वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण पुस्तकाची रूपरेषा

    • १

      • येशूद्वारे देवाकडून प्रकटीकरण (१-३)

      • सात मंडळ्यांना नमस्कार (४-८)

        • “अल्फा व ओमेगा मी आहे” (८)

      • आत्म्याच्या प्रभावाखाली येऊन योहान प्रभूच्या दिवसात (९-११)

      • गौरविण्यात आलेल्या येशूचा दृष्टान्त (१२-२०)

प्रकटीकरण १:१

तळटीपा

  • *

    किंवा “खुलासा; उघड करणे.”

  • *

    किंवा “येशूचा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ३/२०१९, पृ. २-३

    प्रकटीकरण कळस, पृ. १५-१७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १५, १९

    ११/१/१९९९, पृ. ६

प्रकटीकरण १:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १६-१७

प्रकटीकरण १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३१

    १२/१/१९९९, पृ. १४-१९

    ४/१/१९८९, पृ. १०-११

    १२/१/१९८८, पृ. १६-१७

    प्रकटीकरण कळस, पृ. ६, १७

प्रकटीकरण १:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. १८

प्रकटीकरण १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १०

प्रकटीकरण १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९

प्रकटीकरण १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    पृ. ६१-६२

    ४/१/१९९३, पृ. ९-१०

    ३/१/१९८८, पृ. २०

    प्रकटीकरण कळस, पृ. १९-२०

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १४६

प्रकटीकरण १:८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    अर्थात, सुरुवात व शेवट. अल्फा व ओमेगा हे ग्रीक वर्णमालेतील पहिले व शेवटचे अक्षर आहे.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१०

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०-३१

    १२/१/१९९९, पृ. १०

    प्रकटीकरण कळस, पृ. २०

प्रकटीकरण १:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २०-२१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १४-१५

प्रकटीकरण १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २२-२४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १०

    १२/१५/१९९७, पृ. ११

    ४/१/१९८९, पृ. ११-१२

    १२/१/१९८८, पृ. १७

    ९/१/१९८९, पृ. १०

प्रकटीकरण १:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०

    ४/१/१९८९, पृ. ११

    १२/१/१९८८, पृ. १७

    प्रकटीकरण कळस, पृ. २३-२४

प्रकटीकरण १:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५, २८-२९

प्रकटीकरण १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५

प्रकटीकरण १:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५

प्रकटीकरण १:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५-२६

प्रकटीकरण १:१६

तळटीपा

  • *

    किंवा “चेहरा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. १४

    प्रकटीकरण कळस, पृ. २६-२७, २८-२९

प्रकटीकरण १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०-३१

    प्रकटीकरण कळस, पृ. २६-२८

प्रकटीकरण १:१८

तळटीपा

  • *

    किंवा “हेडीस.” अर्थात, मृत्यूनंतर सर्व मानव जिथे जातात असे लाक्षणिक ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७-२८

    उपासनेतील ऐक्य, पृ. ७३-७४

प्रकटीकरण १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २४

प्रकटीकरण १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ११/२०१९, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. १४

    ९/१५/२०१०, पृ. २७-२८

    १/१५/२००९, पृ. ३०

    ४/१/२००७, पृ. २८

    ५/१५/२००३, पृ. १०

    ३/१५/२००२, पृ. १४

    १२/१/१९८९, पृ. २१

    प्रकटीकरण कळस, पृ. २८-२९, १३६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १:१-२०

प्रकटीकरण

१ येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण,* जे देवाने त्याला यासाठी दिले, की लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या सेवकांना दाखवाव्यात. आणि येशूने आपल्या दूताला पाठवून त्याच्याद्वारे देवाचा* सेवक योहान याला ते चिन्हांच्या रूपात प्रकट केले. २ देवाने दिलेल्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताने दिलेल्या साक्षीविषयी, हो, आपण पाहिलेल्या सर्व गोष्टींविषयी योहानने साक्ष दिली. ३ जो या भविष्यवाणीचे शब्द मोठ्याने वाचतो आणि जे या भविष्यवाणीचे शब्द ऐकून त्यात सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात ते आशीर्वादित आहेत, कारण नेमलेली वेळ जवळ आली आहे.

४ आशिया प्रांतात असलेल्या सात मंडळ्यांना योहानकडून:

“जो आहे, जो होता आणि जो येत आहे,” त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनापुढे असलेल्या सात आत्म्यांकडून, ५ तसेच, जो “विश्‍वासू साक्षीदार,” “मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला,” आणि “पृथ्वीवरच्या राजांचा शासक” आहे, त्या येशू ख्रिस्ताकडून तुम्हाला अपार कृपा व शांती मिळो.

ज्याचे आपल्यावर प्रेम आहे आणि ज्याने स्वतःच्या रक्‍ताद्वारे आपल्याला पापांपासून मुक्‍त केले, ६ आणि त्याचा देव व पिता याच्याकरता ज्याने आपल्याला एक राज्य आणि याजक असे केले, त्याला सदासर्वकाळ गौरव आणि सामर्थ्य मिळो. आमेन.

७ पाहा! तो ढगांसोबत येत आहे आणि प्रत्येक डोळा त्याला पाहील आणि ज्यांनी त्याला भोसकले तेही त्याला पाहतील; आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरचे सर्व वंश छाती बडवून शोक करतील. हो, आमेन.

८ “जो आहे, जो होता आणि जो येत आहे, जो सर्वशक्‍तिमान,” तो यहोवा* देव म्हणतो, “अल्फा व ओमेगा* मी आहे.”

९ मी योहान तुमचा भाऊ आणि येशू ख्रिस्ताच्या संबंधाने तुमच्यासोबत संकटात, राज्यात व धीरात तुमचा भागीदार आहे. देवाबद्दल बोलल्यामुळे आणि येशूविषयी साक्ष दिल्यामुळे मी पात्म म्हटलेल्या बेटावर होतो. १० तेव्हा आत्म्याच्या प्रभावाखाली येऊन मी प्रभूच्या दिवसात पोचलो आणि मला पाठीमागून कर्णा वाजत असल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला, ११ जो म्हणाला: “तुला जे काही दिसतं ते गुंडाळीत लिही, आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया इथे असलेल्या सात मंडळ्यांना पाठव.”

१२ माझ्यासोबत कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी वळलो, तेव्हा मला सोन्याचे सात दीपस्तंभ दिसले. १३ आणि दीपस्तंभांच्या मधोमध मला पायघोळ वस्त्र घातलेला आणि छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीतरी दिसला. १४ त्याचे डोके आणि केस पांढऱ्‍या लोकरीसारखे, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे आगीच्या ज्वालांसारखे होते. १५ त्याचे पाय, भट्टीत तापवलेल्या शुद्ध तांब्यासारखे आणि त्याचा आवाज पाण्याच्या जोरदार प्रवाहासारखा होता. १६ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते आणि त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार, दुधारी तलवार निघाली होती आणि त्याचे रूप* तेजस्वीपणे चमकणाऱ्‍या सूर्यासारखे होते. १७ त्याला पाहून मी जणू मेल्याप्रमाणे त्याच्या पायाजवळ पडलो.

तेव्हा त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवून म्हटले: “भिऊ नकोस. मी पहिला आणि शेवटला आहे, १८ आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो, पण पाहा! मी सदासर्वकाळ जिवंत राहतो आणि माझ्याजवळ मरणाच्या आणि कबरेच्या* किल्ल्या आहेत. १९ म्हणून तू पाहिलेल्या या गोष्टी, ज्या आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्या गोष्टी लिहून घे. २० माझ्या उजव्या हातात तू पाहिलेल्या सात ताऱ्‍यांचे आणि सोन्याच्या सात दीपस्तंभाचे पवित्र रहस्य असे आहे: सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे दूत आणि सात दीपस्तंभ म्हणजे सात मंडळ्या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा