वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ राजे रूपरेषा

      • बाशाविरुद्ध यहोवाचा न्यायाचा संदेश (१-७)

      • इस्राएलचा राजा एलाह (८-१४)

      • इस्राएलचा राजा जिम्री (१५-२०)

      • इस्राएलचा राजा अम्री (२१-२८)

      • इस्राएलचा राजा अहाब (२९-३३)

      • हिएल यरीहो शहर पुन्हा बांधतो (३४)

१ राजे १६:१

समासातील संदर्भ

  • +२इत १६:७
  • +२इत १९:२; २०:३४

१ राजे १६:२

समासातील संदर्भ

  • +१शमु २:८
  • +१रा १३:३३

१ राजे १६:३

समासातील संदर्भ

  • +१रा १४:१०, ११; १५:२९

१ राजे १६:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

समासातील संदर्भ

  • +१रा १५:२१, ३३

१ राजे १६:७

समासातील संदर्भ

  • +१रा १५:२५-२९

१ राजे १६:१०

समासातील संदर्भ

  • +२रा ९:३१

१ राजे १६:११

तळटीपा

  • *

    किंवा “रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यांपैकी.”

१ राजे १६:१२

समासातील संदर्भ

  • +१रा १६:१-३

१ राजे १६:१३

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:२१; १शमु १२:२१; २रा १७:१५; यश ४१:२९

१ राजे १६:१५

समासातील संदर्भ

  • +यहो १९:४४, ४८; २१:२०, २३; १रा १५:२७

१ राजे १६:१६

समासातील संदर्भ

  • +२रा ८:२६; मीख ६:१६

१ राजे १६:१८

तळटीपा

  • *

    अतिशय उंच इमारत.

समासातील संदर्भ

  • +शास ९:५३, ५४; १शमु ३१:४; २शमु १७:२३

१ राजे १६:१९

समासातील संदर्भ

  • +१रा १२:२८-३०; १४:७, ९

१ राजे १६:२४

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

  • *

    म्हणजे, “शेमेरच्या कुळाचे.”

समासातील संदर्भ

  • +१रा २०:१; २रा १७:२४; आम ६:१; प्रेका ८:५

१ राजे १६:२५

समासातील संदर्भ

  • +मीख ६:१६

१ राजे १६:२६

समासातील संदर्भ

  • +१रा १२:२८-३०; १३:३३

१ राजे १६:२८

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

समासातील संदर्भ

  • +१रा १६:३३; २१:४, २०-२२; २रा १०:१

१ राजे १६:२९

समासातील संदर्भ

  • +१रा १६:२३, २४; यश ७:९

१ राजे १६:३०

समासातील संदर्भ

  • +१रा १६:२५; २१:२५; २रा ३:१, २

१ राजे १६:३१

समासातील संदर्भ

  • +१रा १२:२८-३०
  • +उत्प १०:१५
  • +१रा १८:४, १९; २१:७; २रा ९:३०; प्रक २:२०
  • +शास २:११; १०:६; २रा १०:१९; १७:१६

१ राजे १६:३२

समासातील संदर्भ

  • +२रा १०:२१, २७

१ राजे १६:३३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:१३; २रा १०:२६, २८; १३:६

१ राजे १६:३४

समासातील संदर्भ

  • +यहो ६:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९८, पृ. २१-२२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ राजे १६:१२इत १६:७
१ राजे १६:१२इत १९:२; २०:३४
१ राजे १६:२१शमु २:८
१ राजे १६:२१रा १३:३३
१ राजे १६:३१रा १४:१०, ११; १५:२९
१ राजे १६:६१रा १५:२१, ३३
१ राजे १६:७१रा १५:२५-२९
१ राजे १६:१०२रा ९:३१
१ राजे १६:१२१रा १६:१-३
१ राजे १६:१३अनु ३२:२१; १शमु १२:२१; २रा १७:१५; यश ४१:२९
१ राजे १६:१५यहो १९:४४, ४८; २१:२०, २३; १रा १५:२७
१ राजे १६:१६२रा ८:२६; मीख ६:१६
१ राजे १६:१८शास ९:५३, ५४; १शमु ३१:४; २शमु १७:२३
१ राजे १६:१९१रा १२:२८-३०; १४:७, ९
१ राजे १६:२४१रा २०:१; २रा १७:२४; आम ६:१; प्रेका ८:५
१ राजे १६:२५मीख ६:१६
१ राजे १६:२६१रा १२:२८-३०; १३:३३
१ राजे १६:२८१रा १६:३३; २१:४, २०-२२; २रा १०:१
१ राजे १६:२९१रा १६:२३, २४; यश ७:९
१ राजे १६:३०१रा १६:२५; २१:२५; २रा ३:१, २
१ राजे १६:३११रा १२:२८-३०
१ राजे १६:३१उत्प १०:१५
१ राजे १६:३११रा १८:४, १९; २१:७; २रा ९:३०; प्रक २:२०
१ राजे १६:३१शास २:११; १०:६; २रा १०:१९; १७:१६
१ राजे १६:३२२रा १०:२१, २७
१ राजे १६:३३निर्ग ३४:१३; २रा १०:२६, २८; १३:६
१ राजे १६:३४यहो ६:२६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ राजे १६:१-३४

१ राजे

१६ मग हनानीचा+ मुलगा येहू+ याला यहोवाकडून बाशाविरुद्ध असा न्यायाचा संदेश मिळाला: २ “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी बनवलं.+ पण तू मात्र यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिलास. तू माझ्या इस्राएली लोकांना पाप करायला लावलंस आणि त्यांनी केलेल्या पापांमुळे माझा क्रोध भडकला.+ ३ म्हणून मी बाशाचा आणि त्याच्या घराण्याचा समूळ नाश करणार आहे. नबाटचा मुलगा यराबाम याच्या घराण्याच्या बाबतीत मी जे केलं,+ तेच बाशाच्या घराण्याचंही करीन. ४ बाशाच्या घराण्यातला जो कोणी शहरात मरेल, त्याला कुत्री खाऊन टाकतील; आणि त्याच्या घराण्यातला जो कोणी मैदानावर मरेल, त्याला आकाशातले पक्षी खाऊन टाकतील.”

५ बाशाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याची पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ६ मग बाशाचा मृत्यू झाला* आणि त्याला तिरसा+ या ठिकाणी दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा एलाह त्याच्या जागी राजा बनला. ७ यराबामच्या घराण्याप्रमाणेच बाशाने यहोवाच्या नजरेत अनेक वाईट कामं केली आणि आपल्या कृत्यांमुळे त्याचा क्रोध भडकवला. तसंच, त्याने नादाबला ठारही मारलं.+ या दोन गोष्टींमुळे यहोवाने हनानीचा मुलगा येहू याला बाशाविरुद्ध न्यायाचा संदेश दिला.

८ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या २६ व्या वर्षी बाशाचा मुलगा एलाह हा तिरसा इथे इस्राएलचा राजा बनला. आणि त्याने दोन वर्षं राज्य केलं. ९ मग एलाहच्या रथांच्या अर्ध्या दलाचा अधिकारी असलेला त्याचा सेवक जिम्री याने त्याच्याविरुद्ध कट रचला. त्या वेळी एलाह हा तिरसा या ठिकाणी, आपल्या राजमहालाची व्यवस्था पाहणाऱ्‍या अरसाच्या घरी दारू पिऊन धुंद झाला होता. १० तेव्हा जिम्री आत आला आणि त्याने त्याच्यावर वार करून त्याला ठार मारलं.+ मग तो त्याच्या जागी राजा बनला. यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या २७ व्या वर्षी हे घडलं. ११ राजासनावर बसून राज्य सुरू करताच त्याने बाशाच्या घराण्यातल्या सगळ्यांना मारून टाकलं; त्याच्या नातेवाइकांपैकी* किंवा मित्रांपैकी एकही पुरुष किंवा मुलगा त्याने जिवंत सोडला नाही. १२ अशा प्रकारे जिम्रीने बाशाच्या घराण्याचा समूळ नाश केला. येहू संदेष्ट्याद्वारे यहोवाने बाशाबद्दल जसं सांगितलं होतं तसंच घडलं.+ १३ बाशा आणि त्याचा मुलगा एलाह यांनी अनेक वाईट कामं केली होती. तसंच त्यांनी इस्राएली लोकांनाही वाईट कामं करायला लावली होती; त्यांना आपल्या निरर्थक मूर्तींची उपासना करायला लावून त्यांनी इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला होता.+ आणि यामुळे हे सगळं घडलं. १४ एलाहबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.

१५ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या २७ व्या वर्षी जिम्री हा सात दिवसांसाठी तिरसा इथे राजा बनला. त्या वेळी इस्राएलच्या सैनिकांनी पलिष्टी लोकांच्या गिब्बथोन+ शहरावर हल्ला करण्यासाठी तिथे छावणी दिली होती. १६ जिम्रीने कट करून राजाला ठार मारलं आहे, ही गोष्ट छावणीतल्या सैनिकांनी ऐकली. म्हणून त्या दिवशी सर्व इस्राएलने राजाच्या सेनापतीला, म्हणजे अम्रीला+ छावणीतच इस्राएलचा राजा बनवलं. १७ मग अम्री आणि त्याच्यासोबत असलेले सर्व इस्राएली सैनिक गिब्बथोन इथून निघाले आणि त्यांनी जाऊन तिरसा शहराला वेढा घातला. १८ शहरावर कब्जा करण्यात आला आहे हे जेव्हा जिम्रीने पाहिलं, तेव्हा तो राजमहालाच्या मनोऱ्‍यात* गेला आणि राजमहालाला आग लावून तो स्वतः त्या आगीत जळून मेला.+ १९ जिम्रीने स्वतः केलेल्या पापांमुळे हे घडून आलं. त्याने, इस्राएलला पाप करायला लावणाऱ्‍या यराबामच्या मार्गाने चालून यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते केलं.+ २० जिम्रीबद्दलची बाकीची माहिती आणि त्याने केलेला कट यांबद्दल इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.

२१ त्या वेळी इस्राएली लोकांमध्ये दोन गट पडले. एका गटातल्या लोकांना गीनथचा मुलगा तिब्नी याला राजा बनवायची इच्छा होती, म्हणून ते त्याच्या बाजूने झाले; तर दुसरा गट अम्रीच्या बाजूने झाला. २२ पण अम्रीच्या बाजूने असलेले लोक, गीनथचा मुलगा तिब्नी याच्या बाजूने असलेल्या लोकांपेक्षा वरचढ ठरले. त्यामुळे तिब्नी मेला आणि अम्री हा राजा बनला.

२३ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या ३१ व्या वर्षी अम्री इस्राएलचा राजा बनला. त्याने १२ वर्षं राज्य केलं. तिरसा या ठिकाणी त्याने सहा वर्षं राज्य केलं. २४ त्याने दोन तालान्त* चांदी देऊन शेमेर याच्याकडून शोमरोनचा डोंगर विकत घेतला व त्यावर एक शहर बांधलं. आणि आपण बांधलेल्या या शहराला त्याने डोंगराचा मालक शेमेर याच्या नावावरून शोमरोन*+ असं नाव दिलं. २५ अम्री हा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. त्याने आपल्याआधी होऊन गेलेल्या सगळ्यांपेक्षा जास्त वाईट कामं केली.+ २६ तो नबाटचा मुलगा यराबाम याच्या मार्गांवर चालत राहिला. यराबामने इस्राएलला पाप करायला लावलं होतं; त्याने त्यांना निरर्थक मूर्तींची उपासना करायला लावून+ इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला होता. २७ अम्रीबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २८ मग अम्रीचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोन इथे दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अहाब+ त्याच्या जागी राजा बनला.

२९ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या ३८ व्या वर्षी अम्रीचा मुलगा अहाब हा इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोन+ इथून इस्राएलवर २२ वर्षं राज्य केलं. ३० यहोवाच्या नजरेत, अम्रीचा मुलगा अहाब हा त्याच्याआधी होऊन गेलेल्या सगळ्यांपेक्षा जास्त दुष्ट होता.+ ३१ तो नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापी मार्गांवर चालत राहिला.+ आणि हेही कमी म्हणून की काय, त्याने सीदोनी+ लोकांचा राजा एथबाल याची मुलगी ईजबेल+ हिच्याशी लग्न केलं. आणि तो बआल दैवताची उपासना करू लागला+ व त्याच्या पाया पडू लागला. ३२ तसंच, त्याने शोमरोन इथे बांधलेल्या बआलच्या मंदिरात+ बआलसाठी एक वेदीसुद्धा तयार केली. ३३ याशिवाय अहाबने पूजेचा खांबही* उभा केला.+ अशा प्रकारे, अहाबने आपल्याआधी होऊन गेलेल्या इस्राएलच्या सर्व राजांपेक्षा जास्त वाईट कामं करून इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला.

३४ अहाबच्या शासनकाळात बेथेलचा राहणारा हिएल याने यरीहो शहर पुन्हा बांधलं. त्याने शहराचा पाया घातला, तेव्हा त्याचा पहिला मुलगा अबीराम हा मेला; आणि त्याने शहराचे दरवाजे बसवले, तेव्हा त्याचा सर्वात लहान मुलगा सगूब हा मेला. यहोवाने नूनचा मुलगा यहोशवा याच्याद्वारे सांगितलं होतं अगदी तसंच घडलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा