वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • योसेफ फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो (१-३६)

      • फारो योसेफचा गौरव करतो (३७-४६क)

      • योसेफ अन्‍नधान्याची व्यवस्था करतो (४६ख-५७)

उत्पत्ती ४१:१

समासातील संदर्भ

  • +दान २:१

उत्पत्ती ४१:२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:१८-२१

उत्पत्ती ४१:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:२२-२४

उत्पत्ती ४१:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४०:२, ३

उत्पत्ती ४१:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ४०:५

उत्पत्ती ४१:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ३९:१
  • +उत्प ४०:८

उत्पत्ती ४१:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४०:२१, २२

उत्पत्ती ४१:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “कुंड; खड्डा.”

  • *

    मूळ हिब्रू शब्दाचा अर्थ, दाढी करण्यासोबतच मुंडण करणं असाही होऊ शकतो.

समासातील संदर्भ

  • +स्तो १०५:२०
  • +उत्प ४०:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    २/८/२०००, पृ. २२

उत्पत्ती ४१:१५

समासातील संदर्भ

  • +दान ५:१२; प्रेका ७:९, १०

उत्पत्ती ४१:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४०:८; दान २:२३, २८

उत्पत्ती ४१:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:२-४

उत्पत्ती ४१:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५-७

उत्पत्ती ४१:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:८; दान २:२
  • +दान २:२७; ४:७

उत्पत्ती ४१:२५

समासातील संदर्भ

  • +दान २:२८; आम ३:७

उत्पत्ती ४१:३०

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:११

उत्पत्ती ४१:३४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:२६, ४७

उत्पत्ती ४१:३५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:४८, ४९; प्रेका ७:१२

उत्पत्ती ४१:३६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४५:९, ११; ४७:१३, १९

उत्पत्ती ४१:४०

तळटीपा

  • *

    किंवा “राजासनामुळे.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३९:६; स्तो १०५:२१; प्रेका ७:९, १०

उत्पत्ती ४१:४१

समासातील संदर्भ

  • +दान ५:७

उत्पत्ती ४१:४३

तळटीपा

  • *

    हा शब्द एखाद्याला आदर आणि मान दिला जावा हे सांगण्यासाठी वापरला जायचा असं दिसतं.

उत्पत्ती ४१:४४

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपला हात किंवा पाय उचलू शकणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४४:१८; ४५:८; प्रेका ७:९, १०

उत्पत्ती ४१:४५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “हिलियोपोलीस.”

  • *

    किंवा “देशात प्रवास.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:२०
  • +स्तो १०५:२१

उत्पत्ती ४१:४६

समासातील संदर्भ

  • +गण ४:३; २शमु ५:४; लूक ३:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८८, पृ. २७

उत्पत्ती ४१:४७

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुठी भरून.”

उत्पत्ती ४१:५०

तळटीपा

  • *

    म्हणजे, “हिलियोपोलीस.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४८:५

उत्पत्ती ४१:५१

तळटीपा

  • *

    म्हणजे, “जो विसरायला लावतो.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ५०:२३; गण १:३४, ३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१८, पृ. २८

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१५, पृ. १२

उत्पत्ती ४१:५२

तळटीपा

  • *

    म्हणजे, “दुप्पट फलदायी.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४८:१७; गण १:३२, ३३; अनु ३३:१७; यहो १४:४
  • +स्तो १०५:१७, १८; प्रेका ७:९, १०

उत्पत्ती ४१:५३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:२६

उत्पत्ती ४१:५४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३०; प्रेका ७:११
  • +उत्प ४५:९, ११; ४७:१७

उत्पत्ती ४१:५५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:१३
  • +स्तो १०५:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८८, पृ. ७, ११

उत्पत्ती ४१:५६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:१
  • +उत्प ४१:४८, ४९; ४७:१६

उत्पत्ती ४१:५७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ४१:१दान २:१
उत्प. ४१:२उत्प ४१:१८-२१
उत्प. ४१:५उत्प ४१:२२-२४
उत्प. ४१:१०उत्प ४०:२, ३
उत्प. ४१:११उत्प ४०:५
उत्प. ४१:१२उत्प ३९:१
उत्प. ४१:१२उत्प ४०:८
उत्प. ४१:१३उत्प ४०:२१, २२
उत्प. ४१:१४स्तो १०५:२०
उत्प. ४१:१४उत्प ४०:१५
उत्प. ४१:१५दान ५:१२; प्रेका ७:९, १०
उत्प. ४१:१६उत्प ४०:८; दान २:२३, २८
उत्प. ४१:१८उत्प ४१:२-४
उत्प. ४१:२२उत्प ४१:५-७
उत्प. ४१:२४उत्प ४१:८; दान २:२
उत्प. ४१:२४दान २:२७; ४:७
उत्प. ४१:२५दान २:२८; आम ३:७
उत्प. ४१:३०प्रेका ७:११
उत्प. ४१:३४उत्प ४१:२६, ४७
उत्प. ४१:३५उत्प ४१:४८, ४९; प्रेका ७:१२
उत्प. ४१:३६उत्प ४५:९, ११; ४७:१३, १९
उत्प. ४१:४०उत्प ३९:६; स्तो १०५:२१; प्रेका ७:९, १०
उत्प. ४१:४१दान ५:७
उत्प. ४१:४४उत्प ४४:१८; ४५:८; प्रेका ७:९, १०
उत्प. ४१:४५उत्प ४६:२०
उत्प. ४१:४५स्तो १०५:२१
उत्प. ४१:४६गण ४:३; २शमु ५:४; लूक ३:२३
उत्प. ४१:५०उत्प ४८:५
उत्प. ४१:५१उत्प ५०:२३; गण १:३४, ३५
उत्प. ४१:५२उत्प ४८:१७; गण १:३२, ३३; अनु ३३:१७; यहो १४:४
उत्प. ४१:५२स्तो १०५:१७, १८; प्रेका ७:९, १०
उत्प. ४१:५३उत्प ४१:२६
उत्प. ४१:५४उत्प ४१:३०; प्रेका ७:११
उत्प. ४१:५४उत्प ४५:९, ११; ४७:१७
उत्प. ४१:५५उत्प ४७:१३
उत्प. ४१:५५स्तो १०५:२१
उत्प. ४१:५६उत्प ४३:१
उत्प. ४१:५६उत्प ४१:४८, ४९; ४७:१६
उत्प. ४१:५७उत्प ४७:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ४१:१-५७

उत्पत्ती

४१ याच्या दोन वर्षांनंतर फारोला एक स्वप्न पडलं+ आणि आपण नाईल नदीच्या काठावर उभे आहोत, असं त्याला दिसलं. २ त्याला सात सुंदर, धष्टपुष्ट गायी नदीतून वर येताना दिसल्या आणि त्या नाईल नदीजवळच्या गवतात चरू लागल्या.+ ३ त्यांच्या पाठोपाठ त्याला नाईल नदीतून आणखी सात, कुरूप आणि हडकुळ्या गायी वर येताना दिसल्या. त्या गायी नाईलच्या काठावर असलेल्या धष्टपुष्ट गायींच्या बाजूला उभ्या राहिल्या. ४ मग त्या कुरूप, हडकुळ्या गायी सात सुंदर, धष्टपुष्ट गायींना खाऊ लागल्या. तेवढ्यात फारोला जाग आली.

५ मग तो पुन्हा झोपला आणि त्याला आणखी एक स्वप्न पडलं. त्याला एकाच ताटाला सात चांगली आणि दाण्यांनी भरलेली कणसं येताना दिसली.+ ६ त्यानंतर आणखी सात कणसं आली. ती बारीक आणि पूर्वेकडच्या वाऱ्‍याने करपलेली होती. ७ मग ती बारीक कणसं सात चांगल्या आणि दाण्यांनी भरलेल्या कणसांना गिळू लागली. तेवढ्यात फारोला जाग आली आणि हे स्वप्न होतं, हे त्याला कळलं.

८ सकाळ झाल्यावर त्याचं मन अस्वस्थ झालं. म्हणून त्याने इजिप्तच्या सर्व मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांना आणि सर्व विद्वानांना बोलावून घेतलं. फारोने त्यांना आपली स्वप्नं सांगितली, पण कोणालाही त्यांचा अर्थ सांगता आला नाही.

९ तेव्हा मुख्य प्यालेबरदार फारोला म्हणाला: “आज मी माझी पापं कबूल करतो. १० एकदा तुम्ही आपल्या सेवकांवर रागावला होता आणि मला व मुख्य आचाऱ्‍याला, तुम्ही पहारेकऱ्‍यांचा प्रमुख असलेल्या अधिकाऱ्‍याच्या घरातल्या तुरुंगात टाकलं होतं.+ ११ त्यानंतर आम्हा दोघांनाही एकाच रात्री स्वप्नं पडली. दोघांच्याही स्वप्नांचा अर्थ वेगवेगळा होता.+ १२ तिथे आमच्यासोबत पहारेकऱ्‍यांच्या प्रमुखाचा एक तरुण इब्री सेवक होता.+ आम्ही त्याला आमची स्वप्नं सांगितली,+ तेव्हा त्याने आम्हा दोघांच्याही स्वप्नांचा अर्थ सांगितला. १३ आणि त्याने अर्थ सांगितल्याप्रमाणेच घडलं. मला माझं पद परत मिळालं, पण त्या दुसऱ्‍या माणसाला वधस्तंभावर लटकवण्यात आलं.”+

१४ तेव्हा फारोने योसेफला बोलावून घेतलं+ आणि त्याच्या माणसांनी त्याला लगेच तुरुंगातून* बाहेर काढलं.+ योसेफने दाढी करून* कपडे बदलले आणि मग तो फारोसमोर गेला. १५ तेव्हा फारो योसेफला म्हणाला: “मला एक स्वप्न पडलं, पण कोणीही त्याचा अर्थ सांगू शकलं नाही. मी असं ऐकलंय, की तुला स्वप्न ऐकून त्याचा अर्थ सांगता येतो.”+ १६ तेव्हा योसेफ फारोला म्हणाला: “मी नाही, तर देवच तुम्हाला चांगला संदेश देईल.”+

१७ मग फारो योसेफला म्हणाला: “माझ्या स्वप्नात मी नाईल नदीच्या काठावर उभा होतो. १८ तेव्हा मी सात सुंदर, धष्टपुष्ट गायी नदीतून वर येताना पाहिल्या. त्या नदीजवळच्या गवतात चरू लागल्या.+ १९ त्यांच्या पाठोपाठ मला आणखी सात गायी वर येताना दिसल्या. त्या अगदीच दुबळ्या, कुरूप आणि हडकुळ्या होत्या. मी पूर्ण इजिप्त देशात अशा कुरूप गायी कधीच बघितल्या नव्हत्या. २० मग त्या हडकुळ्या, कुरूप गायी आधीच्या सात धष्टपुष्ट गायींना खाऊ लागल्या. २१ पण त्यांनी त्यांना खाल्लं असं कोणी म्हटलं नसतं, कारण त्या आधीसारख्याच हडकुळ्या दिसत होत्या. तेवढ्यात मला जाग आली.

२२ मग मला स्वप्नात एका ताटाला, सात चांगली आणि दाण्यांनी भरलेली कणसं आलेली दिसली.+ २३ त्यानंतर आणखी सात कणसं आली. ती सुकलेल्या दाण्यांची, बारीक आणि पूर्वेकडच्या वाऱ्‍याने करपलेली होती. २४ तेव्हा बारीक कणसं, दाण्यांनी भरलेल्या कणसांना गिळू लागली. मी मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांना+ हे सर्व सांगितलं, पण कोणीच मला त्याचा अर्थ सांगू शकलं नाही.”+

२५ मग योसेफ फारोला म्हणाला: “तुमच्या दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. खरा देव काय करणार आहे, हे त्याने तुम्हाला सांगितलं आहे.+ २६ सात चांगल्या गायी म्हणजे सात वर्षं. तसंच, सात चांगल्या कणसांचाही अर्थ सात वर्षंच होतो. तुमच्या दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. २७ नंतर आलेल्या सात दुबळ्या व हडकुळ्या गायी म्हणजे सात वर्षं आणि सात सुकलेली व पूर्वेकडच्या वाऱ्‍याने करपलेली कणसं म्हणजे दुष्काळाची सात वर्षं असतील. २८ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, खरा देव जे करणार आहे ते त्याने तुम्हाला दाखवलं आहे.

२९ इजिप्त देशात सात वर्षं मोठ्या भरभराटीची असतील. ३० पण त्यानंतर दुष्काळाची सात वर्षं येतील. तेव्हा इजिप्त देशातल्या भरभराटीचा काळ सगळे विसरतील, कारण दुष्काळामुळे देश उद्ध्‌वस्त होईल.+ ३१ दुष्काळ खूपच भयंकर असल्यामुळे, आधीचा समृद्धीचा काळ कोणालाही आठवणार नाही. ३२ तुम्हाला दोनदा स्वप्न पडलं, कारण खऱ्‍या देवाने ही गोष्ट पक्की ठरवली आहे आणि तो लवकरच ती घडवून आणणार आहे.

३३ म्हणून आता तुम्ही एक असा माणूस निवडा, जो समजदार आणि बुद्धिमान आहे आणि त्याला संपूर्ण इजिप्त देशावर नियुक्‍त करा. ३४ तसंच, देशात देखरेख करणारे नेमा आणि भरभराटीच्या सात वर्षांदरम्यान+ इजिप्तमध्ये होणाऱ्‍या उत्पन्‍नाचा पाचवा भाग गोळा करा. ३५ आणि येणाऱ्‍या चांगल्या वर्षांत त्यांनी सगळं अन्‍नधान्य गोळा करावं, आणि अन्‍नाच्या पुरवठ्यासाठी ते शहरांमध्ये फारोच्या कोठारांत साठवून त्याची राखण करावी.+ ३६ इजिप्तमध्ये येणाऱ्‍या दुष्काळाच्या सात वर्षांत या अन्‍नधान्याचा पुरवठा केला जावा, म्हणजे दुष्काळामुळे देशाचा नाश होणार नाही.”+

३७ फारोला आणि त्याच्या सर्व सेवकांना ही कल्पना आवडली. ३८ म्हणून फारो आपल्या सेवकांना म्हणाला: “ज्याच्यात देवाची शक्‍ती कार्य करत आहे, असा याच्यासारखा दुसरा कोण आपल्याला सापडेल?” ३९ मग फारो योसेफला म्हणाला: “देवाने तुला या सर्व गोष्टी कळवल्या आहेत, त्यामुळे तुझ्यासारखा समजदार आणि बुद्धिमान कोणीच नाही. ४० मी तुला माझ्या घरावर नेमतो आणि माझे सर्व लोक तुझी प्रत्येक आज्ञा मानतील.+ फक्‍त राजा असल्यामुळे* मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” ४१ फारो योसेफला पुढे म्हणाला: “मी तुला संपूर्ण इजिप्त देशावर नियुक्‍त करतो.”+ ४२ मग फारोने आपल्या बोटातली मुद्रेची अंगठी काढून ती योसेफच्या बोटात घातली आणि त्याला चांगल्या प्रतीच्या मलमलीचे कपडे घालून त्याच्या गळ्यात सोन्याचा हार घातला. ४३ इतकंच काय, तर त्याने त्याला राजाच्या दुसऱ्‍या रथात बसवलं आणि त्याच्यापुढे “अवरेख!”* अशी घोषणा करण्याची आज्ञा दिली. अशा रितीने, फारोने योसेफला संपूर्ण इजिप्त देशावर अधिकारी नेमलं.

४४ मग फारो योसेफला म्हणाला: “मी फारो आहे, पण तुझ्या परवानगीशिवाय इजिप्त देशात कोणीही कोणतंच काम करू शकणार नाही.”*+ ४५ यानंतर, फारोने योसेफला सापनाथ-पानेह हे नाव दिलं आणि ओनचा* पुजारी पोटीफरा याची मुलगी आसनथ+ हिच्यासोबत त्याचं लग्न लावून दिलं. मग, योसेफ इजिप्त देशावर देखरेख* करू लागला.+ ४६ योसेफ इजिप्तचा राजा फारो याची सेवा करू लागला, तेव्हा तो ३० वर्षांचा+ होता.

मग योसेफ फारोकडून निघाला आणि इजिप्तच्या संपूर्ण देशाचा दौरा करू लागला. ४७ भरभराटीच्या सात वर्षांत देशात खूप* पीक आलं. ४८ त्या सात वर्षांत योसेफ इजिप्तच्या देशातून अन्‍नधान्य गोळा करत राहिला आणि ते शहरांमध्ये साठवत राहिला. प्रत्येक शहरात तो आसपासच्या शेतांतलं अन्‍नधान्य साठवायचा. ४९ योसेफने अन्‍नधान्याचा इतका मोठा साठा केला, की तो समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूसारखा झाला. शेवटी, त्यांनी तो मोजायचं सोडून दिलं कारण तो मोजणं शक्य नव्हतं.

५० दुष्काळाचं पहिलं वर्ष सुरू होण्याआधी, योसेफला ओनचा* पुजारी पोटीफरा याची मुलगी आसनथ हिच्यापासून दोन मुलं झाली.+ ५१ योसेफने आपल्या पहिल्या मुलाचं नाव मनश्‍शे*+ ठेवलं, कारण तो म्हणाला, “देवाने मला माझी सगळी दुःखं आणि माझ्या वडिलांचं घर विसरायला लावलं आहे.” ५२ त्याने आपल्या दुसऱ्‍या मुलाचं नाव एफ्राईम*+ ठेवलं कारण तो म्हणाला: “देवाने मला माझ्या दुःखाच्या देशात फलदायी केलं आहे.”+

५३ मग इजिप्तच्या देशात भरभराटीची सात वर्षं संपली,+ ५४ आणि योसेफने सांगितल्याप्रमाणे सात वर्षांचा दुष्काळ सुरू झाला.+ हा दुष्काळ सर्व देशांमध्ये पसरला, पण इजिप्तच्या संपूर्ण देशात अन्‍न होतं.+ ५५ शेवटी, इजिप्तच्या संपूर्ण देशातही दुष्काळ पडला आणि लोक फारोकडे अन्‍नाची भीक मागू लागले.+ तेव्हा फारो इजिप्तच्या सर्व लोकांना म्हणाला: “योसेफकडे जा आणि तो जे सांगेल, ते करा.”+ ५६ संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळ होता.+ मग, योसेफने धान्याची कोठारं उघडली आणि तो इजिप्तच्या लोकांना धान्य विकू लागला,+ कारण सगळा देश दुष्काळाच्या विळख्यात होता. ५७ पृथ्वीवरचे सर्व लोक योसेफकडून धान्य विकत घ्यायला इजिप्तला येऊ लागले, कारण सगळी पृथ्वीच दुष्काळाच्या विळख्यात होती.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा