१ राजे
४ शलमोन राजा संपूर्ण इस्राएलवर राज्य करायचा.+ २ त्याच्या राज्यातले उच्च अधिकारी हे होते: सादोकचा+ मुलगा अजऱ्या हा याजक होता; ३ शिशाची मुलं अलिहोरेफ आणि अहीया हे सचिव होते;+ अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ हा इतिहास-लेखक होता; ४ यहोयादाचा मुलगा बनाया+ हा सेनापती होता; सादोक आणि अब्याथार+ हे याजक होते; ५ नाथानचा+ मुलगा अजऱ्या हा प्रांताधिकाऱ्यांचा प्रमुख होता; नाथानचा मुलगा जाबूद हा याजक आणि राजाचा मित्र+ होता; ६ अहीशार हा राजमहालातल्या कामांवर देखरेख करणारा होता; आणि अब्दाचा मुलगा अदोनीराम+ हा सक्तीची मजुरी करणाऱ्यांवर अधिकारी होता.+
७ शलमोनने संपूर्ण इस्राएलवर १२ प्रांताधिकारी नेमले होते. ते राजाला आणि त्याच्या घराण्याला अन्नसामग्री पुरवायचे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्यावर, वर्षातला एक महिना अन्नसामग्री पुरवायची जबाबदारी होती.+ ८ ते प्रांताधिकारी हे होते: एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर हूरचा मुलगा होता; ९ माकस, शालबीम,+ बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर देकरचा मुलगा होता; १० अरुबोथ प्रदेशावर हेसेदचा मुलगा होता (सोखो आणि हेफेरचा संपूर्ण प्रदेश त्याच्या अधिकाराखाली यायचा); ११ दोरच्या संपूर्ण उतारांच्या प्रदेशावर अबीनादाबचा मुलगा होता (शलमोनची मुलगी टाफाथ ही त्याची बायको होती); १२ तानख, मगिद्दो+ आणि बेथ-शानच्या+ संपूर्ण प्रदेशांवर अहीलूदचा मुलगा बाना होता; तसंच, तो बेथ-शानपासून आबेल-महोलापर्यंत आणि तिथून यकमामपर्यंतच्या+ संपूर्ण प्रदेशावरही होता (बेथ-शानचा प्रदेश इज्रेलच्या खाली व सारतानच्या शेजारी होता); १३ रामोथ-गिलाद+ प्रदेशावर गेबेरचा मुलगा होता (त्याच्या अधिकाराखाली मनश्शेचा मुलगा याईर+ याची गिलाद+ प्रदेशातली खेडी होती; तसंच, बाशानमध्ये+ असलेला अर्गोबचा+ प्रदेशही होता. या प्रदेशात, मजबूत भिंती आणि तांब्याचे अडसर असलेली ६० मोठी शहरं होती); १४ महनाइम+ प्रदेशावर इद्दोचा मुलगा अहीनादाब होता; १५ नफतालीच्या प्रदेशावर अहीमास होता (शलमोनची आणखी एक मुलगी बासमथ ही त्याची बायको होती); १६ आशेर आणि बालोथ प्रदेशांवर हूशयचा मुलगा बाना होता; १७ इस्साखारच्या प्रदेशावर पारूहाचा मुलगा यहोशाफाट होता; १८ बन्यामीनच्या+ प्रदेशावर एलाचा मुलगा शिमी+ होता; १९ गिलादच्या+ प्रदेशावर उरीचा मुलगा गेबेर होता (पूर्वी हा प्रदेश अमोऱ्यांचा राजा सीहोन+ आणि बाशानचा राजा ओग+ यांच्या अधिकाराखाली होता). या सगळ्या प्रांताधिकाऱ्यांवर एक प्रमुख अधिकारीही होता.
२० यहूदा आणि इस्राएलमधल्या लोकांची संख्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी अगणित होती.+ ते सगळे खाऊन-पिऊन आनंदी जीवन जगत होते.+
२१ शलमोनने नदीपासून*+ ते पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत सर्व राज्यांवर शासन केलं. शलमोन जिवंत होता तोपर्यंत या सर्व राज्यांनी त्याला नजराणे पाठवले आणि त्याची सेवा केली.+
२२ शलमोनच्या राजमहालात प्रत्येक दिवसाला लागणारी अन्नसामग्री इतकी होती: ३० कोर* मापं चांगलं पीठ, ६० कोर मापं पीठ; २३ १० धष्टपुष्ट गाय-बैल, कुरणांत चरणारे २० गाय-बैल, १०० मेंढरं; तसंच काही हरणं, सांबरं, भेकरं* आणि पोसलेले पक्षी. २४ नदीच्या+ या बाजूच्या* सर्व प्रदेशांवर, म्हणजे तिफसाहपासून गाझापर्यंतच्या+ सर्व प्रदेशांवर आणि तिथल्या राजांवर शलमोनचा अधिकार होता. आणि त्याच्या संपूर्ण राज्यात व आसपासच्या सगळ्या प्रदेशांत शांती होती.+ २५ शलमोनच्या संपूर्ण शासनकाळात, दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधले सगळे लोक आपापल्या द्राक्षवेलाखाली आणि अंजिराच्या झाडाखाली सुरक्षित व निर्भयपणे राहत होते.
२६ शलमोनकडे त्याच्या रथांच्या घोड्यांसाठी ४,०००* तबेले होते; त्याच्याकडे १२,००० घोडेसुद्धा* होते.+
२७ शलमोन राजाचे प्रांताधिकारी त्याच्यासाठी आणि त्याच्या मेजावर जेवणाऱ्या सर्वांसाठी अन्नसामग्री पुरवायचे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्यावर त्याला नेमून दिलेल्या महिन्यात अन्नसामग्री पुरवायची आणि कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी होती.+ २८ प्रत्येक जण त्याला नेमून दिल्याप्रमाणे घोड्यांसाठी, तसंच रथ ओढणाऱ्या घोड्यांसाठी जव आणि गवताच्या पेंढ्या हव्या त्या ठिकाणी पुरवायचा.
२९ देवाने शलमोनला अमर्याद बुद्धी आणि समजशक्ती दिली; त्याने त्याला समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या वाळूइतकी अमाप सुज्ञता दिली.*+ ३० शलमोनची बुद्धी पूर्वेकडच्या सर्व लोकांपेक्षा आणि इजिप्तच्या सर्व ज्ञानापेक्षा अफाट होती.+ ३१ इतर कोणत्याही माणसापेक्षा तो जास्त बुद्धिमान होता; तो एथान+ एज्राही आणि माहोलची मुलं हेमान,+ कल्कोल+ व दर्दा यांच्यापेक्षाही बुद्धिमान होता. आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.+ ३२ त्याने ३,००० नीतिवचनं रचली,*+ आणि त्याची १,००५ गीतंही+ होती. ३३ तो लबानोनच्या देवदार वृक्षांपासून ते भिंतीवर उगवणाऱ्या एजोबच्या*+ रोपट्यांपर्यंत सर्व वनस्पतींबद्दल बोलायचा; प्राणी,+ पक्षी,+ सरपटणारे प्राणी,+ कीटक आणि मासे यांबद्दलही तो बोलायचा. ३४ शलमोनच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक त्याच्याकडे यायचे; तसंच, पृथ्वीवरच्या ज्या राजांनी त्याच्या बुद्धीबद्दल ऐकलं, तेसुद्धा त्याच्याकडे यायचे.+