वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर १०
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • १०

      • पौल आपल्या सेवेचे समर्थन करतो (१-१८)

        • आपली शस्त्रे जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत (४, ५)

२ करिंथकर १०:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००३, पृ. २४

    ८/१/१९९४, पृ. १५-१६

२ करिंथकर १०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१६, पृ. ८

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१०, पृ. १२-१३

    ९/१५/२००९, पृ. २२

    १०/१/१९९९, पृ. १०-१२

    २/१/१९९४, पृ. ११

२ करिंथकर १०:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१९, पृ. ८-१३

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. २७

    २/१५/२०१०, पृ. १२-१३

    १०/१/१९९९, पृ. १०-१२

    २/१/१९९४, पृ. ११

२ करिंथकर १०:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०००, पृ. १३

    ११/१५/१९९६, पृ. १३

२ करिंथकर १०:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “शब्दांत आम्ही जे आहोत.”

  • *

    शब्दशः “कृतीतही असू.”

२ करिंथकर १०:१३

तळटीपा

  • *

    किंवा “मापून आम्हाला वाटून दिले आहे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २८

२ करिंथकर १०:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ८/८/१९९९, पृ. २०-२१

२ करिंथकर १०:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर १०:१-१८

२ करिंथकर

१० आता मी, पौल, तुमच्यामध्ये असताना दीनदुबळा, पण तुमच्यापासून दूर असताना कडकपणे वागणारा असा वाटत असलो, तरी ख्रिस्ताच्या सौम्यतेने आणि कृपेने मी तुम्हाला विनंती करतो. २ मी आशा करतो, की तिकडे आल्यावर कडकपणे वागण्याची वेळ माझ्यावर येऊ नये; अर्थात, आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागतो असा आमच्याविषयी विचार करणाऱ्‍या काहींविरुद्ध कदाचित मला कठोर पावले उचलावी लागतील. ३ कारण आम्ही जरी जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करत नाही. ४ कारण आमच्या लढाईची शस्त्रे जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत; तर ती देवाकडून मिळालेली शक्‍तिशाली शस्त्रे आहेत, ज्यांच्या साहाय्याने आम्ही भक्कम बुरुजांसारख्या असलेल्या गोष्टीही उलथून टाकू शकतो. ५ कारण, सर्व प्रकारचे तर्कवितर्क व देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उभी केलेली प्रत्येक गोष्ट आम्ही उलथून टाकतो आणि प्रत्येक विचाराला कैदी बनवून ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो; ६ आज्ञा न पाळणाऱ्‍या प्रत्येक मनुष्याला शिक्षा करण्यास आम्ही तयार आहोत; पण, आधी तुम्ही तुमचा आज्ञाधारकपणा पूर्णपणे सिद्ध करून दाखवा.

७ तुम्ही बाहेरचे रूप पाहून मत बनवता. आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर एखाद्याला स्वतःविषयी भरवसा असेल, तर त्याने या गोष्टीचा पुन्हा विचार करावा: जितका तो ख्रिस्ताचा आहे, तितकेच आम्हीसुद्धा आहोत. ८ कारण प्रभूने, तुम्हाला खाली पाडण्याचा नाही, तर तुमची उन्‍नती करण्याचा जो अधिकार आम्हाला दिला आहे, त्याविषयी मी जरा जास्तच बढाई मारली, तरी मला लज्जित व्हावे लागणार नाही. ९ मी माझ्या पत्रांद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, असे समजू नका. १० कारण ते म्हणतात: “त्याची पत्रे तर फार वजनदार आणि प्रभावशाली असतात, पण प्रत्यक्षात तो दुबळा आहे आणि त्याची भाषणे मुळीच ऐकण्यासारखी नसतात.” ११ असे म्हणणाऱ्‍या मनुष्याने हे लक्षात घ्यावे, की तुमच्यापासून दूर असताना पत्रात आम्ही जे काही म्हणतो,* ते प्रत्यक्ष तुमच्यामध्ये असताना आम्ही करूनही दाखवू.* १२ कारण स्वतःची शिफारस करणाऱ्‍यांमध्ये स्वतःला गणण्याची किंवा त्यांच्यासोबत आपली तुलना करण्याची आम्ही हिंमत करत नाही. असे लोक, जेव्हा स्वतःच्याच स्तरांनुसार स्वतःला मापतात आणि स्वतःची तुलना स्वतःशीच करतात, तेव्हा ते किती बुद्धिहीन आहेत हे दाखवून देतात.

१३ पण, आम्हाला नेमून दिलेल्या मर्यादेपलीकडे आम्ही बढाई मारणार नाही; तर देवाने जे क्षेत्र आम्हाला मापून दिले आहे,* त्याच्या मर्यादेत राहूनच आम्ही बढाई मारू; आणि त्या क्षेत्रात तुम्हीसुद्धा येता. १४ खरोखर, तुम्ही जणू आमच्या क्षेत्रात नसल्याप्रमाणे आम्ही आमची मर्यादा ओलांडलेली नाही; कारण, ख्रिस्ताचा आनंदाचा संदेश घेऊन आम्ही सगळ्यात आधी तुमच्याकडेच आलो होतो. १५ आम्हाला नेमून दिलेल्या मर्यादेपलीकडे जाऊन आम्ही दुसऱ्‍या कोणाच्या परिश्रमांविषयी बढाई मारत नाही; तर, जसजसा तुमचा विश्‍वास वाढत जाईल, तसतशी आमच्या क्षेत्रात आम्ही केलेल्या कार्याची प्रगती होत जाईल, अशी आम्हाला आशा आहे. मग, आमचे कार्य वाढतच जाईल, १६ यासाठी की, तुमच्यासोबत इतर देशांतही आम्ही आनंदाचा संदेश घोषित करावा आणि दुसऱ्‍या कोणाच्या क्षेत्रात अगोदरच झालेल्या कार्याविषयी आम्ही बढाई मारू नये. १७ “पण, जो कोणी बढाई मारतो, त्याने यहोवाच्या* बाबतीत बढाई मारावी.” १८ कारण, जो स्वतःची शिफारस करतो त्याला नाही, तर ज्याची शिफारस यहोवा* करतो, त्यालाच मान्य केले जाते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा