वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • नाथान दावीदचं ताडन करतो (१-१५क)

      • बथशेबाच्या मुलाचा मृत्यू (१५ख-२३)

      • बथशेबा शलमोनला जन्म देते (२४, २५)

      • अम्मोनी लोकांच्या राब्बा शहरावर कब्जा (२६-३१)

२ शमुवेल १२:१

समासातील संदर्भ

  • +१रा १:८; १इत १७:१; २९:२९
  • +स्तो ५१:उपरीलेखन

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१०, पृ. २१

२ शमुवेल १२:२

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:१३; १५:१६

२ शमुवेल १२:३

समासातील संदर्भ

  • +२शमु ११:३

२ शमुवेल १२:४

समासातील संदर्भ

  • +२शमु ११:४

२ शमुवेल १२:५

समासातील संदर्भ

  • +अनु ६:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१०, पृ. २१

२ शमुवेल १२:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:१

२ शमुवेल १२:७

समासातील संदर्भ

  • +१शमु १६:१३; २शमु ७:८
  • +१शमु १८:१०, ११; १९:१०; २३:१४

२ शमुवेल १२:८

समासातील संदर्भ

  • +१शमु १३:१३, १४; १५:२६, २८
  • +२शमु ३:७; १रा २:२२
  • +२शमु २:४; ५:५
  • +२शमु ७:१९

२ शमुवेल १२:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याचा शब्द.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:१३
  • +२शमु ११:१५, २७
  • +निर्ग २०:१४, १७

२ शमुवेल १२:१०

समासातील संदर्भ

  • +गण १४:१८; २शमु १३:३२; १८:३३; गल ६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१०, पृ. २१

२ शमुवेल १२:११

तळटीपा

  • *

    किंवा “तुझ्या साथीदाराला.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:१५, १९; १३:१०-१५; १५:१४
  • +निर्ग २१:२४; ईयो ३१:९-११; ३४:११
  • +२शमु १६:२१, २२

२ शमुवेल १२:१२

समासातील संदर्भ

  • +२शमु ११:४, १५

२ शमुवेल १२:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ३९:९; स्तो ३२:५; ३८:३; ५१:उपरीलेखन; ५१:४; नीत २८:१३
  • +निर्ग ३४:६; स्तो ३२:१
  • +लेवी २०:१०; स्तो १०३:१०

२ शमुवेल १२:१६

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:२२; योन ३:८, ९

२ शमुवेल १२:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “घरात.”

समासातील संदर्भ

  • +रूथ ३:३; २शमु १४:२
  • +२शमु ६:१७

२ शमुवेल १२:२२

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:१६; योए १:१४
  • +यश ३८:३, ५; योए २:१३, १४; आम ५:१५; योन ३:८, ९

२ शमुवेल १२:२३

समासातील संदर्भ

  • +उप ९:६
  • +ईयो ३०:२३; उप ३:२०; प्रेका २:२९, ३४; १३:३६
  • +उप ९:५, १०

२ शमुवेल १२:२४

तळटीपा

  • *

    “शांती,” या अर्थाच्या हिब्रू शब्दावरून.

समासातील संदर्भ

  • +२शमु ११:३
  • +१इत ३:५, ९; २२:९; २८:५; मत्त १:६
  • +२शमु ७:१२; १इत २९:१

२ शमुवेल १२:२५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “याहला प्रिय.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:४, ५; १२:१; १रा १:८

२ शमुवेल १२:२६

तळटीपा

  • *

    किंवा “राजनगर.”

समासातील संदर्भ

  • +अनु २३:३, ६
  • +अनु ३:११; यहो १३:२४, २५
  • +२शमु ११:२५; १इत २०:१

२ शमुवेल १२:२७

तळटीपा

  • *

    कदाचित शहराला पाणीपुरवठा करणारे स्रोत.

समासातील संदर्भ

  • +२शमु ११:१

२ शमुवेल १२:२८

तळटीपा

  • *

    शब्दशः “ते माझ्या नावाने ओळखलं जायचं.”

२ शमुवेल १२:३०

तळटीपा

  • *

    अम्मोनी लोकांचं एक दैवत. इतर ठिकाणी त्याला मोलख किंवा मिलकोम असं म्हटलं आहे.

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१इत २०:२, ३
  • +२शमु ८:११, १२

२ शमुवेल १२:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००५, पृ. २७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. १२:११रा १:८; १इत १७:१; २९:२९
२ शमु. १२:१स्तो ५१:उपरीलेखन
२ शमु. १२:२२शमु ५:१३; १५:१६
२ शमु. १२:३२शमु ११:३
२ शमु. १२:४२शमु ११:४
२ शमु. १२:५अनु ६:१३
२ शमु. १२:६निर्ग २२:१
२ शमु. १२:७१शमु १६:१३; २शमु ७:८
२ शमु. १२:७१शमु १८:१०, ११; १९:१०; २३:१४
२ शमु. १२:८१शमु १३:१३, १४; १५:२६, २८
२ शमु. १२:८२शमु ३:७; १रा २:२२
२ शमु. १२:८२शमु २:४; ५:५
२ शमु. १२:८२शमु ७:१९
२ शमु. १२:९निर्ग २०:१३
२ शमु. १२:९२शमु ११:१५, २७
२ शमु. १२:९निर्ग २०:१४, १७
२ शमु. १२:१०गण १४:१८; २शमु १३:३२; १८:३३; गल ६:७
२ शमु. १२:११२शमु १२:१५, १९; १३:१०-१५; १५:१४
२ शमु. १२:११निर्ग २१:२४; ईयो ३१:९-११; ३४:११
२ शमु. १२:११२शमु १६:२१, २२
२ शमु. १२:१२२शमु ११:४, १५
२ शमु. १२:१३उत्प ३९:९; स्तो ३२:५; ३८:३; ५१:उपरीलेखन; ५१:४; नीत २८:१३
२ शमु. १२:१३निर्ग ३४:६; स्तो ३२:१
२ शमु. १२:१३लेवी २०:१०; स्तो १०३:१०
२ शमु. १२:१६२शमु १२:२२; योन ३:८, ९
२ शमु. १२:२०रूथ ३:३; २शमु १४:२
२ शमु. १२:२०२शमु ६:१७
२ शमु. १२:२२२शमु १२:१६; योए १:१४
२ शमु. १२:२२यश ३८:३, ५; योए २:१३, १४; आम ५:१५; योन ३:८, ९
२ शमु. १२:२३उप ९:६
२ शमु. १२:२३ईयो ३०:२३; उप ३:२०; प्रेका २:२९, ३४; १३:३६
२ शमु. १२:२३उप ९:५, १०
२ शमु. १२:२४२शमु ११:३
२ शमु. १२:२४१इत ३:५, ९; २२:९; २८:५; मत्त १:६
२ शमु. १२:२४२शमु ७:१२; १इत २९:१
२ शमु. १२:२५२शमु ७:४, ५; १२:१; १रा १:८
२ शमु. १२:२६अनु २३:३, ६
२ शमु. १२:२६अनु ३:११; यहो १३:२४, २५
२ शमु. १२:२६२शमु ११:२५; १इत २०:१
२ शमु. १२:२७२शमु ११:१
२ शमु. १२:३०१इत २०:२, ३
२ शमु. १२:३०२शमु ८:११, १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल १२:१-३१

२ शमुवेल

१२ म्हणून यहोवाने नाथानला+ दावीदकडे पाठवलं. नाथान दावीदकडे आला+ आणि त्याला म्हणाला: “एका शहरात दोन माणसं राहत होती. एक श्रीमंत, तर दुसरा गरीब. २ श्रीमंत माणसाकडे भरपूर मेंढरं आणि गुरंढोरं होती.+ ३ पण गरीब माणसाकडे एका लहानशा मेंढीशिवाय दुसरं काहीच नव्हतं.+ त्याने ती विकत आणून तिची चांगली काळजी घेतली. ती त्याच्या मुलाबाळांसोबत त्याच्यासमोर वाढली. ती त्याच्या घासातला घास खायची, त्याच्या प्याल्यातून पाणी प्यायची आणि त्याच्या कुशीत झोपायची. त्या माणसासाठी ती त्याच्या मुलीसारखीच झाली होती. ४ एकदा श्रीमंत माणसाच्या घरी एक पाहुणा आला. पण त्याच्याकडे आलेल्या त्या प्रवाशासाठी जेवण बनवायला त्याने स्वतःच्या मेंढरांतून किंवा गुराढोरांतून काहीएक घेतलं नाही. त्याऐवजी, त्याने त्या गरीब माणसाची ती मेंढी घेतली आणि त्या पाहुण्यासाठी जेवण तयार केलं.”+

५ हे ऐकून दावीदला त्या माणसाचा भयंकर राग आला. आणि तो नाथानला म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ,+ ज्या माणसाने हे केलं त्याला मृत्युदंड मिळालाच पाहिजे! ६ त्याने काही दयामाया न दाखवता हे कृत्य केलंय. म्हणून त्या मेंढीच्या बदल्यात त्याला चार पटीने भरपाई करावीच लागेल.”+

७ मग नाथान दावीदला म्हणाला: “तो माणूस तूच आहेस! इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘मीच तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त केलं होतं.+ आणि मीच तुला शौलच्या हातून वाचवलं होतं.+ ८ मी तुला तुझ्या मालकाचं घराणं+ आणि तुझ्या मालकाच्या बायका दिल्या.+ तसंच इस्राएलचं आणि यहूदाचं घराणंही मी तुला दिलं.+ आणि जर तेही कमी पडलं असतं, तर मी तुझ्यासाठी आणखी बरंच काही करायला तयार होतो.+ ९ तर मग, यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे ते करून तू त्याला* तुच्छ का लेखलंस? तू उरीया हित्तीला तलवारीने मारून टाकलंस!+ अम्मोनी लोकांच्या तलवारीने त्याचा खून करून+ तू त्याची बायको आपली बायको करून घेतलीस.+ १० पाहा! आता तुझ्या घरातून तलवार कधीही दूर होणार नाही.+ कारण तू मला तुच्छ लेखलंस आणि उरीया हित्तीची बायको आपली बायको करून घेतलीस.’ ११ यहोवा म्हणतो: ‘मी तुझ्याच घरातून तुझ्यावर संकटं आणीन.+ तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या बायका घेऊन दुसऱ्‍या माणसाला* देईन.+ आणि तो भरदिवसा तुझ्या बायकांसोबत संबंध ठेवेल.+ १२ तू गुप्तपणे हे काम केलंस.+ पण मी संपूर्ण इस्राएलच्या समोर, दिवसाढवळ्या हे घडवून आणीन.’”

१३ तेव्हा दावीद नाथानला म्हणाला: “मी यहोवाविरुद्ध पाप केलंय.”+ त्यावर नाथान दावीदला म्हणाला: “यहोवानेही तुझं पाप माफ केलंय.+ तू मरणार नाहीस.+ १४ पण हे कृत्य करून तू यहोवाचा घोर अनादर केलास. म्हणून जो मुलगा तुला नुकताच झालाय तो निश्‍चितच मरेल.”

१५ मग नाथान आपल्या घरी निघून गेला.

इकडे, उरीयाच्या बायकोला दावीदपासून जो मुलगा झाला होता त्याला यहोवाने आजारी पाडलं. १६ दावीद त्या मुलासाठी खऱ्‍या देवापुढे कळकळून विनंती करू लागला. त्याने कडक उपास केले आणि रोज रात्री तो आपल्या खोलीत जाऊन जमिनीवर पडून राहायचा.+ १७ त्याच्या घरातल्या वडीलधाऱ्‍या माणसांनी त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही केल्या उठेना. त्याने त्यांच्यासोबत काही खायलाही नकार दिला. १८ मग सातव्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू झाला. पण दावीदला ही गोष्ट सांगायला त्याचे सेवक घाबरत होते. ते म्हणाले: “मूल जिवंत असताना आपण त्यांच्याशी बोलायला गेलो, तेव्हाच ते आपलं ऐकायला तयार नव्हते, तर आता मूल मरण पावलंय हे आपण त्यांना कसं सांगणार? त्यांनी आपल्या जिवाचं काही बरंवाईट करून घेतलं तर!”

१९ दावीदने जेव्हा आपल्या सेवकांना एकमेकांसोबत कुजबूज करताना पाहिलं, तेव्हा त्याने ओळखलं की मूल मेलं आहे. त्याने आपल्या सेवकांना विचारलं: “मूल गेलं का?” त्यावर ते म्हणाले: “हो, मूल गेलं.” २० तेव्हा दावीद जमिनीवरून उठला. त्याने अंघोळ केली, अंगाला तेल लावलं+ आणि कपडे बदलले. मग यहोवाच्या मंडपात* जाऊन+ त्याने देवाला दंडवत घातला. त्यानंतर तो आपल्या घरी गेला. त्याने जेवण वाढायला सांगितलं आणि तो जेवला. २१ त्याच्या सेवकांनी त्याला विचारलं: “तुम्ही असं का केलंत? मूल जिवंत होतं तोपर्यंत तुम्ही उपासतापास केला आणि शोक करत राहिलात. पण मूल गेल्याबरोबर तुम्ही उठलात आणि जेवलात. असं का?” २२ त्यावर तो म्हणाला: “मूल जिवंत होतं तेव्हा मी उपास केला+ आणि त्याच्यासाठी शोक केला; कारण मी असा विचार केला, की ‘कोण जाणे कदाचित यहोवा माझ्यावर कृपा करेल आणि मुलाला जिवंत राहू देईल.’+ २३ पण जर आता मूल राहिलंच नाही, तर मी उपास का करू? मी काय त्याला परत आणू शकतो?+ मी त्याच्याकडे जाईन,+ पण मूल मात्र माझ्याकडे परत येणार नाही.”+

२४ मग दावीदने आपल्या बायकोचं, बथशेबाचं+ सांत्वन केलं. पुढे तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्याशी संबंध ठेवले. काही काळाने, तिला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव शलमोन*+ ठेवण्यात आलं. यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.+ २५ म्हणून त्याने नाथान संदेष्ट्याच्या हाती असा निरोप पाठवला,+ की यहोवासाठी त्या मुलाचं नाव यदीद्या* असं ठेव.

२६ इकडे, यवाब अम्मोनी+ लोकांच्या राब्बा+ शहराविरुद्ध लढत राहिला आणि त्याने ते राजधानीचं शहर* काबीज केलं.+ २७ मग यवाबने दूतांच्या हातून दावीदला निरोप पाठवून म्हटलं: “मी राब्बा+ शहराविरुद्ध लढलो आणि पाण्याचं शहर* काबीज केलंय. २८ आता सैनिकांच्या बाकीच्या तुकड्या एकत्र करा आणि शहराला वेढा घालून त्यावर कब्जा करा. नाहीतर, मी त्या शहरावर कब्जा करायचो आणि त्याचं श्रेय मलाच मिळायचं.”*

२९ म्हणून मग दावीदने सैनिकांच्या सर्व तुकड्या जमा केल्या आणि तो राब्बा शहराकडे गेला. त्या शहराशी लढाई करून त्याने ते काबीज केलं. ३० मग त्याने मल्कामच्या* डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. मुकुटातल्या सोन्याचं वजन एक तालान्त* इतकं होतं. याशिवाय, त्यात मौल्यवान रत्नंही जडलेली होती. तो मुकुट दावीदच्या डोक्यावर ठेवण्यात आला. दावीदने त्या शहरातून+ अतिशय मोठ्या प्रमाणात लुटीचा मालही आणला.+ ३१ त्याने त्या शहरातल्या लोकांना बाहेर काढलं आणि त्यांना करवतीने दगड कापण्याच्या कामाला लावलं. तसंच, त्याने त्यांना धारदार लोखंडी हत्यारं व कुऱ्‍हाडी वापरून मजुरीची कामं करायला आणि विटा बनवायच्या कामाला लावलं. त्याने अम्मोनी लोकांच्या सर्व शहरांच्या बाबतीत असंच केलं. शेवटी, दावीद आणि त्याचे सर्व सैनिक यरुशलेमला परत आले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा