वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • दीनाचा बलात्कार (१-१२)

      • याकोबची मुलं कपटीपणे वागतात (१३-३१)

उत्पत्ती ३४:१

तळटीपा

  • *

    किंवा “मुलींसोबत वेळ घालवायला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३०:१९, २१; ४६:१५
  • +उत्प २६:३४, ३५; २७:४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००१, पृ. २०

    २/१/१९९७, पृ. ३०

उत्पत्ती ३४:२

समासातील संदर्भ

  • +अनु ७:१; १इत १:१३-१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    देवाचे प्रेम, पृ. ११६-११७

उत्पत्ती ३४:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्या तरुणीच्या हृदयाशी बोलू लागला.”

उत्पत्ती ३४:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३३:१८, १९

उत्पत्ती ३४:७

समासातील संदर्भ

  • +इब्री १३:४
  • +२शमु १३:२२

उत्पत्ती ३४:८

तळटीपा

  • *

    किंवा “शखेम याचं तुमच्या मुलीवर मन बसलंय.”

उत्पत्ती ३४:९

तळटीपा

  • *

    किंवा “सोयरीक करा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:२, ३

उत्पत्ती ३४:१२

तळटीपा

  • *

    किंवा “वधुदक्षिणा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:५३; होशे ३:२

उत्पत्ती ३४:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:९, १२

उत्पत्ती ३४:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१०

उत्पत्ती ३४:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३३:१८, १९
  • +उत्प ३४:२

उत्पत्ती ३४:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प ३४:१५

उत्पत्ती ३४:२०

समासातील संदर्भ

  • +जख ८:१६

उत्पत्ती ३४:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ३४:८, ९

उत्पत्ती ३४:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:११

उत्पत्ती ३४:२५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:१५
  • +उत्प ४९:५-७

उत्पत्ती ३४:२७

समासातील संदर्भ

  • +उत्प ३४:२

उत्पत्ती ३४:३०

तळटीपा

  • *

    किंवा “तुमच्यामुळे मला वाळीत टाकलं जाईल.”

  • *

    शब्दशः “मला दुर्गंधी असं केलं.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ३४:१उत्प ३०:१९, २१; ४६:१५
उत्प. ३४:१उत्प २६:३४, ३५; २७:४६
उत्प. ३४:२अनु ७:१; १इत १:१३-१५
उत्प. ३४:४उत्प ३३:१८, १९
उत्प. ३४:७इब्री १३:४
उत्प. ३४:७२शमु १३:२२
उत्प. ३४:९उत्प २४:२, ३
उत्प. ३४:१२उत्प २४:५३; होशे ३:२
उत्प. ३४:१४उत्प १७:९, १२
उत्प. ३४:१५उत्प १७:१०
उत्प. ३४:१८उत्प ३३:१८, १९
उत्प. ३४:१८उत्प ३४:२
उत्प. ३४:१९उत्प ३४:१५
उत्प. ३४:२०जख ८:१६
उत्प. ३४:२१उत्प ३४:८, ९
उत्प. ३४:२२उत्प १७:११
उत्प. ३४:२५उत्प ४६:१५
उत्प. ३४:२५उत्प ४९:५-७
उत्प. ३४:२७उत्प ३४:२
उत्प. ३४:३०उत्प ४९:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ३४:१-३१

उत्पत्ती

३४ याकोबला लेआपासून+ झालेली मुलगी, दीना ही नेहमी त्या देशातल्या मुलींना भेटायला* जायची.+ २ तेव्हा शखेम, जो देशाचा प्रधान, हिव्वी+ हमोर याचा मुलगा होता, त्याने दीनाला पाहिलं आणि त्याने तिला नेऊन तिची अब्रू लुटली. ३ याकोबची मुलगी दीना हिच्यात त्याचा जीव अडकला आणि तो तिच्या प्रेमात पडला. तिचं मन जिंकण्यासाठी तो तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी करू लागला.* ४ शेवटी शखेम आपला पिता हमोर+ याला म्हणाला: “माझं या मुलीशी लग्न करून द्या.”

५ शखेमने आपली मुलगी दीना हिची अब्रू लुटली हे याकोबला कळलं, तेव्हा त्याची मुलं त्याच्या गुरांना रानात घेऊन गेली होती. म्हणून आपली मुलं परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. ६ नंतर शखेमचा पिता हमोर याकोबशी बोलायला आला. ७ पण याकोबच्या मुलांना सगळी हकिगत कळली आणि ती ताबडतोब रानातून परत आली. ती दुखावली गेली होती आणि अतिशय संतापली होती, कारण शखेमने याकोबच्या मुलीची अब्रू लुटून एक दुष्ट कृत्य+ केलं होतं आणि इस्राएलचा अपमान केला होता.+

८ हमोर त्यांना म्हणाला: “माझा मुलगा शखेम याचा जीव तुमच्या मुलीत अडकलाय.* कृपा करून तिचं त्याच्याशी लग्न करून द्या. ९ आमच्याशी लग्नाचे संबंध जोडा.* तुमच्या मुली आम्हाला द्या आणि आमच्या मुली तुम्ही करा.+ १० तुम्ही आमच्यामध्ये राहू शकता. आमचा सगळा देश तुमच्यासाठी खुला आहे. इथे राहा, व्यापार करा आणि आपली धनसंपत्ती वाढवा.” ११ मग शखेम तिच्या वडिलांना आणि तिच्या भावांना म्हणाला: “माझ्यावर ही कृपा करा, तुम्ही जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. १२ तुम्हाला वाटेल तितका मोठा मोबदला* आणि आहेर तुम्ही मागू शकता.+ तुम्ही म्हणाल ते द्यायला मी तयार आहे. फक्‍त तुमच्या मुलीशी मला लग्न करू द्या.”

१३ पण, याकोबच्या मुलांनी शखेम आणि त्याचा पिता हमोर याला कपटीपणाने उत्तर दिलं, कारण त्याने त्यांची बहीण दीना हिची अब्रू लुटली होती. १४ ते त्यांना म्हणाले: “सुंता न झालेल्या माणसाशी आमच्या बहिणीचं लग्न लावून देण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही.+ आमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. १५ फक्‍त एका अटीवर आम्ही होकार देऊ: तुमच्यापैकी सर्व पुरुषांनी सुंता करून आमच्यासारखं झालं पाहिजे.+ १६ तेव्हाच आम्ही आमच्या मुली तुम्हाला देऊ आणि तुमच्या मुली आम्ही करू आणि तुमच्यासोबत राहू व आपण एक राष्ट्र बनू. १७ पण जर तुम्ही ही अट मान्य करून सुंता केली नाही, तर आम्ही आमच्या मुलीला घेऊन जाऊ.”

१८ त्यांची ही गोष्ट हमोर+ आणि त्याचा मुलगा शखेम+ याला पटली. १९ त्याने वेळ न घालवता त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं,+ कारण तो याकोबच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. शिवाय, त्याच्या वडिलांच्या घराण्यात तो सर्वात आदरणीय होता.

२० म्हणून हमोर आणि त्याचा मुलगा शखेम शहराच्या फाटकाजवळ गेले आणि शहराच्या माणसांना+ म्हणाले: २१ “या लोकांना आपल्यासोबत शांतीने राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्यांना आपल्या देशात राहू द्या आणि व्यापार करू द्या. कारण त्यांच्यासाठीही आपल्या देशात भरपूर जागा आहे. आपण त्यांच्या मुलींशी लग्नं करू आणि आपल्या मुलीही त्यांना देऊ.+ २२ आपल्यासोबत राहण्यासाठी आणि एक राष्ट्र होण्यासाठी त्यांची फक्‍त एक अट आहे: आपल्यापैकी प्रत्येक पुरुषाने त्यांच्यासारखी सुंता केली पाहिजे.+ २३ आपण असं केलं, तर त्यांची धनसंपत्ती, मालमत्ता आणि गुरंढोरं आपलीच आहेत. म्हणून आपण त्यांची ही अट मान्य करू, म्हणजे ते आपल्यामध्ये राहतील.” २४ शहराच्या फाटकाजवळ जमलेल्या सर्वांनी हमोर आणि त्याचा मुलगा शखेम यांचं म्हणणं ऐकलं आणि तिथे जमलेल्या सर्व पुरुषांनी सुंता केली.

२५ पण, तिसऱ्‍या दिवशी ते अजूनही वेदनेने बेजार असताना, शिमोन आणि लेवी या याकोबच्या दोन मुलांनी, म्हणजे दीनाच्या भावांनी+ आपापली तलवार घेतली आणि शहरात जाऊन सर्व बेसावध पुरुषांची कत्तल केली.+ २६ त्यांनी हमोर आणि त्याचा मुलगा शखेम यांना तलवारीने ठार मारलं आणि मग दीनाला शखेमच्या घरातून घेऊन ते निघून गेले. २७ मग जिथे माणसांची कत्तल झाली होती, तिथे येऊन याकोबच्या इतर मुलांनी शहर लुटलं, कारण तिथे त्यांच्या बहिणीची अब्रू लुटली गेली होती.+ २८ त्यांनी त्यांचे कळप, गुरंढोरं, गाढवं आणि शहरात आणि रानात त्यांचं जे काही होतं ते सर्व लुटलं. २९ तसंच त्यांनी त्यांची सगळी मालमत्ता घेतली, त्यांच्या लहान मुलांना आणि बायकांना बंदी बनवलं आणि त्यांच्या घरांत होतं नव्हतं ते सगळं लुटून नेलं.

३० तेव्हा याकोब शिमोन आणि लेवी यांना म्हणाला:+ “तुम्ही मला मोठ्या संकटात टाकलं आहे.* माझे लोक आधीच फार थोडे आहेत. आणि आता या देशातले कनानी आणि परिज्जी लोक माझा द्वेष करतील* आणि ते एकत्र येऊन नक्की माझ्यावर हल्ला करतील. ते माझा आणि माझ्या घराण्याचा सर्वनाश करतील.” ३१ पण ते त्याला म्हणाले: “कोणी आमच्या बहिणीला वेश्‍येसारखं वागवावं का?”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा