वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण ११
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण पुस्तकाची रूपरेषा

    • ११

      • दोन साक्षीदार (१-१३)

        • १,२६० दिवस गोणपाट घालून भविष्यवाणी करतात (३)

        • ठार मारले जातात व पुरले जात नाही (७-१०)

        • साडेतीन दिवसांनंतर जिवंत केले जातात (११, १२)

      • दुसरी विपत्ती होऊन गेली, आता तिसरी येणार (१४)

      • सातवा कर्णा (१५-१९)

        • आपल्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे राज्य (१५)

        • पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश केला जाईल (१८)

प्रकटीकरण ११:१

तळटीपा

  • *

    किंवा “मोजपट्टी.”

  • *

    अर्थात, मंदिराची मुख्य इमारत ज्यात पवित्र आणि परमपवित्र स्थान होते.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ९/१/१९८९, पृ. १२-१३

    नवे जग भाषांतर, पृ. २५३६, २६२५

    प्रकटीकरण कळस, पृ. १६१-१६२

प्रकटीकरण ११:२

तळटीपा

  • *

    अर्थात, मंदिराची मुख्य इमारत ज्यात पवित्र आणि परमपवित्र स्थान होते.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ९/१/१९८९, पृ. १३

    प्रकटीकरण कळस, पृ. १६२-१६३

प्रकटीकरण ११:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. ३

    शुद्ध उपासना, पृ. ११८

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ८/१/१९९४, पृ. ३१

    ११/१/१९९३, पृ. ८-९

    ७/१/१९८६, पृ. ११

    प्रकटीकरण कळस, पृ. १६४

प्रकटीकरण ११:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. १६४

प्रकटीकरण ११:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ५/१५/१९९७, पृ. १२

    प्रकटीकरण कळस, पृ. १६५-१६६

प्रकटीकरण ११:६

तळटीपा

  • *

    किंवा “स्वर्ग.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ५/१५/१९९७, पृ. १२

    प्रकटीकरण कळस, पृ. १६५, १६६-१६७, २०८

प्रकटीकरण ११:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ६

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ९/१/१९८९, पृ. १३

    ७/१/१९८६, पृ. ११

    प्रकटीकरण कळस, पृ. १६७-१६८

प्रकटीकरण ११:८

तळटीपा

  • *

    अर्थात, इजिप्त.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १६७-१६८

प्रकटीकरण ११:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. १६७-१६८

प्रकटीकरण ११:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ७/१/१९८६, पृ. ११

    प्रकटीकरण कळस, पृ. १६७-१६८

प्रकटीकरण ११:११

तळटीपा

  • *

    किंवा “असलेला जीवनाचा आत्मा त्यांच्यामध्ये आला.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. ३

    शुद्ध उपासना, पृ. ११८

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. ३०

    ९/१/१९८९, पृ. १३

    प्रकटीकरण कळस, पृ. १६८-१७०

प्रकटीकरण ११:१२

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांचे शत्रू त्यांना पाहत राहिले.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १६९-१७०, १९९

प्रकटीकरण ११:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७०-१७१

प्रकटीकरण ११:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५८, १७१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९-२०

प्रकटीकरण ११:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५८, १७१-१७२, १७५

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९०, पृ. २३-२४

    ४/१/१९८९, पृ. १९-२०

    १२/१/१९८८, पृ. १९-२०

प्रकटीकरण ११:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७२-१७३

प्रकटीकरण ११:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७२-१७३, १७५

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. ६३-६४

प्रकटीकरण ११:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१५, पृ. ६-७

    ४/१/१९९२, पृ. ६-७

    प्रकटीकरण कळस, पृ. १७३-१७५

    ज्ञान, पृ. १०५

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३७

    यहोवाचे साक्षीदार, पृ. १६

प्रकटीकरण ११:१९

तळटीपा

  • *

    अर्थात, मंदिराचे परमपवित्र स्थान.

  • *

    अर्थात, मंदिराचे परमपवित्र स्थान.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७५-१७६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण ११:१-१९

प्रकटीकरण

११ मग, वेतासारखी एक काठी* मला देण्यात आली आणि असे सांगण्यात आले: “ऊठ आणि देवाच्या मंदिराचं* व वेदीचं माप घे व त्यात उपासना करणारे किती आहेत ते मोज. २ पण मंदिराच्या* बाहेर असलेलं अंगण सोड, त्याचं माप घेऊ नकोस, कारण ते विदेश्‍यांना देण्यात आलं आहे; ते पवित्र नगरीला बेचाळीस महिने पायांखाली तुडवतील. ३ मी माझ्या दोन साक्षीदारांना पाठवेन आणि ते गोणपाट घालून १,२६० दिवस भविष्यवाणी करतील.” ४ पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असलेली जैतुनाची दोन झाडे आणि दोन दीपस्तंभ त्यांना सूचित करतात.

५ त्यांना कोणी इजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या तोंडातून आग निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करून टाकते. जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करेल त्यांना अशाच रीतीने ठार मारले जाईल. ६ त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून आकाश* बंद करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे; तसेच, पाण्याचे रक्‍त करण्याचा आणि वाटेल तितक्या वेळा पृथ्वीला सर्व प्रकारच्या पीडांनी पीडित करण्याचाही त्यांना अधिकार आहे.

७ त्यांचे साक्ष देण्याचे कार्य संपल्यावर, अथांग डोहातून वर येणारा जंगली पशू त्यांच्याशी लढाई करेल आणि त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना ठार मारेल. ८ आणि जिला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि मिसर* म्हटले जाते आणि जिथे त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर* खिळण्यात आले, त्या मोठ्या नगरीच्या मुख्य रस्त्यावर त्यांचे मृतदेह पडून राहतील. ९ आणि अनेक जाती, वंश, भाषा व राष्ट्रे यांतील लोक साडेतीन दिवस त्यांचे मृतदेह पाहत राहतील आणि ते त्यांचे मृतदेह कबरेत ठेवू देणार नाहीत. १० आणि पृथ्वीवर राहणारे लोक त्यांच्याबद्दल आनंद साजरा करतील आणि एकमेकांना भेटी पाठवतील; कारण, या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना यातना दिल्या होत्या.

११ मग, साडेतीन दिवसांनंतर देवापासून असलेली जीवनशक्‍ती त्यांच्यामध्ये आली,* तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले ते फार घाबरले. १२ आणि त्यांना आकाशातून एक मोठा आवाज ऐकू आला, जो त्यांना म्हणाला: “इथे वर या.” मग, ते ढगातून वर आकाशात गेले आणि त्यांच्या शत्रूंनी त्यांना पाहिले.* १३ त्याच वेळी एक मोठा भूकंप झाला आणि त्या नगरीचा दहावा भाग कोसळला; भूकंपामुळे सात हजार लोक मारले गेले आणि बाकीचे लोक घाबरले व त्यांनी स्वर्गाच्या देवाचा गौरव केला.

१४ दुसरी विपत्ती होऊन गेली आहे. पाहा! तिसरी विपत्ती लवकरच येत आहे.

१५ सातव्या देवदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा स्वर्गात मोठ्या घोषणा ऐकू आल्या: “जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं व त्याच्या ख्रिस्ताचं झालं आहे, आणि तो सदासर्वकाळ राजा म्हणून राज्य करेल.”

१६ तेव्हा देवासमोर आपल्या राजासनांवर बसलेल्या चोवीस वडिलांनी देवाला नमन करून त्याची उपासना केली; १७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहे आणि राजा म्हणून राज्य करण्यास सुरुवात केली आहे. १८ पण, राष्ट्रे क्रोधित झाली आणि तुझा क्रोध प्रकट झाला; मेलेल्यांचा न्याय करण्याची आणि तुझ्या दासांना अर्थात संदेष्ट्यांना, पवित्र जनांना व तुझ्या नावाची भीती बाळगणाऱ्‍या लहानमोठ्यांना प्रतिफळ देण्याची आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश करण्याची नियुक्‍त वेळ आली.”

१९ तेव्हा, स्वर्गात देवाचे मंदिर* उघडले आणि मंदिरात* त्याच्या कराराचा कोश दिसला. मग विजा चमकल्या, मोठे आवाज व ढगांचे गडगडाट ऐकू आले, भूकंप झाला आणि मोठमोठ्या गारा पडल्या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा