वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे १९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ राजे रूपरेषा

      • हिज्कीया यशयाद्वारे यहोवाकडे मदत मागतो (१-७)

      • सन्हेरीब यरुशलेमच्या लोकांना घाबरवतो (८-१३)

      • हिज्कीयाची प्रार्थना (१४-१९)

      • यशया देवाचा संदेश कळवतो (२०-३४)

      • स्वर्गदूत १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांना मारून टाकतो (३५-३७)

२ राजे १९:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश ३७:१-४

२ राजे १९:२

समासातील संदर्भ

  • +यश १:१

२ राजे १९:३

तळटीपा

  • *

    किंवा “अपमानाचा.”

समासातील संदर्भ

  • +यश २६:१७, १८

२ राजे १९:४

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:४५; २रा १८:३५
  • +२शमु २२:७; २इत २०:९; ३२:२०; स्तो ५०:१५

२ राजे १९:५

समासातील संदर्भ

  • +यश ३७:५-७

२ राजे १९:६

समासातील संदर्भ

  • +२रा १८:१७
  • +अनु २०:३; यश ४१:१०; ५१:७

२ राजे १९:७

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:२१; यश ३७:३७, ३८

२ राजे १९:८

समासातील संदर्भ

  • +२रा १८:१४
  • +यश ३७:८-१३

२ राजे १९:९

समासातील संदर्भ

  • +२रा १८:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८९, पृ. ३१

२ राजे १९:१०

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:१५

२ राजे १९:११

समासातील संदर्भ

  • +२रा १७:५; २इत ३२:१०, १३; यश १०:८-११

२ राजे १९:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:३१

२ राजे १९:१३

समासातील संदर्भ

  • +२रा १७:२४; १८:३३, ३४

२ राजे १९:१४

समासातील संदर्भ

  • +१रा ८:३०; यश ३७:१४-२०

२ राजे १९:१५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “करुबांच्या मधे.”

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:२०
  • +निर्ग २५:२२
  • +१इत २९:१०, ११

२ राजे १९:१६

समासातील संदर्भ

  • +१रा ८:२९; स्तो ६५:२
  • +२इत १६:९; दान ९:१८

२ राजे १९:१७

समासातील संदर्भ

  • +२रा १६:८, ९; १७:६, २४

२ राजे १९:१८

समासातील संदर्भ

  • +यश ४१:२९
  • +यिर्म १०:३

२ राजे १९:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ८३:१७, १८; यश ४५:५, ६

२ राजे १९:२०

समासातील संदर्भ

  • +यश ३७:२१, २२
  • +२रा १९:१५

२ राजे १९:२२

समासातील संदर्भ

  • +२रा १९:१०
  • +२रा १८:३०; यश १०:१२, १३
  • +यश ३७:२३-२५

२ राजे १९:२३

समासातील संदर्भ

  • +२रा १८:१७
  • +२इत ३२:१७; यश १०:१०, ११

२ राजे १९:२४

तळटीपा

  • *

    किंवा “नाईल नदीचे कालवे.”

२ राजे १९:२५

समासातील संदर्भ

  • +यश १४:२४
  • +स्तो ३३:११
  • +यश ४६:१०
  • +यश १०:५; ३७:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/१९९९, पृ. १४

२ राजे १९:२६

समासातील संदर्भ

  • +यश ४०:७

२ राजे १९:२७

समासातील संदर्भ

  • +नीत ५:२१; इब्री ४:१३
  • +यश ३७:२८, २९

२ राजे १९:२८

समासातील संदर्भ

  • +स्तो ४६:६; यश १०:५, १५
  • +२रा १८:३५; यश १०:१२, १३
  • +स्तो ३२:९
  • +२रा १९:३३

२ राजे १९:२९

तळटीपा

  • *

    म्हणजे, हिज्कीया.

  • *

    किंवा “खाली पडलेल्या धान्यातून उगवलेलं.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:४-६
  • +यश ३७:३०-३२

२ राजे १९:३०

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:२२; यश १०:२०

२ राजे १९:३१

समासातील संदर्भ

  • +यश ५९:१७; जख १:१४, १५

२ राजे १९:३२

समासातील संदर्भ

  • +यश १०:२४
  • +२इत ३२:२२
  • +यश ३७:३३-३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८९, पृ. ३०

२ राजे १९:३४

समासातील संदर्भ

  • +१शमु १२:२२; यश ४३:२५; यहे ३६:२२
  • +२रा २०:६; यिर्म २३:५
  • +यश ३१:५

२ राजे १९:३५

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:२१; यश ३१:८
  • +निर्ग १२:३०; यश ३७:३६-३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८९, पृ. ३०

२ राजे १९:३६

समासातील संदर्भ

  • +योन १:२
  • +२रा १९:७, २८

२ राजे १९:३७

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:२१
  • +उत्प ८:४
  • +एज ४:२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ राजे १९:१यश ३७:१-४
२ राजे १९:२यश १:१
२ राजे १९:३यश २६:१७, १८
२ राजे १९:४१शमु १७:४५; २रा १८:३५
२ राजे १९:४२शमु २२:७; २इत २०:९; ३२:२०; स्तो ५०:१५
२ राजे १९:५यश ३७:५-७
२ राजे १९:६२रा १८:१७
२ राजे १९:६अनु २०:३; यश ४१:१०; ५१:७
२ राजे १९:७२इत ३२:२१; यश ३७:३७, ३८
२ राजे १९:८२रा १८:१४
२ राजे १९:८यश ३७:८-१३
२ राजे १९:९२रा १८:१७
२ राजे १९:१०२इत ३२:१५
२ राजे १९:११२रा १७:५; २इत ३२:१०, १३; यश १०:८-११
२ राजे १९:१२उत्प ११:३१
२ राजे १९:१३२रा १७:२४; १८:३३, ३४
२ राजे १९:१४१रा ८:३०; यश ३७:१४-२०
२ राजे १९:१५२इत ३२:२०
२ राजे १९:१५निर्ग २५:२२
२ राजे १९:१५१इत २९:१०, ११
२ राजे १९:१६१रा ८:२९; स्तो ६५:२
२ राजे १९:१६२इत १६:९; दान ९:१८
२ राजे १९:१७२रा १६:८, ९; १७:६, २४
२ राजे १९:१८यश ४१:२९
२ राजे १९:१८यिर्म १०:३
२ राजे १९:१९स्तो ८३:१७, १८; यश ४५:५, ६
२ राजे १९:२०यश ३७:२१, २२
२ राजे १९:२०२रा १९:१५
२ राजे १९:२२२रा १९:१०
२ राजे १९:२२२रा १८:३०; यश १०:१२, १३
२ राजे १९:२२यश ३७:२३-२५
२ राजे १९:२३२रा १८:१७
२ राजे १९:२३२इत ३२:१७; यश १०:१०, ११
२ राजे १९:२५यश १४:२४
२ राजे १९:२५स्तो ३३:११
२ राजे १९:२५यश ४६:१०
२ राजे १९:२५यश १०:५; ३७:२६, २७
२ राजे १९:२६यश ४०:७
२ राजे १९:२७नीत ५:२१; इब्री ४:१३
२ राजे १९:२७यश ३७:२८, २९
२ राजे १९:२८स्तो ४६:६; यश १०:५, १५
२ राजे १९:२८२रा १८:३५; यश १०:१२, १३
२ राजे १९:२८स्तो ३२:९
२ राजे १९:२८२रा १९:३३
२ राजे १९:२९लेवी २५:४-६
२ राजे १९:२९यश ३७:३०-३२
२ राजे १९:३०२इत ३२:२२; यश १०:२०
२ राजे १९:३१यश ५९:१७; जख १:१४, १५
२ राजे १९:३२यश १०:२४
२ राजे १९:३२२इत ३२:२२
२ राजे १९:३२यश ३७:३३-३५
२ राजे १९:३४१शमु १२:२२; यश ४३:२५; यहे ३६:२२
२ राजे १९:३४२रा २०:६; यिर्म २३:५
२ राजे १९:३४यश ३१:५
२ राजे १९:३५२इत ३२:२१; यश ३१:८
२ राजे १९:३५निर्ग १२:३०; यश ३७:३६-३८
२ राजे १९:३६योन १:२
२ राजे १९:३६२रा १९:७, २८
२ राजे १९:३७२इत ३२:२१
२ राजे १९:३७उत्प ८:४
२ राजे १९:३७एज ४:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ राजे १९:१-३७

२ राजे

१९ हिज्कीया राजाने हे ऐकलं, तेव्हा दुःखी होऊन त्याने लगेच आपले कपडे फाडले आणि गोणपाट* घालून तो यहोवाच्या मंदिरात गेला.+ २ मग त्याने राजमहालाची व्यवस्था पाहणारा एल्याकीम, सचिव शेबना आणि याजकांचे प्रमुख यांना आमोजच्या मुलाकडे, म्हणजे यशया+ संदेष्ट्याकडे पाठवलं. ते सर्व गोणपाट घालून त्याच्याकडे गेले, ३ आणि यशयाला म्हणाले: “हिज्कीया असं म्हणतो, ‘आजचा हा दिवस अतिशय दुःखाचा, निंदेचा* आणि बदनामीचा दिवस आहे; कारण मुलांना जन्म द्यायची वेळ तर आली आहे, पण जन्म द्यायची ताकदच उरली नाही.+ ४ ज्या रबशाकेला त्याच्या प्रभूने, अश्‍शूरच्या राजाने जिवंत देवाची निंदा करायला पाठवलंय,+ त्याचे शब्द कदाचित आपला देव यहोवा ऐकेल. आणि त्या शब्दांसाठी आपला देव यहोवा त्याला शिक्षा करेल. म्हणून आता या देशात उरलेल्या लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करा.’”+

५ हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले,+ ६ तेव्हा यशया त्यांना म्हणाला: “तुमच्या प्रभूला सांगा: ‘यहोवा असं म्हणतो, की “अश्‍शूरच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझी निंदा केली,+ ते ऐकून तू घाबरून जाऊ नकोस.+ ७ मी त्याच्या मनात एक विचार घालीन आणि तो एक बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल. नंतर त्याच्याच देशात तो तलवारीने मारला जाईल असं मी करीन.”’”+

८ मग रबशाकेने ऐकलं, की अश्‍शूरच्या राजाने लाखीशमधून+ आपला तळ हलवला आहे. तो त्याच्याकडे गेला, तेव्हा राजा लिब्ना शहराशी लढाई करत असल्याचा त्याला दिसला.+ ९ मग अश्‍शूरच्या राजाला अशी खबर मिळाली, की इथियोपियाचा राजा तिऱ्‍हाका हा आपल्याशी लढाई करायला आलाय. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हिज्कीयाकडे परत पाठवलं.+ तो त्यांना म्हणाला: १० “यहूदाचा राजा हिज्कीया याला जाऊन असं सांगा, ‘तुझा देव म्हणतो: “अश्‍शूरचा राजा यरुशलेमवर कब्जा करू शकणार नाही.” पण त्याच्यावर भरवसा ठेवू नकोस. तो तुला फसवतोय.+ ११ अश्‍शूरच्या राजांनी बाकीच्या सर्व देशांचा कसा नाश केला, हे तर तुला चांगलंच माहीत आहे.+ मग तू एकटाच कसा काय वाचशील? १२ माझ्या पूर्वजांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला, त्यांचे देव तरी त्यांना वाचवू शकले का? गोजान, हारान+ आणि रेसफ ही राष्ट्रं आता कुठे आहेत? तलस्सार इथे राहणारे एदेनचे लोक कुठे आहेत? १३ हमाथचा राजा आणि अर्पादचा राजा यांचं काय झालं? सफरवाईम, हेना आणि इव्वा+ या शहरांच्या राजाचं काय झालं?’”

१४ हिज्कीयाने दूतांच्या हातातली पत्रं घेऊन वाचली. मग तो यहोवाच्या मंदिरात गेला आणि त्याने ती पत्रं यहोवासमोर ठेवली.+ १५ तिथे हिज्कीया यहोवाला अशी प्रार्थना करू लागला:+ “हे इस्राएलच्या देवा यहोवा! तू करुबांच्या+ वर* विराजमान आहेस! तूच पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांचा खरा देव आहेस.+ आणि तूच आकाश व पृथ्वी बनवलीस. १६ हे यहोवा, कान लावून ऐक!+ हे यहोवा, डोळे उघड आणि पाहा!+ जिवंत देवाची निंदा करणाऱ्‍या सन्हेरीबच्या शब्दांकडे लक्ष दे. १७ हे यहोवा! हे खरंय, की अश्‍शूरच्या राजांनी राष्ट्रांचा आणि त्यांच्या जमिनींचा नाश केलाय.+ १८ आणि त्यांनी त्या राष्ट्रांच्या देवांना आगीत फेकून दिलंय. कारण ते काही खरे देव नव्हते;+ माणसांनीच बनवलेल्या त्या लाकडाच्या आणि दगडाच्या वस्तू होत्या.+ म्हणून ते त्यांचा नाश करू शकले. १९ पण आता हे यहोवा आमच्या देवा! कृपा करून आम्हाला त्याच्या हातून वाचव; म्हणजे, हे यहोवा! पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांना कळून येईल, की फक्‍त तूच देव आहेस.”+

२० तेव्हा, आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला असा संदेश पाठवला: “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, की ‘अश्‍शूरचा राजा सन्हेरीब याच्याविषयी+ तू मला केलेली प्रार्थना मी ऐकली आहे.+ २१ तर आता मी, यहोवा त्याच्याविषयी असं म्हणतो:

“सीयोनची कुमारी तुला तुच्छ समजते, ती तुझी थट्टा करते.

यरुशलेमची मुलगी आपलं डोकं हलवून तुझ्यावर हसते.

२२ तू कोणाची थट्टा केलीस? कोणाची निंदा केलीस?+

तू कोणाविरुद्ध आवाज चढवून बोललास?+

गर्वाने फुगून तू कोणाकडे बघितलंस?

इस्राएलच्या पवित्र देवाकडे!+

२३ तुझ्या दूतांद्वारे+ तू यहोवाची निंदा केलीस+ आणि म्हणालास:

‘माझे असंख्य युद्ध-रथ घेऊन

मी पर्वतांवर चढेन,

लबानोनच्या सर्वात दूरच्या भागांत मी जाईन.

त्याचे मोठमोठे देवदार वृक्ष, चांगली-चांगली गंधसरूची झाडं मी कापून टाकीन.

त्याच्या सर्वात आतल्या भागांत, घनदाट जंगलांत मी शिरेन.

२४ मी विदेश्‍यांच्या प्रदेशांत विहिरी खणून तिथलं पाणी पिईन;

माझ्या पायांच्या तळव्यांनी मी इजिप्तचे सगळे झरे* आटवून टाकीन.’

२५ पण तू हे ऐकलं नाहीस का? मी फार पूर्वीच हे ठरवलं होतं,+

खूप आधीच मी याची योजना केली होती.+

आणि आता मी ती पूर्ण करीन.+

तू तटबंदीची शहरं उद्ध्‌वस्त करून त्यांना दगडमातीचा ढिगारा बनवशील.+

२६ तिथे राहणारे हतबल होतील;

भीतीने त्यांचा थरकाप उडेल आणि त्यांना अपमानित केलं जाईल.

ते रानातल्या झाडपाल्यासारखे होतील; हिरव्या गवतासारखे दुर्बळ होतील.+

पूर्वेकडच्या वाऱ्‍याने सुकून गेलेल्या छतावरच्या गवतासारखे ते होतील.

२७ पण तुझं उठणं-बसणं, तुझं येणं-जाणं,+

तू कधी माझ्यावर क्रोधित होतोस, हे सगळं मला माहीत आहे.+

२८ तू माझ्यावर भडकलास+ आणि तुझी डरकाळी माझ्या कानांपर्यंत पोहोचली;+

म्हणून आता मी तुझ्या नाकात माझी वेसण, आणि तुझ्या तोंडात माझा लगाम घालीन.+

आणि ज्या रस्त्याने तू आलास, त्याच रस्त्याने मी तुला परत मागे घेऊन जाईन.”+

२९ आणि तुझ्यासाठी* हे चिन्ह असेल: या वर्षी तुम्ही आपोआप उगवलेलं* धान्य खाल; आणि दुसऱ्‍या वर्षी त्यातून अंकुरलेलं धान्य खाल.+ पण तिसऱ्‍या वर्षी मात्र तुम्ही धान्याची पेरणी आणि कापणी कराल. तसंच, तुम्ही द्राक्षमळे लावाल आणि त्यांचं फळ खाल.+ ३० यहूदाच्या घराण्यातले जे वाचतील,+ ते झाडाप्रमाणे खोलवर मूळ धरतील आणि फळ देतील. ३१ कारण उरलेले लोक यरुशलेममधून बाहेर निघतील, आणि बचावलेले सीयोन डोंगरातून बाहेर पडतील. सैन्यांचा देव यहोवा आपल्या आवेशामुळे हे घडवून आणेल.+

३२ अश्‍शूरच्या राजाविषयी यहोवा असं म्हणतो:+

“तो या शहरात येणार नाही,+

तो एक बाणसुद्धा मारणार नाही,

किंवा ढाल घेऊन सामना करणार नाही,

आणि वेढा घालण्यासाठी दगडमातीचा ढिगाराही रचणार नाही.+

३३ ज्या रस्त्याने तो आलाय, त्याच रस्त्याने तो परत मागे जाईल.

तो या शहरात पाऊलसुद्धा ठेवू शकणार नाही,” असं यहोवा म्हणतो.

३४ “माझ्या नावासाठी,+ आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी,+

मी या शहराचं रक्षण करीन+ आणि ते वाचवीन.”’”

३५ त्याच रात्री यहोवाच्या स्वर्गदूताने जाऊन अश्‍शूरी लोकांच्या छावणीतल्या १,८५,००० सैनिकांना ठार मारलं.+ मग लोक पहाटे उठले, तेव्हा त्यांना सगळीकडे मृतदेह पडलेले दिसले.+ ३६ त्यामुळे अश्‍शूरचा राजा सन्हेरीब परत निनवेला+ निघून गेला आणि तिथेच राहिला.+ ३७ एकदा सन्हेरीब राजा, निस्रोख या आपल्या दैवताच्या मंदिरात नमन करत होता. तेव्हा अद्रम्मेलेक व शरेसर या त्याच्या मुलांनी त्याला तलवारीने ठार मारलं.+ त्यानंतर ते अरारात+ देशात पळून गेले. आणि त्याचा मुलगा एसर-हद्दोन+ हा त्याच्या जागी राजा बनला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा