या* त्याला भेटायला इज्रेलला गेला. ७ यहोरामला भेटायला जाणं, हे अहज्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. हे सगळं देवानेच घडवून आणलं होतं. यहोरामकडे आल्यावर ते दोघं निमशीचा नातू* येहू+ याला भेटायला गेले. अहाबच्या घराण्याचा नाश करण्यासाठी यहोवाने येहूचा अभिषेक केला होता.+ ८ येहू अहाबच्या घराण्याचा नाश करू लागला, तेव्हा त्याला यहूदाचे अधिकारी आणि अहज्याची सेवा करणारी अहज्याच्या भावांची मुलं भेटली. येहूने या सगळ्यांना मारून टाकलं.+ ९ मग तो अहज्याला शोधू लागला. अहज्या शोमरोनात लपून बसला होता, तेव्हा येहूच्या माणसांनी त्याला धरून येहूकडे आणलं. त्यांनी त्याला मारून टाकलं आणि दफन केलं.+ कारण ते म्हणाले: “ज्याने मनापासून यहोवाची सेवा केली, त्या यहोशाफाटचा हा नातू आहे.”+ अहज्यानंतर त्याचं राज्य चालवायला समर्थ असा कोणीही त्याच्या घराण्यात नव्हता.

१० अहज्याची आई अथल्या+ हिने जेव्हा पाहिलं, की आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तेव्हा तिने यहूदाच्या राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकलं.+ ११ पण राजाच्या ज्या मुलांना मारलं जाणार होतं, त्यांच्यापैकी अहज्याचा मुलगा यहोआश+ याला राजाच्या मुलीने, यहोशबाथने पळवून नेलं. तिने यहोआशला आणि त्याच्या दाईला एका आतल्या खोलीत लपवून ठेवलं. यहोराम+ राजाची मुलगी यहोशबाथ हिने (ही यहोयादा+ याजकाची बायको आणि अहज्याची बहीण होती) यहोआशला अथल्यापासून लपवून ठेवल्यामुळे तो वाचला.+ १२ अथल्या देशावर राज्य करत होती त्या काळात, यहोआश सहा वर्षं खऱ्‍या देवाच्या मंदिरात त्यांच्यासोबत लपून राहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा