वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १३
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्ये पुस्तकाची रूपरेषा

    • १३

      • बर्णबा आणि शौल यांना मिशनरी म्हणून पाठवले जाते (१-३)

      • कूप्रमध्ये सेवाकार्य (४-१२)

      • पिसिदियातील अंत्युखियामध्ये पौलचे भाषण (१३-४१)

      • विदेश्‍यांकडे जाण्याची भविष्यवाणीद्वारे आज्ञा (४२-५२)

प्रेषितांची कार्यं १३:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “निगर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २०

प्रेषितांची कार्यं १३:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “जाहीरपणे सेवा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८५-८६

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०००, पृ. १२

    १०/१/१९९७, पृ. १३-१४

    १२/१/१९९२, पृ. ४

    ६/१/१९८९, पृ. ११-१२

प्रेषितांची कार्यं १३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६

प्रेषितांची कार्यं १३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६-८७

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००४, पृ. १९-२०

    ६/१/१९८९, पृ. ११-१२

प्रेषितांची कार्यं १३:५

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांचा मदतनीस.”

  • *

    अर्थात, योहान मार्क.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७

    ७/१/२००४, पृ. २०-२१

    १/१/१९९१, पृ. २०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६-८७

प्रेषितांची कार्यं १३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६-८७

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००४, पृ. २१-२२

    १२/१/१९९२, पृ. ४

प्रेषितांची कार्यं १३:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८७, पृ. १२

प्रेषितांची कार्यं १३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

प्रेषितांची कार्यं १३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

प्रेषितांची कार्यं १३:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं १३:११

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २०

प्रेषितांची कार्यं १३:१२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८७, पृ. १२

प्रेषितांची कार्यं १३:१३

तळटीपा

  • *

    अर्थात, योहान मार्क.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८८-८९

प्रेषितांची कार्यं १३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. ५

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८९-९०

प्रेषितांची कार्यं १३:१७

तळटीपा

  • *

    म्हणजे, “इजिप्त.”

प्रेषितांची कार्यं १३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९८७, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं १३:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीजातून.”

प्रेषितांची कार्यं १३:२९

तळटीपा

  • *

    किंवा “झाडावरून.” शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “स्मारक कबरेत.”

प्रेषितांची कार्यं १३:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. २०

प्रेषितांची कार्यं १३:३६

तळटीपा

  • *

    किंवा “देवाची इच्छा पूर्ण केली.”

प्रेषितांची कार्यं १३:४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. १३

प्रेषितांची कार्यं १३:४४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं १३:४५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ९०-९२

प्रेषितांची कार्यं १३:४७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९३, पृ. १४-१६

प्रेषितांची कार्यं १३:४८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१८, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०००, पृ. ११-१२

    ३/१/१९९२, पृ. १०-११

प्रेषितांची कार्यं १३:४९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं १३:५०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ९१

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:५१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ९२, ९३-९५

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:५२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १३:१-५२

प्रेषितांची कार्यं

१३ अंत्युखियाच्या मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते असे: बर्णबा, काळा* म्हटलेला शिमोन, कुरेनेचा लूक्य, प्रांताधिकारी हेरोदसोबत शिकलेला मनाएन आणि शौल. २ ते यहोवाची* सेवा* व उपास करत असताना पवित्र आत्म्याने म्हटले: “मी ज्या कार्यासाठी बर्णबा आणि शौल यांना निवडलं आहे त्याकरता त्यांना वेगळं करा.” ३ मग, उपवास व प्रार्थना केल्यानंतर त्यांनी त्या दोघांवर हात ठेवले आणि त्यांना पाठवून दिले.

४ मग, पवित्र आत्म्याद्वारे पाठवण्यात आलेली ही माणसे खाली सलुकीयाला गेली आणि तिथून जहाजाने कुप्रला गेली. ५ सलमीना या ठिकाणी पोचल्यावर ती माणसे यहुद्यांच्या सभास्थानांत देवाच्या वचनाची घोषणा करू लागली. त्यांच्यासोबत त्यांची सेवा करण्यासाठी* योहानसुद्धा* होता.

६ त्या संपूर्ण बेटाचा दौरा पूर्ण केल्यावर ते पफे इथे आले. तिथे त्यांना बर्येशू नावाचा एक यहुदी माणूस भेटला, जो एक जादूगार व खोटा संदेष्टा होता. ७ तो त्या प्रांताचा राज्यपाल* सिर्ग्य पौल याच्याकडे काम करायचा. सिर्ग्य पौल हा एक बुद्धिमान माणूस होता. त्याला देवाचे वचन ऐकण्याची उत्सुकता असल्यामुळे त्याने शौल आणि बर्णबा यांना आपल्याकडे बोलावून घेतले. ८ पण, त्याने प्रभूवर विश्‍वास ठेवू नये म्हणून अलीम जादूगार म्हटलेला बर्येशू त्यांचा विरोध करू लागला. (अलीम या नावाचा अर्थ जादूगार असा होतो) ९ तेव्हा, शौल ज्याला पौल असेही म्हटले जाते त्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हटले: १० “अरे सर्व प्रकारच्या कपटाने आणि सर्व प्रकारच्या लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या* पुत्रा, सर्व नीतिमत्त्वाच्या वैऱ्‍या, तू यहोवाच्या* सरळ मार्गांचा विरोध करण्याचं सोडून देणार नाहीस का? ११ पाहा! यहोवाचा* हात तुझ्याविरुद्ध उठला आहे; तू आंधळा होशील आणि काही काळापर्यंत तुला सूर्यप्रकाश दिसणार नाही.” इतक्यात त्याच्यावर दाट धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली; आणि कोणीतरी आपल्याला हात धरून न्यावे म्हणून तो चाचपडत फिरू लागला. १२ मग, जे काही घडले होते ते पाहून राज्यपालाने प्रभूवर विश्‍वास ठेवला, कारण यहोवाविषयीच्या* शिकवणीने तो थक्क झाला होता.

१३ नंतर, पौल आणि त्याचे साथीदार समुद्रमार्गाने पफे इथून निघून पंफुल्यातील पिर्गा इथे पोहचले. योहान* मात्र त्यांना सोडून यरुशलेमला परतला. १४ पण, पिर्गा इथून निघून ते पिसिदियातील अंत्युखिया इथे आले आणि शब्बाथाच्या दिवशी ते तिथल्या सभास्थानात जाऊन बसले. १५ नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या लिखाणांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्‍यांनी त्यांना असा निरोप पाठवला: “माणसांनो, बांधवांनो, लोकांना प्रोत्साहन मिळेल असं काही तुम्हाला सांगायचं असेल, तर सांगा.” १६ तेव्हा, पौल उठून उभा राहिला आणि हाताने इशारा करून म्हणाला:

“इस्राएलच्या लोकांनो आणि देवाचं भय बाळगणाऱ्‍या इतर लोकांनो, ऐका. १७ या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडलं आणि ते मिसर* देशात परके म्हणून राहत असताना, त्याने त्यांना एक शक्‍तिशाली राष्ट्र बनवलं आणि आपल्या पराक्रमी हाताने तिथून बाहेर आणलं. १८ आणि सुमारे चाळीस वर्षांपर्यंत त्याने ओसाड प्रदेशात त्यांचं वाईट वर्तन सहन केलं. १९ मग, कनान देशातील सात राष्ट्रांचा नाश केल्यानंतर देवाने तो देश त्यांना वतन म्हणून दिला. २० हे सर्व सुमारे चारशे पन्‍नास वर्षांच्या कालावधीदरम्यान घडलं.

यानंतर, त्याने त्यांच्यावर न्यायाधीश नेमले. न्यायाधीशांचा काळ शमुवेल संदेष्ट्यापर्यंत चालला. २१ पण, पुढे त्यांनी एका राजाची मागणी केली. तेव्हा देवाने कीशचा पुत्र शौल याला राजा बनवलं. तो बन्यामीन वंशातला असून त्याने चाळीस वर्षं राज्य केलं. २२ त्याला काढून टाकल्यावर त्याने राजा म्हणून दावीदला त्यांच्यासाठी उभं केलं. त्याच्याबद्दल त्याने अशी साक्ष दिली: ‘इशायचा पुत्र दावीद हा मला माझ्या मनासारखा मनुष्य मिळाला आहे; तो माझी सर्व इच्छा पूर्ण करेल.’ २३ देवाने आपल्या अभिवचनानुसार, या माणसाच्या संततीतून* इस्राएलसाठी एक तारणकर्ता पाठवला; तो म्हणजे येशू. २४ तो येण्याआधी, योहानने सर्व इस्राएल लोकांना पश्‍चात्तापाचे चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घेण्याविषयी जाहीरपणे घोषणा केली होती. २५ पण, आपल्या कार्याच्या शेवटीशेवटी योहान असे म्हणायचा: ‘मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? मी तो नाही. पण पाहा! माझ्यामागून जो येत आहे त्याच्या पायांतल्या जोड्यांचे बंद सोडण्यासही मी योग्य नाही.’

२६ बांधवांनो, अब्राहामच्या वंशजांनो आणि देवाचं भय बाळगणाऱ्‍या तुमच्यातील इतर लोकांनो, ऐका. तारणाचा हा संदेश देवाने आपल्यापर्यंत पोचवला आहे. २७ यरुशलेममध्ये राहणाऱ्‍यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्‍यांनी त्याला ओळखलं नाही. पण त्याचा न्याय करताना, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या; या गोष्टी, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मोठ्याने वाचल्या जातात. २८ त्यांना त्याच्यामध्ये मृत्युदंडाचं कोणतंही कारण सापडलं नाही, तरीसुद्धा त्याला मृत्युदंड देण्याची मागणी त्यांनी पिलातकडे केली. २९ मग, त्याच्याविषयी लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्याला वधस्तंभावरून* खाली उतरवलं आणि एका कबरेत* ठेवलं. ३० पण, देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं, ३१ आणि जे त्याच्याबरोबर गालीलहून यरुशलेमला गेले होते त्यांना तो पुष्कळ दिवस दिसला. आणि आता हेच लोक त्याच्याविषयी लोकांना साक्ष देत आहेत.

३२ म्हणूनच, आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनाविषयीचा आनंदाचा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत. ३३ येशूचं पुनरुत्थान करून देवाने ते अभिवचन त्यांच्या मुलांसाठी म्हणजे आपल्यासाठी सर्व प्रकारे पूर्ण केलं आहे; त्याबद्दल दुसऱ्‍या स्तोत्रात असं लिहिलं आहे: ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुझा पिता बनलो आहे.’ ३४ त्याला कुजण्याचा कधीच अनुभव येऊ नये म्हणून देवाने मेलेल्यांतून त्याचं पुनरुत्थान केलं. या गोष्टी सिद्ध करण्यासाठी देवाने म्हटलं: ‘दावीदला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला एकनिष्ठ व खरं प्रेम दाखवेन.’ ३५ म्हणूनच, दुसऱ्‍या एका स्तोत्रात असं म्हटलं आहे: ‘तुझ्या एकनिष्ठ सेवकाचं शरीर तू कुजू देणार नाहीस.’ ३६ दावीदच्या बाबतीत पाहता, त्याने आयुष्यभर देवाची सेवा केली;* मग तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पूर्वजांच्या शेजारी पुरण्यात आलं आणि त्याचं शरीर कुजलं. ३७ पण, देवाने ज्याला मेलेल्यांतून उठवलं त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही.

३८ तेव्हा बांधवांनो, ही गोष्ट जाणून घ्या, की याच्याचद्वारे पापांची क्षमा मिळू शकते, हा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत. ३९ आणि मोशेच्या नियमशास्त्राद्वारे ज्या सर्व गोष्टींपासून तुम्हाला निर्दोष ठरवलं जाऊ शकत नव्हतं, त्या सर्व गोष्टींपासून, विश्‍वास ठेवणारा प्रत्येक जण याच्याचद्वारे निर्दोष ठरवला जातो. ४० त्यामुळे, संदेष्ट्यांच्या लिखाणांत जे म्हटलं आहे ते तुमच्यावर येऊ नये म्हणून सांभाळा: ४१ ‘अरे धिक्कार करणाऱ्‍यांनो, पाहा आणि आश्‍चर्य करा व नाहीसे व्हा, कारण मी तुमच्या दिवसांत एक असं कार्य करणार आहे, ज्याविषयी कोणी तुम्हाला सविस्तर सांगितलं तरी तुम्ही विश्‍वास ठेवणार नाही.’”

४२ मग, ते बाहेर जाऊ लागले तेव्हा या गोष्टींविषयी पुढील शब्बाथाच्या दिवशी पुन्हा बोलण्याची लोक त्यांना विनंती करू लागले. ४३ त्यामुळे सभा संपल्यानंतर, देवाची उपासना करणारे यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले अनेक जण, पौल आणि बर्णबा यांच्या मागे गेले. तेव्हा, त्या दोघांनी त्यांच्याशी बोलून त्यांना देवाच्या अपार कृपेत टिकून राहण्याचा आर्जव केला.

४४ पुढच्या शब्बाथाच्या दिवशी, शहरातील जवळजवळ सर्वच लोक यहोवाचे* वचन ऐकण्यासाठी एकत्र आले. ४५ लोकांची गर्दी पाहून यहुद्यांचा जळफळाट झाला आणि पौल ज्या गोष्टी सांगत होता त्यांचा विरोध करून ते देवाची निंदा करू लागले. ४६ मग, पौल आणि बर्णबा धैर्याने त्यांना म्हणाले: “देवाचं वचन आधी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. पण, तुम्ही ते नाकारलं आणि याद्वारे सर्वकाळाचं जीवन मिळण्यास आपण योग्य नाही हे दाखवून दिलं. त्यामुळे पाहा! आम्ही विदेश्‍यांकडे जात आहोत. ४७ कारण यहोवाने* आम्हाला अशी आज्ञा दिली: ‘तू पृथ्वीच्या शेवटापर्यंत तारणाचा संदेश घोषित करावा म्हणून मी तुला विदेश्‍यांकरता प्रकाश असं नेमलं आहे.’”

४८ विदेश्‍यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला व ते यहोवाच्या* वचनाचा गौरव करू लागले, आणि सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या सर्वांनी विश्‍वास स्वीकारला. ४९ शिवाय, यहोवाच्या* वचनाचा प्रसार संपूर्ण देशात होत गेला. ५० पण, यहुद्यांनी शहरातील धार्मिक वृत्तीच्या व प्रतिष्ठित स्त्रियांना आणि प्रमुख पुरुषांना भडकवले. मग, पौल आणि बर्णबा यांचा छळ करण्यात आला व त्यांना शहराबाहेर घालवून देण्यात आले. ५१ त्यामुळे त्या शहरातील लोकांना साक्ष मिळावी म्हणून त्यांनी आपल्या पायांची धूळ झटकली आणि ते इकुन्या शहराला गेले. ५२ आणि शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होत गेले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा