वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ इतिहास १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ इतिहास रूपरेषा

      • दावीदचं राज्यपद स्थिर होतं (१, २)

      • दावीदचं कुटुंब (३-७)

      • पलिष्टी लोकांचा पराभव (८-१७)

१ इतिहास १४:१

समासातील संदर्भ

  • +१रा ५:६, ८
  • +२शमु ५:११, १२

१ इतिहास १४:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:२०, २१
  • +२शमु ७:८

१ इतिहास १४:३

समासातील संदर्भ

  • +अनु १७:१७
  • +२शमु ५:१३-१६

१ इतिहास १४:४

समासातील संदर्भ

  • +१इत ३:५-९
  • +लूक ३:२३, ३१
  • +१रा १:४७; मत्त १:६

१ इतिहास १४:८

समासातील संदर्भ

  • +१इत ११:३
  • +२शमु ५:१७; स्तो २:२

१ इतिहास १४:९

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:१८, २२; २३:१३

१ इतिहास १४:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:१९-२१

१ इतिहास १४:११

तळटीपा

  • *

    म्हणजे, “तुटून पडण्यात तरबेज असलेला.”

समासातील संदर्भ

  • +यश २८:२१

१ इतिहास १४:१२

समासातील संदर्भ

  • +अनु ७:२५

१ इतिहास १४:१३

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:२२-२५

१ इतिहास १४:१४

समासातील संदर्भ

  • +यहो ८:२; स्तो १८:३४

१ इतिहास १४:१५

समासातील संदर्भ

  • +अनु २३:१४; शास ४:१४

१ इतिहास १४:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प ६:२२; निर्ग ३९:३२
  • +यहो १६:१०

१ इतिहास १४:१७

समासातील संदर्भ

  • +अनु २:२५; ११:२५; यहो २:९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ इति. १४:११रा ५:६, ८
१ इति. १४:१२शमु ५:११, १२
१ इति. १४:२स्तो ८९:२०, २१
१ इति. १४:२२शमु ७:८
१ इति. १४:३अनु १७:१७
१ इति. १४:३२शमु ५:१३-१६
१ इति. १४:४१इत ३:५-९
१ इति. १४:४लूक ३:२३, ३१
१ इति. १४:४१रा १:४७; मत्त १:६
१ इति. १४:८१इत ११:३
१ इति. १४:८२शमु ५:१७; स्तो २:२
१ इति. १४:९२शमु ५:१८, २२; २३:१३
१ इति. १४:१०२शमु ५:१९-२१
१ इति. १४:११यश २८:२१
१ इति. १४:१२अनु ७:२५
१ इति. १४:१३२शमु ५:२२-२५
१ इति. १४:१४यहो ८:२; स्तो १८:३४
१ इति. १४:१५अनु २३:१४; शास ४:१४
१ इति. १४:१६उत्प ६:२२; निर्ग ३९:३२
१ इति. १४:१६यहो १६:१०
१ इति. १४:१७अनु २:२५; ११:२५; यहो २:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ इतिहास १४:१-१७

१ इतिहास

१४ सोरचा राजा हीराम+ याने दावीदकडे आपले दूत पाठवले. त्याने त्यांच्यासोबत, दावीदसाठी राजमहाल बांधायला देवदाराची लाकडंही पाठवली. शिवाय, त्याने सुतारकाम करणाऱ्‍यांना आणि गवंड्यांनाही पाठवलं.+ २ दावीदला याची जाणीव झाली, की यहोवानेच इस्राएलवर आपलं राज्यपद स्थिर केलं आहे;+ आणि त्यानेच त्याच्या इस्राएली लोकांसाठी आपल्याला एक महान राजा बनवलं आहे.+

३ दावीदने यरुशलेममध्ये आणखी बायका केल्या.+ आणि त्याला आणखी मुलंमुली झाल्या.+ ४ यरुशलेममध्ये झालेल्या त्याच्या मुलांची नावं ही:+ शम्मुवा, शोबाब, नाथान,+ शलमोन,+ ५ इभार, अलीशवा, एल्पलेट, ६ नोगा, नेफेग, याफीय, ७ अलीशामा, बेल्यादा आणि अलीफलेट.

८ दावीदला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आलं आहे,+ ही गोष्ट जेव्हा पलिष्टी लोकांनी ऐकली तेव्हा ते सगळे त्याच्याशी लढायला आले.+ दावीदला हे समजलं तेव्हा तोही त्यांच्याशी लढायला गेला. ९ इकडे पलिष्टी लोक आले आणि रेफाईम खोऱ्‍यात+ लूटमार करू लागले. १० तेव्हा दावीदने देवाला विचारलं: “मी पलिष्ट्यांवर हल्ला करू का? तू त्यांना माझ्या हाती देशील का?” त्यावर यहोवा दावीदला म्हणाला: “जा, त्यांच्यावर हल्ला कर. कारण मी त्यांना नक्की तुझ्या हाती देईन.”+ ११ म्हणून दावीद बाल-परासीम+ इथे गेला आणि तिथे त्याने त्यांना मारून टाकलं. मग दावीद म्हणाला: “खरा देव माझ्यापुढे जाऊन पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला आणि त्याने माझ्या हातून शत्रूंचा नाश केला.” त्यामुळे त्या जागेचं नाव बाल-परासीम* असं पडलं. १२ पलिष्टी लोक आपल्या मूर्ती तिथेच सोडून पळून गेले. आणि दावीदच्या आज्ञेवरून त्या मूर्ती जाळून टाकण्यात आल्या.+

१३ नंतर परत एकदा पलिष्टी लोकांनी खोऱ्‍यात+ येऊन लूटमार केली. १४ तेव्हा काय करावं याबद्दल दावीदने पुन्हा देवाला विचारलं. त्यावर खरा देव त्याला म्हणाला: “त्यांच्यावर समोरून हल्ला करू नकोस, तर त्यांना वळसा घालून त्यांच्या पाठीमागे जा. आणि मग तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.+ १५ तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला चाल करून येणाऱ्‍या सैन्याचा आवाज येईल, तेव्हा लगेच हल्ला कर. कारण पलिष्ट्यांच्या सैन्याचा नाश करायला खरा देव आधीच पुढे गेलेला असेल.”+ १६ तेव्हा, खऱ्‍या देवाने जसं सांगितलं होतं अगदी तसंच दावीदने केलं.+ आणि तो व त्याचे सैनिक गिबोनपासून गेजेरपर्यंत+ पलिष्ट्यांना तलवारीने मारत गेले. १७ दावीदची कीर्ती सर्व देशांमध्ये पसरली आणि यहोवाने सगळ्या राष्ट्रांवर दावीदचा धाक बसवला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा