वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे २४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ राजे रूपरेषा

      • यहोयाकीमचं बंड आणि त्याचा मृत्यू (१-७)

      • यहूदाचा राजा यहोयाखीन (८, ९)

      • बाबेलच्या बंदिवासात गेलेला पहिला गट (१०-१७)

      • यहूदाचा राजा सिद्‌कीया; त्याने केलेलं बंड (१८-२०)

२ राजे २४:१

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:१; ४६:२; दान १:१; ३:१; ४:३३

२ राजे २४:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +हब १:६
  • +लेवी २६:२७, २८; अनु २८:१५; २रा २३:२७

२ राजे २४:३

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३३; अनु ४:२६
  • +२रा २१:११; २३:२६

२ राजे २४:४

समासातील संदर्भ

  • +२रा २१:१६; यिर्म २:३४; १९:४
  • +यिर्म १५:१; विल ३:४२

२ राजे २४:५

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:८

२ राजे २४:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म २२:१८, १९; ३६:३०

२ राजे २४:७

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ५
  • +उत्प १५:१८; १रा ४:२१
  • +यिर्म ४६:२

२ राजे २४:८

समासातील संदर्भ

  • +यिर्म २४:१; ३७:१
  • +२इत ३६:८

२ राजे २४:१०

समासातील संदर्भ

  • +दान १:१

२ राजे २४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. २८

२ राजे २४:१२

समासातील संदर्भ

  • +यिर्म २९:१, २
  • +२इत ३६:९, १०; यिर्म २४:१; यहे १७:१२
  • +यिर्म ५२:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. २८-२९

२ राजे २४:१३

समासातील संदर्भ

  • +२रा २०:१३, १७
  • +१रा ७:४८-५०; एज १:७; दान ५:२

२ राजे २४:१४

तळटीपा

  • *

    किंवा “राजपुत्र.”

  • *

    किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”

समासातील संदर्भ

  • +दान १:३, ६
  • +यिर्म २४:१
  • +२रा २५:१२

२ राजे २४:१५

समासातील संदर्भ

  • +२रा २५:२७; १इत ३:१७
  • +यिर्म २२:२४, २५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. २८-२९

२ राजे २४:१६

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”

२ राजे २४:१७

समासातील संदर्भ

  • +१इत ३:१५
  • +२इत ३६:१०-१२; यिर्म ३७:१; ५२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. २८

२ राजे २४:१८

समासातील संदर्भ

  • +२रा २३:३१

२ राजे २४:१९

समासातील संदर्भ

  • +२रा २३:३६, ३७; यिर्म २४:८; ३७:१, २; ३८:५, ६; यहे २१:२५

२ राजे २४:२०

समासातील संदर्भ

  • +२रा २३:२७
  • +२इत ३६:११, १३; यिर्म २७:१२; ३८:१७; यहे १७:१२-१५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ राजे २४:१यिर्म २५:१; ४६:२; दान १:१; ३:१; ४:३३
२ राजे २४:२हब १:६
२ राजे २४:२लेवी २६:२७, २८; अनु २८:१५; २रा २३:२७
२ राजे २४:३लेवी २६:३३; अनु ४:२६
२ राजे २४:३२रा २१:११; २३:२६
२ राजे २४:४२रा २१:१६; यिर्म २:३४; १९:४
२ राजे २४:४यिर्म १५:१; विल ३:४२
२ राजे २४:५२इत ३६:८
२ राजे २४:६यिर्म २२:१८, १९; ३६:३०
२ राजे २४:७गण ३४:२, ५
२ राजे २४:७उत्प १५:१८; १रा ४:२१
२ राजे २४:७यिर्म ४६:२
२ राजे २४:८यिर्म २४:१; ३७:१
२ राजे २४:८२इत ३६:८
२ राजे २४:१०दान १:१
२ राजे २४:१२यिर्म २९:१, २
२ राजे २४:१२२इत ३६:९, १०; यिर्म २४:१; यहे १७:१२
२ राजे २४:१२यिर्म ५२:२८
२ राजे २४:१३२रा २०:१३, १७
२ राजे २४:१३१रा ७:४८-५०; एज १:७; दान ५:२
२ राजे २४:१४दान १:३, ६
२ राजे २४:१४यिर्म २४:१
२ राजे २४:१४२रा २५:१२
२ राजे २४:१५२रा २५:२७; १इत ३:१७
२ राजे २४:१५यिर्म २२:२४, २५
२ राजे २४:१७१इत ३:१५
२ राजे २४:१७२इत ३६:१०-१२; यिर्म ३७:१; ५२:१
२ राजे २४:१८२रा २३:३१
२ राजे २४:१९२रा २३:३६, ३७; यिर्म २४:८; ३७:१, २; ३८:५, ६; यहे २१:२५
२ राजे २४:२०२रा २३:२७
२ राजे २४:२०२इत ३६:११, १३; यिर्म २७:१२; ३८:१७; यहे १७:१२-१५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ राजे २४:१-२०

२ राजे

२४ यहोयाकीमच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर+ याने यहूदावर हल्ला केला; आणि यहोयाकीम तीन वर्षं त्याच्या अधीन राहिला. पण तिसऱ्‍या वर्षी त्याने त्याच्याविरुद्ध बंड केलं. २ मग यहोवा सीरियाच्या लोकांच्या, तसंच खास्दी,*+ मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या लूटमार करणाऱ्‍या टोळ्या यहोयाकीमविरुद्ध पाठवू लागला. यहोवाने आपल्या सेवाकांद्वारे, म्हणजे संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे यहूदाचा नाश करण्यासाठी तो या टोळ्यांना पाठवत राहिला.+ ३ यहूदाला आपल्या नजरेसमोरून दूर करण्यासाठी यहोवाच्या आज्ञेवरूनच हे सर्व झालं.+ मनश्‍शेने खूप मोठ्या प्रमाणावर पापं केली होती;+ ४ आणि त्याने संपूर्ण यरुशलेम निर्दोष लोकांच्या रक्‍ताने भरून टाकलं होतं.+ म्हणून यहोवा यहूदाला क्षमा करायला तयार नव्हता.+

५ यहोयाकीमबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ ६ मग यहोयाकीमचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोयाखीन राजा बनला.

७ बाबेलच्या राजाने, इजिप्तच्या ओढ्यापासून+ फरात नदीपर्यंत+ असलेला इजिप्तचा सगळा प्रदेश काबीज केला होता.+ त्यामुळे, इजिप्तच्या राजाने पुन्हा कधीही आपलं सैन्य देशाबाहेर लढाईसाठी पाठवलं नाही.

८ यहोयाखीन+ राजा बनला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून तीन महिने राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव नेहूष्टा असून ती यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या एलनाथानची मुलगी होती. ९ यहोयाखीन आपल्या वडिलांप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. १० त्या काळात बाबेलच्या राजाचं, म्हणजे नबुखद्‌नेस्सरचं सैन्य यरुशलेमवर हल्ला करायला आलं, आणि त्या सैन्याने येऊन शहराला वेढा घातला.+ ११ सैन्याने शहराला वेढा घातलेला असताना, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सरही तिथे आला.

१२ तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन हा आपले सेवक, अधिकारी, दरबारी आणि आपली आई या सगळ्यांना घेऊन+ बाबेलच्या राजाला शरण गेला;+ बाबेलच्या राजाने आपल्या शासनकाळाच्या आठव्या वर्षी यहोयाखीनला बंदी बनवून नेलं.+ १३ त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालात असलेला सगळा खजिना लुटला.+ तसंच, इस्राएलचा राजा शलमोन याने यहोवाच्या मंदिरासाठी जी सोन्याची भांडी बनवली होती,+ त्या सगळ्या भांड्यांचे त्याने तुकडे-तुकडे केले. यहोवाने भविष्यवाणी केली होती त्याप्रमाणेच हे सर्व घडलं. १४ नबुखद्‌नेस्सरने यरुशलेममधल्या सगळ्यांना, म्हणजे सर्व अधिकारी,*+ शूर योद्धे आणि सर्व कारागीर व लोहार* यांना बंदी बनवून नेलं;+ अशा एकूण १०,००० जणांना त्याने बंदी बनवून नेलं. देशात फक्‍त गरीब व कंगाल लोक उरले.+ १५ अशा प्रकारे, बाबेलच्या राजाने यहोयाखीन+ राजाला, त्याच्या आईला, बायकांना, दरबाऱ्‍यांना आणि देशातल्या सगळ्या प्रतिष्ठित माणसांना यरुशलेममधून बाबेलला बंदिवासात नेलं.+ १६ याशिवाय, त्याने सर्व ७,००० योद्धे आणि १,००० कारागीर व लोहार* यांनाही बंदी बनवून बाबेलला नेलं. ही सगळी माणसं शूरवीर असून युद्धासाठी प्रशिक्षित केलेली होती. १७ बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याह याला यहोयाखीनच्या जागी राजा बनवलं.+ त्याने त्याचं नाव बदलून सिद्‌कीया असं ठेवलं.+

१८ सिद्‌कीया राजा बनला तेव्हा तो २१ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव हमूटल+ असून ती लिब्ना इथे राहणाऱ्‍या यिर्मयाची मुलगी होती. १९ यहोयाखीनप्रमाणेच सिद्‌कीया यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ २० यरुशलेममध्ये आणि यहूदामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या, कारण यहोवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला होता; आणि शेवटी त्याने त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर करून टाकलं.+ पुढे सिद्‌कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा