वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ राजे रूपरेषा

      • शबाची राणी शलमोनला भेटायला येते (१-१३)

      • शलमोनची अमाप धनसंपत्ती (१४-२९)

१ राजे १०:१

तळटीपा

  • *

    किंवा “कोडी घालून.”

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२९
  • +२इत ९:१, २; मत्त १२:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९९, पृ. ३०

१ राजे १०:२

तळटीपा

  • *

    किंवा “लवाजमा.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ७२:१०
  • +निर्ग २५:३, ६; २रा २०:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९९, पृ. ३०

१ राजे १०:४

समासातील संदर्भ

  • +१रा ३:२८; उप १२:९
  • +२इत ९:३-८

१ राजे १०:५

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९९, पृ. ३०-३१

१ राजे १०:६

तळटीपा

  • *

    किंवा “तुमच्या शब्दांबद्दल.”

१ राजे १०:८

समासातील संदर्भ

  • +नीत ८:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९९, पृ. २०

१ राजे १०:९

समासातील संदर्भ

  • +१रा ५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९९, पृ. २०

१ राजे १०:१०

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:११
  • +स्तो ७२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९९, पृ. २०

    ७/१/१९९९, पृ. ३०-३१

१ राजे १०:११

समासातील संदर्भ

  • +१रा ९:२७, २८; स्तो ४५:९
  • +२इत ९:१०, ११
  • +२इत २:८

१ राजे १०:१२

समासातील संदर्भ

  • +२इत ५:१२; स्तो १५०:३

१ राजे १०:१३

समासातील संदर्भ

  • +२इत ९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९९, पृ. ३०-३१

१ राजे १०:१४

समासातील संदर्भ

  • +२इत ९:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९८, पृ. ३

    १०/१५/१९९६, पृ. ८-९

१ राजे १०:१६

तळटीपा

  • *

    एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१रा १४:२५, २६
  • +२इत ९:१५, १६

१ राजे १०:१७

तळटीपा

  • *

    सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.

  • *

    हिब्रू शास्त्रवचनांत, एक मिना म्हणजे ५७० ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१रा ७:२

१ राजे १०:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो १२२:२, ५
  • +२इत ९:१७-१९

१ राजे १०:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:९; गण २३:२४; २४:९

१ राजे १०:२१

समासातील संदर्भ

  • +१रा ७:२
  • +२इत ९:२०, २१

१ राजे १०:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:४; स्तो ७२:१०; यहे २७:१२; योन १:३
  • +१रा १०:१८

१ राजे १०:२३

समासातील संदर्भ

  • +उप ५:१९
  • +१रा ३:१२, १३; ४:२९; २इत ९:२२-२४

१ राजे १०:२४

समासातील संदर्भ

  • +नीत २:६

१ राजे १०:२५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

१ राजे १०:२६

तळटीपा

  • *

    किंवा “घोडेस्वार.”

  • *

    किंवा “घोडेस्वार.”

समासातील संदर्भ

  • +अनु १७:१५, १६; १रा ४:२६
  • +२इत १:१४; ९:२५

१ राजे १०:२७

समासातील संदर्भ

  • +२इत १:१५; ९:२७

१ राजे १०:२८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “कळपचे कळप इजिप्त आणि कोवा देशातून विकत घ्यायचे; राजाचे व्यापारी कोवामधून ते विकत घ्यायचे.” कोवा हे कदाचित किलिकिया असावं.

समासातील संदर्भ

  • +२इत १:१६, १७; ९:२८

१ राजे १०:२९

समासातील संदर्भ

  • +यहो १:४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ राजे १०:११रा ४:२९
१ राजे १०:१२इत ९:१, २; मत्त १२:४२
१ राजे १०:२स्तो ७२:१०
१ राजे १०:२निर्ग २५:३, ६; २रा २०:१३
१ राजे १०:४१रा ३:२८; उप १२:९
१ राजे १०:४२इत ९:३-८
१ राजे १०:५१रा ४:२२
१ राजे १०:८नीत ८:३४
१ राजे १०:९१रा ५:७
१ राजे १०:१०उत्प ४३:११
१ राजे १०:१०स्तो ७२:१०
१ राजे १०:१११रा ९:२७, २८; स्तो ४५:९
१ राजे १०:११२इत ९:१०, ११
१ राजे १०:११२इत २:८
१ राजे १०:१२२इत ५:१२; स्तो १५०:३
१ राजे १०:१३२इत ९:१२
१ राजे १०:१४२इत ९:१३, १४
१ राजे १०:१६१रा १४:२५, २६
१ राजे १०:१६२इत ९:१५, १६
१ राजे १०:१७१रा ७:२
१ राजे १०:१८स्तो १२२:२, ५
१ राजे १०:१८२इत ९:१७-१९
१ राजे १०:१९उत्प ४९:९; गण २३:२४; २४:९
१ राजे १०:२११रा ७:२
१ राजे १०:२१२इत ९:२०, २१
१ राजे १०:२२उत्प १०:४; स्तो ७२:१०; यहे २७:१२; योन १:३
१ राजे १०:२२१रा १०:१८
१ राजे १०:२३उप ५:१९
१ राजे १०:२३१रा ३:१२, १३; ४:२९; २इत ९:२२-२४
१ राजे १०:२४नीत २:६
१ राजे १०:२६अनु १७:१५, १६; १रा ४:२६
१ राजे १०:२६२इत १:१४; ९:२५
१ राजे १०:२७२इत १:१५; ९:२७
१ राजे १०:२८२इत १:१६, १७; ९:२८
१ राजे १०:२९यहो १:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ राजे १०:१-२९

१ राजे

१० शलमोनला यहोवाच्या नावामुळे जी कीर्ती मिळत होती त्याबद्दल शबाच्या राणीने ऐकलं.+ तेव्हा ती त्याला अतिशय कठीण प्रश्‍न विचारून* त्याची परीक्षा पाहायला आली.+ २ ती एक भला-मोठा काफिला* घेऊन यरुशलेममध्ये आली.+ येताना तिने अतिशय मोठ्या प्रमाणात सोनं, मौल्यवान रत्नं आणि बाल्सम* तेल+ उंटांवर लादून आणलं. मग ती शलमोनकडे गेली आणि तिला जे काही जाणून घ्यायचं होतं ते सर्व तिने त्याला विचारलं. ३ शलमोनने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरं दिली. असा एकही प्रश्‍न नव्हता जो तिला समजावून सांगणं राजाला कठीण गेलं.

४ शबाच्या राणीने जेव्हा शलमोनची बुद्धिमत्ता,+ त्याने बांधलेला राजमहाल,+ ५ त्याच्या मेजावरची पक्वान्‍नं,+ त्याच्या सेवकांची बसण्याची व्यवस्था, जेवण वाढणाऱ्‍यांचा पोशाख आणि त्यांची सेवा, त्याचे प्यालेबरदार पाहिले; तसंच, तो यहोवाच्या मंदिरात नियमितपणे अर्पण करत असलेली बलिदानं तिने पाहिली तेव्हा ती अगदी थक्क झाली. ६ ती राजाला म्हणाली: “तुम्ही केलेल्या मोठमोठ्या गोष्टींबद्दल* आणि तुमच्या बुद्धीबद्दल मी माझ्या देशात जे काही ऐकलं होतं ते अगदी खरंय. ७ पण प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी पाहण्याआधी मी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला नव्हता. आणि खरंतर मी जे काही पाहिलंय, त्यातलं अर्धंसुद्धा मला सांगण्यात आलं नव्हतं! मी ऐकलं होतं त्यापेक्षा तुमची बुद्धी आणि तुमचं ऐश्‍वर्य कितीतरी पटीने जास्त आहे. ८ तुमच्या सर्व माणसांना आणि सेवेसाठी नेहमी हजर असलेल्या तुमच्या सेवकांना तुमच्याकडून बुद्धीचे शब्द ऐकायला मिळतात, ही त्यांच्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे!+ ९ तुम्हाला मोठ्या आनंदाने इस्राएलच्या राजासनावर विराजमान करणाऱ्‍या तुमच्या यहोवा देवाचा गौरव होवो.+ यहोवाने इस्राएलवर असलेल्या आपल्या अपार प्रेमामुळेच, तुम्हाला न्यायनीतीने शासन करण्यासाठी राजा म्हणून नियुक्‍त केलंय.”

१० मग शबाच्या राणीने शलमोन राजाला १२० तालान्त* सोनं आणि अतिशय मोठ्या प्रमाणात बाल्सम तेल+ व मौल्यवान रत्नं दिली.+ तिने राजाला जितक्या प्रमाणात बाल्सम तेल दिलं, तितकं पुन्हा कधीही कोणी दिलं नाही.

११ ओफीर+ इथून हीरामच्या जहाजांच्या ताफ्याने सोन्यासोबतच मौल्यवान रत्नं+ आणि अतिशय मोठ्या प्रमाणात रक्‍तचंदनाची लाकडंही+ आणली. १२ राजाने रक्‍तचंदनाच्या लाकडांपासून यहोवाच्या मंदिरासाठी आणि राजमहालासाठी आधार देणारे कठडे बनवले. तसंच, त्याने त्यांपासून गायकांसाठी वीणा आणि तंतुवाद्यंही बनवली.+ या प्रकारचं रक्‍तचंदनाचं लाकूड पुन्हा कधीही आणण्यात आलं नाही किंवा आजपर्यंत पाहण्यात आलं नाही.

१३ शलमोन राजाने शबाच्या राणीला मोठ्या उदारतेने अनेक भेटवस्तू दिल्या. याशिवाय, तिला जे काही हवं होतं आणि तिने जे काही मागितलं ते सर्व त्याने तिला दिलं. त्यानंतर ती आपल्या सेवकांसोबत आपल्या देशात परत गेली.+

१४ शलमोनला दरवर्षी ६६६ तालान्त सोनं मिळायचं.+ १५ यासोबतच व्यापाऱ्‍यांकडून, सौदा करणाऱ्‍यांकडून, तसंच अरबच्या सर्व राजांकडून आणि देशातल्या सगळ्या राज्यपालांकडून त्याला करही मिळायचा.

१६ शलमोन राजाने मिश्र सोन्याच्या २०० मोठ्या ढाली बनवल्या+ (प्रत्येक ढाल बनवायला ६०० शेकेल* सोनं लागलं).+ १७ तसंच, त्याने मिश्र सोन्याच्या ३०० छोट्या ढालीही* बनवल्या (प्रत्येक छोटी ढाल बनवायला तीन मिना* सोनं लागलं). मग राजाने त्या सर्व ढाली लबानोन-वनगृहात+ ठेवल्या.

१८ राजाने हस्तिदंताचं एक भव्य राजासनसुद्धा बनवलं+ आणि ते शुद्ध सोन्याने मढवलं.+ १९ राजासनापर्यंत चढून जाण्यासाठी सहा पायऱ्‍या होत्या आणि राजासनाच्या वर एक गोलाकार छत्र होतं. त्याच्या दोन्ही बाजूंना हात ठेवण्यासाठी आधार असून त्यांच्या बाजूला सिंहांचे+ दोन पुतळे उभे करण्यात आले होते. २० सहा पायऱ्‍यांवर दोन्ही बाजूंना एकेक असे १२ सिंहांचे पुतळे उभे करण्यात आले होते. अशा प्रकारचं राजासन दुसऱ्‍या कोणत्याही राज्यात बनवण्यात आलं नव्हतं.

२१ शलमोन राजाकडे असलेले पिण्याचे सर्व प्याले सोन्याचे होते. तसंच, लबानोन-वनगृहातली+ सर्व भांडीसुद्धा शुद्ध सोन्याची होती. कुठलीही वस्तू चांदीची नव्हती. कारण शलमोनच्या काळात चांदीला कोणीही विचारत नव्हतं.+ २२ हीरामच्या जहाजांच्या ताफ्यासोबत, राजाचाही तार्शीशच्या जहाजांचा ताफा+ समुद्रावर होता. तार्शीशची ही जहाजं तीन वर्षांतून एकदा सोनं, चांदी, हस्तिदंत,+ वानरं आणि मोर घेऊन यायची.

२३ संपूर्ण पृथ्वीवर शलमोन राजाइतका श्रीमंत+ आणि बुद्धिमान राजा दुसरा कोणीही नव्हता.+ २४ देवाने शलमोनला अफाट बुद्धी दिली होती.+ आणि त्याच्या तोंडून बुद्धीचे बोल ऐकण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्‍यांतून लोक त्याच्याकडे यायचे. २५ येताना ते राजासाठी काही ना काही नजराणा घेऊन यायचे. ते आपल्यासोबत सोन्या-चांदीच्या वस्तू, तसंच वस्त्रं, शस्त्रं, बाल्सम* तेल, घोडे आणि खेचरं आणायचे; असं वर्षानुवर्षं चालत राहिलं.

२६ शलमोन स्वतःसाठी रथ आणि घोडे* जमा करत राहिला. त्याच्याकडे १,४०० रथ आणि १२,००० घोडे* होते.+ त्यातले काही त्याने रथांसाठी बांधलेल्या शहरांत आणि काही स्वतःजवळ यरुशलेममध्ये ठेवले.+

२७ शलमोन राजाने यरुशलेममध्ये चांदीचं प्रमाण दगडांइतकं आणि देवदाराच्या लाकडाचं प्रमाण शेफीलातल्या उंबराच्या झाडांइतकं मुबलक केलं.+

२८ शलमोनसाठी इजिप्तमधून घोडे मागवले जायचे. राजाचे व्यापारी घोड्यांच्या कळपाची किंमत ठरवून कळपचे कळप विकत घ्यायचे.*+ २९ इजिप्तमधून मागवलेल्या प्रत्येक रथाची किंमत ६०० चांदीचे तुकडे आणि प्रत्येक घोड्याची किंमत १५० चांदीचे तुकडे इतकी होती; मग राजाचे व्यापारी हे रथ आणि घोडे हित्ती लोकांच्या+ सर्व राजांना आणि सीरियाच्या सर्व राजांना विकायचे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा