वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • पोटीफरच्या घरात योसेफ (१-६)

      • योसेफ पोटीफरच्या बायकोला नकार देतो (७-२०)

      • योसेफ तुरुंगात (२१-२३)

उत्पत्ती ३९:१

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:२०; ३७:२५
  • +स्तो १०५:१७; प्रेका ७:९
  • +उत्प ३७:३६

उत्पत्ती ३९:२

समासातील संदर्भ

  • +रोम ८:३१; इब्री १३:६

उत्पत्ती ३९:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ३०:२७

उत्पत्ती ३९:९

समासातील संदर्भ

  • +उत्प २:२४; २०:३, ६; स्तो ५१:उपरीलेखन; ५१:४; मार्क १०:७, ८; इब्री १३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. २५-२६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१७, पृ. ४-५

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१४, पृ. ९

    २/१५/२०१३, पृ. ४

    ११/१/२००७, पृ. १०

    ७/१/२००६, पृ. २०-२१

    १/१५/२००४, पृ. २९

    १२/१/२००३, पृ. २०

    ११/१/२०००, पृ. ९-१०

    ९/१/१९९८, पृ. ५

    १०/१५/१९९७, पृ. २९

उत्पत्ती ३९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१५, पृ. १६

उत्पत्ती ३९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४१

उत्पत्ती ३९:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्यावर हसण्यासाठी.”

उत्पत्ती ३९:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो १०५:१७, १८

उत्पत्ती ३९:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४०:२, ३; स्तो १०५:१९; प्रेका ७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/२०२०, पृ. ४

    ५/१५/२००२, पृ. १४-१५, १६-१७

उत्पत्ती ३९:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ३९:६

उत्पत्ती ३९:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:२२, २५; प्रेका ७:९, १०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ३९:१उत्प १७:२०; ३७:२५
उत्प. ३९:१स्तो १०५:१७; प्रेका ७:९
उत्प. ३९:१उत्प ३७:३६
उत्प. ३९:२रोम ८:३१; इब्री १३:६
उत्प. ३९:५उत्प ३०:२७
उत्प. ३९:९उत्प २:२४; २०:३, ६; स्तो ५१:उपरीलेखन; ५१:४; मार्क १०:७, ८; इब्री १३:४
उत्प. ३९:२०स्तो १०५:१७, १८
उत्प. ३९:२१उत्प ४०:२, ३; स्तो १०५:१९; प्रेका ७:९
उत्प. ३९:२२उत्प ३९:६
उत्प. ३९:२३उत्प ४९:२२, २५; प्रेका ७:९, १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ३९:१-२३

उत्पत्ती

३९ इश्‍माएली+ लोक योसेफला इजिप्तला घेऊन आले.+ तिथे पोटीफर+ नावाच्या इजिप्तच्या एका माणसाने त्याला त्यांच्याकडून विकत घेतलं. पोटीफर हा फारोच्या दरबारातला एक अधिकारी आणि पहारेकऱ्‍यांचा प्रमुख होता. २ पण यहोवा योसेफसोबत होता.+ त्यामुळे, त्याला यश मिळत गेलं आणि त्याला त्याच्या मालकाच्या घरावर कारभारी म्हणून नेमण्यात आलं. ३ यहोवा त्याच्यासोबत आहे आणि यहोवा त्याला सर्व गोष्टींत यश देत आहे, हे त्याच्या मालकाने पाहिलं.

४ योसेफचा मालक त्याच्यावर खूप खूश होता आणि तो त्याचा सगळ्यात भरवशाचा सेवक बनला. म्हणून त्याने योसेफला आपल्या घरावर अधिकारी नेमलं आणि आपला सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला. ५ योसेफ त्या घराचा कारभार पाहू लागला, तेव्हापासून यहोवा इजिप्तमधल्या त्याच्या मालकाच्या घरावर आशीर्वाद देत राहिला. त्याच्या मालकाच्या सर्व घरादारावर आणि शेतीवाडीवर यहोवाचा आशीर्वाद होता.+ ६ हळूहळू त्याने आपल्या मालकीचं सर्वकाही योसेफला सोपवून दिलं आणि आपण काय खावं, हे ठरवण्याशिवाय तो इतर कोणत्याही गोष्टीची चिंता करत नव्हता. योसेफ आता उंचापुरा आणि देखणा झाला होता.

७ काही काळाने, योसेफच्या मालकाची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली आणि ती त्याला म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव.” ८ पण त्याने नकार दिला आणि तो म्हणाला: “माझ्या मालकांनी घराचा सर्व कारभार माझ्या ताब्यात दिला आहे. आणि त्यामुळे ते घरातल्या कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाहीत. ९ या घरात मलाच सर्वात जास्त अधिकार आहे आणि तुम्हाला सोडून बाकी सर्वकाही त्यांनी माझ्या हातात दिलं आहे, कारण तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. तर मग, इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?”+

१० ती दररोज योसेफशी बोलायची, पण तो तिच्याशी संबंध ठेवायला किंवा तिच्यासोबत थांबायला कधीही तयार झाला नाही. ११ एकदा, तो काही कामासाठी घरात गेला, त्या वेळी घरात कोणीही नोकरचाकर नव्हते. १२ तेव्हा तिने त्याच्या अंगावरचं वस्त्र धरलं आणि ती म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव!” पण ते वस्त्र तिच्या हातात सोडून योसेफ तिथून बाहेर पळून गेला. १३ योसेफ वस्त्र आपल्या हातातच सोडून बाहेर पळून गेला हे पाहिल्यावर, १४ तिने आरडाओरडा करून घरातल्या माणसांना बोलावलं आणि ती त्यांना म्हणाली: “पाहा, यांनी या इब्री माणसाला आपला अपमान करण्यासाठी* इथे आणलं आहे. त्याला माझ्यासोबत संबंध ठेवायचे होते, पण मी मोठ्याने आरडाओरडा केला. १५ माझा आरडाओरडा ऐकून तो आपल्या अंगावरचं वस्त्र माझ्याजवळ सोडून बाहेर पळून गेला.” १६ मग त्याचा मालक घरी परत येईपर्यंत, तिने ते वस्त्र आपल्याजवळच ठेवलं.

१७ मग तिने त्यालाही तीच गोष्ट सांगितली: “तुम्ही ज्या इब्री नोकराला इथे आणलंत, तो माझा अपमान करायला माझ्याकडे आला होता. १८ पण मी आरडाओरडा करू लागताच, तो आपल्या अंगावरचं वस्त्र माझ्याजवळ सोडून बाहेर पळून गेला.” १९ “तुमच्या सेवकाने माझ्यासोबत असं केलं,” हे बायकोचे शब्द ऐकताच योसेफचा मालक भडकला. २० म्हणून त्याने योसेफला धरून, राजाच्या कैद्यांना जिथे ठेवलं जायचं त्या तुरुंगात टाकलं आणि योसेफ तिथेच राहिला.+

२१ पण यहोवा योसेफसोबत होता आणि तो त्याला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला. त्यामुळे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याची त्याच्यावर कृपा झाली.+ २२ तेव्हा तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याने योसेफला सर्व कैद्यांवर नेमलं. तोच त्यांच्याकडून सगळी कामं करून घ्यायचा.+ २३ योसेफवर सोपवलेल्या कोणत्याही कामाकडे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याला लक्ष द्यावं लागायचं नाही, कारण यहोवा योसेफसोबत होता आणि तो जे काही करायचा त्यात यहोवा त्याला यश द्यायचा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा