वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • तीन स्वर्गदूत अब्राहामकडे येतात (१-८)

      • साराला मुलगा होण्याचं वचन; ती हसते (९-१५)

      • अब्राहाम सदोमसाठी विनंती करतो (१६-३३)

उत्पत्ती १८:१

समासातील संदर्भ

  • +उत्प १३:१८; १४:१३
  • +उत्प १६:७; शास १३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. ११-१२

उत्पत्ती १८:२

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. ११-१२

उत्पत्ती १८:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. १२-१३

उत्पत्ती १८:४

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:२; २४:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. १२

उत्पत्ती १८:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. १२

उत्पत्ती १८:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “सेया मापं.” एक सेया म्हणजे ७.३३ ली. अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. १२

उत्पत्ती १८:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. १२

उत्पत्ती १८:८

समासातील संदर्भ

  • +इब्री १३:२

उत्पत्ती १८:९

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१५

उत्पत्ती १८:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:२१; २१:२; रोम ९:९

उत्पत्ती १८:११

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१७
  • +रोम ४:१९

उत्पत्ती १८:१२

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:११; १पेत्र ३:६

उत्पत्ती १८:१४

समासातील संदर्भ

  • +यश ४०:२९; मत्त १९:२६; लूक १:३६, ३७

उत्पत्ती १८:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प १३:१२

उत्पत्ती १८:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:१४; आम ३:७

उत्पत्ती १८:१८

तळटीपा

  • *

    किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१-३; गल ३:१४

उत्पत्ती १८:१९

समासातील संदर्भ

  • +अनु ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. २७

उत्पत्ती १८:२०

समासातील संदर्भ

  • +२पेत्र २:७, ८
  • +उत्प १३:१३; यहू ७

उत्पत्ती १८:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:५; निर्ग ३:७, ८; स्तो १४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ३/२०२०, पृ. १

उत्पत्ती १८:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ३१:११; ३२:३०

उत्पत्ती १८:२३

समासातील संदर्भ

  • +गण १६:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९४, पृ. २९-३०

उत्पत्ती १८:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:१०, ११; नीत २९:१६; मला ३:१८; मत्त १३:४९
  • +अनु ३२:४
  • +ईयो ३४:१२; यश ३३:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१०, पृ. ६

    ४/१५/२०१०, पृ. १४

    ७/१/२००९, पृ. १४

    ५/१५/२००४, पृ. ५

    ७/१५/२००३, पृ. १६-१७

    ८/१५/१९९८, पृ. १२, २०

    ६/१/१९९३, पृ. २५-२६

    १०/१/१९८७, पृ. २२

उत्पत्ती १८:२८

समासातील संदर्भ

  • +गण १४:१८; स्तो ८६:१५

उत्पत्ती १८:३०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:६

उत्पत्ती १८:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९४, पृ. २९-३०

उत्पत्ती १८:३३

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:२, २२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. १८:१उत्प १३:१८; १४:१३
उत्प. १८:१उत्प १६:७; शास १३:२१
उत्प. १८:२उत्प १९:१
उत्प. १८:४उत्प १९:२; २४:३२
उत्प. १८:८इब्री १३:२
उत्प. १८:९उत्प १७:१५
उत्प. १८:१०उत्प १७:२१; २१:२; रोम ९:९
उत्प. १८:११उत्प १७:१७
उत्प. १८:११रोम ४:१९
उत्प. १८:१२इब्री ११:११; १पेत्र ३:६
उत्प. १८:१४यश ४०:२९; मत्त १९:२६; लूक १:३६, ३७
उत्प. १८:१६उत्प १३:१२
उत्प. १८:१७स्तो २५:१४; आम ३:७
उत्प. १८:१८उत्प १२:१-३; गल ३:१४
उत्प. १८:१९अनु ४:९
उत्प. १८:२०२पेत्र २:७, ८
उत्प. १८:२०उत्प १३:१३; यहू ७
उत्प. १८:२१उत्प ११:५; निर्ग ३:७, ८; स्तो १४:२
उत्प. १८:२२उत्प ३१:११; ३२:३०
उत्प. १८:२३गण १६:२२
उत्प. १८:२५स्तो ३७:१०, ११; नीत २९:१६; मला ३:१८; मत्त १३:४९
उत्प. १८:२५अनु ३२:४
उत्प. १८:२५ईयो ३४:१२; यश ३३:२२
उत्प. १८:२८गण १४:१८; स्तो ८६:१५
उत्प. १८:३०निर्ग ३४:६
उत्प. १८:३३उत्प १८:२, २२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती १८:१-३३

उत्पत्ती

१८ काही काळाने, अब्राहाम दुपारच्या वेळी मम्रेच्या मोठ्या झाडांजवळ,+ आपल्या तंबूच्या दाराशी बसला असताना यहोवा+ त्याच्यासमोर प्रकट झाला. २ त्याने नजर वर करून पाहिलं, तेव्हा त्याला काही अंतरावर तीन माणसं उभी असलेली दिसली.+ त्यांना पाहिल्यावर तो आपल्या तंबूच्या दाराजवळून धावत त्यांना भेटायला गेला आणि त्याने जमिनीपर्यंत वाकून त्यांना नमस्कार केला. ३ मग तो म्हणाला: “हे यहोवा, जर तू माझा स्वीकार केला असशील, तर कृपा करून आपल्या या दासाजवळ थोडा वेळ थांब. ४ मी थोडं पाणी आणून तुमचे पाय धुतो,+ मग तुम्ही झाडाखाली विश्रांती घ्या. ५ तुम्ही तुमच्या दासाकडे आला आहात, तर मी तुमच्यासाठी थोडी भाकर आणतो म्हणजे तुमचा थकवा दूर होईल. मग तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला जा.” तेव्हा ते म्हणाले: “ठीक आहे, तू म्हणतोस तसं कर.”

६ मग अब्राहाम घाईघाईने तंबूत साराकडे जाऊन म्हणाला: “पटकन तीन मापं* चांगलं पीठ घे आणि ते मळून भाकरी बनव.” ७ त्यानंतर अब्राहाम पळत आपल्या कळपाजवळ गेला आणि त्याने त्यातून एक चांगलं कोवळं वासरू निवडलं. मग त्याने ते आपल्या सेवकाकडे दिलं आणि सेवक घाईघाईने ते बनवायच्या तयारीला लागला. ८ मग त्याने लोणी, दूध आणि तयार केलेल्या वासराचं मांस घेतलं आणि त्यांना वाढलं. ते जेवत असताना तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.+

९ त्यांनी त्याला विचारलं: “तुझी बायको सारा कुठे आहे?”+ तो म्हणाला: “ती तंबूत आहे.” १० तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला: “मी पुढच्या वर्षी याच वेळी तुझ्याकडे नक्की येईन आणि तेव्हा साराला एक मुलगा झालेला असेल.”+ सारा त्या माणसाच्या मागे, तंबूच्या दाराजवळ हे बोलणं ऐकत होती. ११ अब्राहाम आणि सारा यांचं खूप वय झालं होतं.+ साराचं मूलबाळ होण्याचं वय निघून गेलं होतं.+ १२ तेव्हा सारा स्वतःशीच हसून म्हणाली: “मी तर म्हातारी झाली आहे आणि माझ्या प्रभूचंही वय झालं आहे, मग मला खरंच हे सुख मिळेल का?”+ १३ तेव्हा यहोवा अब्राहामला म्हणाला: “सारा का हसली आणि ‘मला म्हातारपणी खरंच मूल होईल का’ असं का म्हणाली? १४ यहोवाला कोणतीही गोष्ट अशक्य आहे का?+ मी पुढच्या वर्षी याच वेळी तुझ्याकडे येईन आणि तेव्हा साराला एक मुलगा झालेला असेल.” १५ पण साराने ही गोष्ट मान्य केली नाही कारण ती घाबरली होती. ती म्हणाली, “मी नाही हसले!” तेव्हा तो म्हणाला: “नाही! तू हसलीस.”

१६ मग ती माणसं जायला निघाली आणि त्यांनी खाली सदोमच्या+ दिशेने पाहिलं. अब्राहामही त्यांना सोडायला त्यांच्यासोबत निघाला. १७ यहोवा म्हणाला: “मी जे करणार आहे ते मी अब्राहामपासून लपवून ठेवणार नाही.+ १८ कारण त्याच्यापासून नक्की एक मोठं आणि शक्‍तिशाली राष्ट्र येईल आणि अब्राहाममुळे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.*+ १९ मी त्याला चांगलं ओळखतो आणि मला खातरी आहे, की तो त्याच्या मुलांना आणि वंशजांना, योग्य आणि न्यायीपणे वागून यहोवाच्या मार्गाने चालण्याची आज्ञा देईल.+ तेव्हा मी यहोवा, अब्राहामविषयी दिलेलं माझं वचन पूर्ण करीन.”

२० मग यहोवा म्हणाला: “सदोम आणि गमोराविरुद्ध आक्रोश फार वाढला आहे+ आणि त्यांचं पाप खूप भयंकर आहे.+ २१ त्यांच्याविरुद्धचा आक्रोश खरा आहे का, आणि ते खरोखर इतकी वाईट कामं करत आहेत का, हे पाहण्यासाठी मी खाली जाईन. कारण मला हे जाणून घ्यायचं आहे.”+

२२ तेव्हा ती माणसं तिथून सदोमच्या दिशेने निघून गेली, पण यहोवा+ अब्राहामसोबत थांबला. २३ मग अब्राहाम जवळ येऊन म्हणाला: “तू खरंच दुष्टांसोबत नीतिमान लोकांचाही नाश करशील का?+ २४ समज, शहरात ५० नीतिमान लोक असतील, तर तू त्यांचाही नाश करशील का? त्या ५० नीतिमान लोकांसाठी तू त्या शहराला क्षमा करणार नाहीस का? २५ तू दुष्टासोबत नीतिमान माणसाचाही नाश करशील आणि नीतिमान व दुष्ट यांना सारखाच मोबदला देशील,+ ही कल्पनाही करवत नाही. खरंच, असा विचारही करवत नाही!+ सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही का?”+ २६ तेव्हा यहोवा म्हणाला: “मला सदोममध्ये ५० नीतिमान माणसं जरी सापडली, तरी मी त्यांच्यासाठी संपूर्ण शहराला क्षमा करीन.” २७ अब्राहाम पुन्हा म्हणाला: “माफ कर, मी धूळ आणि राख असूनही यहोवाशी बोलण्याचं धाडस करत आहे. २८ पण समज त्या ५० नीतिमान लोकांत पाच कमी असतील, तर त्या पाच लोकांमुळे तू संपूर्ण शहराचा नाश करशील का?” यावर तो म्हणाला: “मला तिथे ४५ जरी सापडले, तरी मी त्या शहराचा नाश करणार नाही.”+

२९ पण अब्राहाम पुन्हा त्याला म्हणाला: “समज फक्‍त ४० असतील तर?” त्याने उत्तर दिलं: “त्या ४० लोकांसाठी मी शहराचा नाश करणार नाही.” ३० अब्राहाम पुन्हा म्हणाला: “यहोवा कृपा करून रागावू नकोस,+ मला बोलू दे. जर फक्‍त ३० लोक सापडले तर?” त्याने उत्तर दिलं: “त्या ३० लोकांसाठी मी नाश करणार नाही.” ३१ तरी तो पुढे म्हणाला: “माफ कर, मी यहोवाशी बोलण्याचं धाडस करत आहे. पण जर फक्‍त २० सापडले तर?” तो म्हणाला: “त्या २० लोकांसाठी मी नाश करणार नाही.” ३२ शेवटी तो म्हणाला: “यहोवा कृपा करून रागावू नकोस, मला आणखी एकदाच बोलू दे. जर फक्‍त दहा लोक सापडले तर?” त्याने उत्तर दिलं: “मी त्या दहा लोकांसाठी नाश करणार नाही.” ३३ अब्राहामशी बोलून झाल्यावर यहोवा तिथून निघून गेला+ आणि अब्राहाम आपल्या घरी परत गेला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा