वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • योसेफचे भाऊ दुसऱ्‍यांदा इजिप्तला जातात; या वेळी बन्यामीनला घेऊन (१-१४)

      • योसेफ पुन्हा आपल्या भावांना भेटतो (१५-२३)

      • योसेफ आपल्या भावांना मेजवानी देतो (२४-३४)

उत्पत्ती ४३:१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३०; प्रेका ७:११

उत्पत्ती ४३:२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:१, २

उत्पत्ती ४३:३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:१५

उत्पत्ती ४३:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:१५

उत्पत्ती ४३:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३२:२८

उत्पत्ती ४३:७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:१३
  • +उत्प ४२:१६

उत्पत्ती ४३:८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:२६; ४२:३८
  • +उत्प ४२:१, २; प्रेका ७:१४

उत्पत्ती ४३:९

तळटीपा

  • *

    किंवा “मी त्याचा जामीन राहतो.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४४:३२

उत्पत्ती ४३:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ३२:२०
  • +यिर्म ८:२२; यहे २७:१७
  • +उत्प ३७:२५

उत्पत्ती ४३:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२५, ३५

उत्पत्ती ४३:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:३६

उत्पत्ती ४३:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:७, ९

उत्पत्ती ४३:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३९, ४०

उत्पत्ती ४३:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२५, ३५

उत्पत्ती ४३:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:३

उत्पत्ती ४३:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२७

उत्पत्ती ४३:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:१२

उत्पत्ती ४३:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२३, २४

उत्पत्ती ४३:२५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:११
  • +उत्प ४३:१६

उत्पत्ती ४३:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:७, ९; ४२:६

उत्पत्ती ४३:२७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:७

उत्पत्ती ४३:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:७, ९

उत्पत्ती ४३:२९

तळटीपा

  • *

    किंवा “सख्खा भाऊ.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:२४
  • +उत्प ४२:१३

उत्पत्ती ४३:३०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२३, २४

उत्पत्ती ४३:३२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:३३, ३४; निर्ग ८:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २९

उत्पत्ती ४३:३३

तळटीपा

  • *

    शब्दशः “ते.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:३; अनु २१:१७

उत्पत्ती ४३:३४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४५:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. १०, ११-१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ४३:१उत्प ४१:३०; प्रेका ७:११
उत्प. ४३:२उत्प ४२:१, २
उत्प. ४३:३उत्प ४२:१५
उत्प. ४३:५उत्प ४२:१५
उत्प. ४३:६उत्प ३२:२८
उत्प. ४३:७उत्प ४२:१३
उत्प. ४३:७उत्प ४२:१६
उत्प. ४३:८उत्प ३७:२६; ४२:३८
उत्प. ४३:८उत्प ४२:१, २; प्रेका ७:१४
उत्प. ४३:९उत्प ४४:३२
उत्प. ४३:११उत्प ३२:२०
उत्प. ४३:११यिर्म ८:२२; यहे २७:१७
उत्प. ४३:११उत्प ३७:२५
उत्प. ४३:१२उत्प ४२:२५, ३५
उत्प. ४३:१४उत्प ४२:३६
उत्प. ४३:१५उत्प ३७:७, ९
उत्प. ४३:१७उत्प ४१:३९, ४०
उत्प. ४३:१८उत्प ४२:२५, ३५
उत्प. ४३:२०उत्प ४२:३
उत्प. ४३:२१उत्प ४२:२७
उत्प. ४३:२२उत्प ४३:१२
उत्प. ४३:२३उत्प ४२:२३, २४
उत्प. ४३:२५उत्प ४३:११
उत्प. ४३:२५उत्प ४३:१६
उत्प. ४३:२६उत्प ३७:७, ९; ४२:६
उत्प. ४३:२७उत्प ४३:७
उत्प. ४३:२८उत्प ३७:७, ९
उत्प. ४३:२९उत्प ३५:२४
उत्प. ४३:२९उत्प ४२:१३
उत्प. ४३:३०उत्प ४२:२३, २४
उत्प. ४३:३२उत्प ४६:३३, ३४; निर्ग ८:२६
उत्प. ४३:३३उत्प ४९:३; अनु २१:१७
उत्प. ४३:३४उत्प ४५:२२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ४३:१-३४

उत्पत्ती

४३ देशात कडाक्याचा दुष्काळ पडला होता.+ २ इजिप्तवरून आणलेलं धान्य संपल्यावर,+ त्यांचा पिता त्यांना म्हणाला: “पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडं धान्य घेऊन या.” ३ तेव्हा यहूदा त्याला म्हणाला: “त्या माणसाने आम्हाला अशी स्पष्ट ताकीद दिली होती, की ‘जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला आणत नाही, तोपर्यंत माझं तोंड पाहू नका.’+ ४ जर तुम्ही त्याला आमच्यासोबत पाठवलं, तरच आम्ही तुमच्यासाठी धान्य विकत आणायला जाऊ. ५ पण, जर तुम्ही त्याला पाठवणार नसाल, तर आम्ही जाणार नाही. कारण तो माणूस आम्हाला म्हणाला, ‘जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला आणत नाही, तोपर्यंत माझं तोंड पाहू नका.’”+ ६ तेव्हा इस्राएल+ म्हणाला: “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे, ही गोष्ट त्या माणसाला सांगून तुम्ही माझ्यावर हे संकट का आणलंत?” ७ ते म्हणाले: “त्या माणसाने आम्हाला सरळ आमच्याबद्दल आणि आमच्या नातेवाइकांबद्दल असं विचारलं, ‘तुमचा पिता अजून जिवंत आहे का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का?’ म्हणून आम्ही त्याला या गोष्टी सांगितल्या.+ ‘तुमच्या भावाला इथे घेऊन या,’+ असं तो म्हणेल, हे आम्हाला काय माहीत होतं?”

८ यहूदाने आपला पिता इस्राएल याला अशी विनंती केली: “त्याला माझ्यासोबत पाठवा+ म्हणजे आम्हाला जाता येईल. नाहीतर, तुमच्यासोबत आम्ही आणि आमची मुलंबाळंही भुकेने मरून जातील.+ ९ त्याच्या सुरक्षेची खातरी मी देतो.*+ तुम्ही मला जबाबदार ठरवू शकता. जर मी त्याला तुमच्याकडे परत आणलं नाही, तर या पापाचा दोष माझ्यावर मरेपर्यंत राहील. १० आपण एवढा वेळ घालवला नसता, तर इतक्यात आम्ही दोनदा तिथे जाऊन परत आलो असतो.”

११ तेव्हा त्यांचा पिता इस्राएल त्यांना म्हणाला: “असं असेल, तर मी सांगतो ते करा. आपल्या देशातल्या सर्वात चांगल्या वस्तू आपल्या गोणींमध्ये भरा आणि त्या माणसासाठी भेट म्हणून घेऊन जा.+ बाल्सम,+ मध, सुगंधी डिंक, झाडांची सुगंधी साल,+ बदाम आणि पिस्ते घेऊन जा. १२ सोबत दुप्पट पैसे घेऊन जा आणि तुमच्या गोणींमधून परत आलेले पैसेही न्या,+ कदाचित काही चूक झाली असेल. १३ तुमच्या भावाला घ्या आणि त्या माणसाकडे जा. १४ त्या माणसाने तुम्हाला दया दाखवावी, यासाठी सर्वशक्‍तिमान देव तुम्हाला मदत करो. म्हणजे तो बन्यामीनला आणि तुमच्या दुसऱ्‍या भावालाही जाऊ देईल. पण जर मी माझ्या मुलांना गमावणारच असेन, तर माझा नाइलाज आहे.”+

१५ मग त्यांनी ती भेट आणि दुप्पट पैसे सोबत घेतले. तसंच त्यांनी बन्यामीनलाही सोबत घेतलं आणि ते खाली इजिप्तला गेले आणि योसेफसमोर जाऊन उभे राहिले.+ १६ योसेफने बन्यामीनला त्यांच्यासोबत पाहिलं, तेव्हा त्याने लगेच आपल्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाला म्हटलं: “या माणसांना घरी घेऊन जा. प्राणी कापून जेवण तयार करा, कारण दुपारी ही माणसं माझ्यासोबत जेवतील.” १७ त्या माणसाने लगेच योसेफच्या म्हणण्याप्रमाणे केलं+ आणि तो त्यांना योसेफच्या घरी घेऊन गेला. १८ पण योसेफच्या घरी पोहोचल्यावर ती माणसं घाबरली आणि म्हणू लागली: “मागच्या वेळी आपल्या गोणींमध्ये परत मिळालेल्या पैशांमुळे आपल्याला इथे आणलं आहे. आता हे लोक आपल्यावर हल्ला करून आपल्याला गुलाम बनवतील आणि आपली गाढवंही घेतील!”+

१९ तेव्हा ते योसेफच्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाकडे गेले आणि घराच्या दारासमोर त्याच्याशी बोलले. २० ते म्हणाले: “माफ करा प्रभू, मागच्या वेळी आम्ही इथे धान्य विकत घ्यायला आलो होतो,+ २१ पण जेव्हा आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी थांबून आमच्या गोणी उघडल्या, तेव्हा आमच्या प्रत्येकाच्या गोणीत आमचे सगळे पैसे तसेच होते,+ म्हणून आम्हाला ते पैसे परत करायचे आहेत. २२ ते पैसे आमच्या गोणींमध्ये कोणी ठेवले, हे आम्हाला माहीत नाही. आता धान्य विकत घेण्यासाठी आम्ही आणखी पैसे आणले आहेत.”+ २३ तेव्हा तो म्हणाला: “ठीक आहे, घाबरू नका. मला माहीत आहे, की तुम्ही पैसे दिले होते. तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या देवानेच तुमच्या गोणींमध्ये ते धन ठेवलं.” मग तो शिमोनला त्यांच्याकडे घेऊन आला.+

२४ त्यानंतर तो माणूस त्यांना योसेफच्या घरात घेऊन गेला आणि त्याने त्यांना पाय धुवायला पाणी दिलं, तसंच त्यांच्या गाढवांना चाराही दिला. २५ योसेफ दुपारी येणार म्हणून त्यांनी त्याच्यासाठी आणलेली भेट तयार केली,+ कारण दुपारी ते तिथे जेवणार आहेत, असं त्यांनी ऐकलं होतं.+ २६ योसेफ घरी आला, तेव्हा ते त्यांच्याकडे असलेली भेट त्याच्यासमोर घेऊन आले आणि त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमन केलं.+ २७ मग योसेफने त्यांची चौकशी केली आणि तो म्हणाला: “तुम्ही ज्यांच्याबद्दल सांगितलं होतं, ते तुमचे म्हातारे वडील कसे आहेत? ते अजून जिवंत आहेत का?”+ २८ यावर ते म्हणाले: “तुमचे सेवक, आमचे वडील बरे आहेत, ते अजून जिवंत आहेत.” मग त्यांनी वाकून जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमन केलं.+

२९ जेव्हा त्याने आपला भाऊ,* बन्यामीन+ याला पाहिलं तेव्हा तो म्हणाला: “तुम्ही मला ज्याच्याबद्दल सांगितलं होतं, तो तुमचा धाकटा भाऊ हाच आहे का?”+ तो पुढे म्हणाला: “मुला, तुझ्यावर देवाची कृपा असो.” ३० मग योसेफ लगेच तिथून बाहेर गेला, कारण आपल्या भावाला पाहून त्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्याला रडू आलं. तो आतल्या खोलीत जाऊन रडू लागला.+ ३१ नंतर त्याने आपलं तोंड धुतलं आणि स्वतःला सावरून तो बाहेर आला आणि म्हणाला: “जेवण वाढा.” ३२ मग सेवकांनी योसेफला वेगळं जेवायला वाढलं आणि त्याच्या भावांची ताटं वेगळी वाढली. त्याच्यासोबत असलेले इजिप्तचे लोकही वेगळे जेवायला बसले. कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांसोबत जेवत नव्हते. ती त्यांच्यासाठी एक किळसवाणी गोष्ट आहे.+

३३ त्याचे सगळे भाऊ* त्याच्यासमोर बसले होते. मोठा भाऊ आपल्या प्रथमपुत्राच्या अधिकाराप्रमाणे+ आणि बाकीचे भाऊ आपापल्या वयाप्रमाणे बसले होते आणि ते एकमेकांकडे आश्‍चर्याने पाहत होते. ३४ योसेफ आपल्या मेजावरून त्यांच्यासाठी पक्वान्‍ने पाठवत राहिला, पण त्याने बन्यामीनसाठी इतरांपेक्षा पाचपट जास्त पक्वान्‍ने पाठवली.+ मग त्यांनी त्याच्यासोबत मनसोक्‍त खाणंपिणं केलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा