वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्ये पुस्तकाची रूपरेषा

    • १

      • थियफील याला उद्देशून (१-५)

      • पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत साक्षीदार (६-८)

      • येशू स्वर्गात घेतला जातो (९-११)

      • शिष्य एकत्र जमतात (१२-१४)

      • यहूदाची जागा घेण्यासाठी मत्थियाची निवड (१५-२६)

प्रेषितांची कार्यं १:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १५

प्रेषितांची कार्यं १:२

तळटीपा

  • *

    किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीद्वारे.” शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १५-१६

प्रेषितांची कार्यं १:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६

    १२/१/१९९०, पृ. २५

    १/१/१९९०, पृ. १०-११

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३१

प्रेषितांची कार्यं १:७

तळटीपा

  • *

    अर्थात, नेमलेले दिवस.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९८, पृ. १७-१८

    ९/१५/१९९८, पृ. १०

    सावध राहा!,

    ६/८/१९९८, पृ. २९

प्रेषितांची कार्यं १:८

तळटीपा

  • *

    किंवा “सर्वात दूरच्या भागांत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. २९

    १/१५/२०११, पृ. २२

    ४/१५/२०१०, पृ. ११

    ५/१५/२००८, पृ. ३१

    ७/१/२००५, पृ. २५

    ४/१/२००१, पृ. ९, १३-१४

    ४/१/२०००, पृ. १०-११

    ११/१५/१९९८, पृ. १७-१८

    ५/१५/१९९५, पृ. ११

    १/१/१९९०, पृ. १०-११

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. २, १६-१७, ८५, २१८-२२०

प्रेषितांची कार्यं १:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २५

प्रेषितांची कार्यं १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २५

प्रेषितांची कार्यं १:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १७

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. १४-१५

    ४/१/१९९३, पृ. ८-१०

    १२/१/१९९०, पृ. २५

    ४/१/१९८९, पृ. ११-१२

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३१

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १४५

प्रेषितांची कार्यं १:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “एका शब्बाथ दिवसाच्या अंतरावर.” शब्बाथाच्या दिवशी यहुद्यांना इतक्याच अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी होती.

प्रेषितांची कार्यं १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २५

प्रेषितांची कार्यं १:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१५, पृ. ३०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १८

प्रेषितांची कार्यं १:१५

तळटीपा

  • *

    किंवा “जमलेल्या लोकांची.”

प्रेषितांची कार्यं १:१८

तळटीपा

  • *

    किंवा “शरीर मधोमध फुटलं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    १२/१/१९९०, पृ. २५

    ८/१/१९९०, पृ. ५-६

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२१

प्रेषितांची कार्यं १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २५

प्रेषितांची कार्यं १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ११/२०१८, पृ. ३-४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २५

    १०/१/१९९०, पृ. ११

प्रेषितांची कार्यं १:२१

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याचे आत येणे व बाहेर जाणे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ११/२०१८, पृ. ३-४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १८-१९

प्रेषितांची कार्यं १:२२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ११/२०१८, पृ. ३-४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १८-१९

प्रेषितांची कार्यं १:२४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं १:२६

तळटीपा

  • *

    किंवा “ओळखण्यात आले,” अर्थात, त्यालाही इतर अकरा प्रेषितांसारखेच मानण्यात आले.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १:१-२६

प्रेषितांची कार्यं

१ हे थियफील, येशूने ज्या सर्व गोष्टी करण्यास व शिकवण्यास सुरुवात केली, त्यांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले होते. २ त्याला स्वर्गात घेण्यात आले त्या दिवसापर्यंतच्या घटना त्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. त्याआधी, त्याने आपल्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे* काही सूचना दिल्या होत्या. ३ मरणापर्यंत दुःख सहन केल्यानंतर, त्याने अनेक खातरीलायक पुराव्यांच्या साहाय्याने आपण पुन्हा जिवंत झाल्याचे आपल्या शिष्यांना दाखवले. चाळीस दिवसांच्या काळादरम्यान तो बऱ्‍याचदा त्यांना दिसला आणि त्यांच्याशी देवाच्या राज्याबद्दल बोलत राहिला. ४ शिष्यांची भेट घेत असताना त्याने त्यांना असा आदेश दिला: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने ज्याविषयी वचन दिलं आहे, आणि ज्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलं आहे त्याची वाट पाहा; ५ कारण योहानने तर पाण्याने बाप्तिस्मा* दिला होता, पण थोड्याच दिवसांनंतर तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होईल.”

६ त्यामुळे, ते एकत्र जमलेले असताना त्यांनी त्याला विचारले: “प्रभू, तू आताच इस्राएलच्या राज्याची पुनःस्थापना करणार आहेस का?” ७ तो त्यांना म्हणाला: “जे काळ व जे समय* पित्याने आपल्या इच्छेनुसार ठरवले आहेत, ते तुम्ही जाणून घेऊ शकत नाही. ८ पण पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, सबंध यहूदीयात आणि शोमरोनात, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत* माझ्याविषयी साक्ष द्याल.” ९ या गोष्टी बोलल्यावर, ते अजून त्याच्याकडे पाहतच होते तेवढ्यात तो वर घेतला गेला आणि एका ढगाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. १० तो जात असताना ते आकाशाकडे एकटक पाहत होते. तेव्हा अचानक, पांढरेशुभ्र कपडे घातलेली दोन माणसे त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली ११ आणि म्हणाली: “गालीलच्या माणसांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हा येशू जो तुमच्यामधून वर आकाशात घेतला गेला, तो जसा तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिलं त्याच पद्धतीने परत येईल.”

१२ मग ते जैतुनांच्या डोंगरावरून यरुशलेमला परत आले. हा डोंगर यरुशलेमपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर* होता. १३ यरुशलेमला पोचल्यावर ते जिथे राहत होते त्या माडीवरच्या खोलीत गेले. तिथे पेत्र याच्याशिवाय योहान व याकोब, तसेच अंद्रिया, फिलिप्प व थोमा, बर्थलमय आणि मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब आणि ज्याला आवेशी म्हणायचे तो शिमोन, तसेच, याकोबचा मुलगा यहूदा हेदेखील होते. १४ ते सर्व जण एकजुटीने सतत प्रार्थना करत राहिले. त्यांच्यासोबत काही स्त्रिया व येशूची आई मरीया, तसेच त्याचे भाऊदेखील होते.

१५ त्या दिवसांत बांधव एकत्र जमले असताना (त्यांची* संख्या सुमारे एकशेवीस इतकी होती) पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला: १६ “माणसांनो, भावांनो, ज्याने येशूला अटक करणाऱ्‍यांना त्याच्यापर्यंत नेलं, त्या यहूदाबद्दल पवित्र आत्म्याने दावीदच्या द्वारे जी भविष्यवाणी केली होती ती पूर्ण होणं आवश्‍यक होतं. १७ कारण तोही आपल्यातलाच एक होता आणि त्यालाही या सेवाकार्यासाठी निवडण्यात आलं होतं. १८ (तर याच माणसाने त्याच्या अनीतीच्या कमाईने एक शेत विकत घेतलं. तो डोक्यावर आपटून पडला व त्याचं पोट फुटलं* आणि त्याची सर्व आतडी बाहेर आली. १९ हे यरुशलेमच्या सर्व रहिवाशांना कळलं आणि त्यामुळे त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा म्हणजे, “रक्‍ताचे शेत” असं नाव पडलं.) २० कारण स्तोत्रांच्या पुस्तकात असे लिहिण्यात आले आहे, ‘त्याचं निवासस्थान ओसाड पडो आणि त्यात एकही रहिवासी न राहो’ तसेच, ‘देखरेख करण्याची त्याची जबाबदारी दुसऱ्‍याला मिळो.’ २१ म्हणूनच, प्रभू येशूने आमच्यात केलेली अनेक कार्ये* ज्या माणसांनी त्या सबंध काळात आमच्यामध्ये राहून पाहिली आहेत; २२ म्हणजे, योहानने त्याला बाप्तिस्मा दिला त्या दिवसापासून ते ज्या दिवशी तो आमच्यातून वर घेतला गेला, त्या दिवसापर्यंत त्याने केलेली सर्व कार्ये ज्यांनी पाहिली आहेत, त्यांच्यापैकी एकाने आमच्यासोबत येशूच्या पुनरुत्थानाचा* साक्षीदार होणं गरजेचं आहे.”

२३ म्हणून त्यांनी दोघांची नावे सुचवली, बर्सब्बा म्हटलेला योसेफ, ज्याला युस्त असेही म्हटले जायचे, आणि मत्थिया. २४ मग त्यांनी प्रार्थना केली आणि ते म्हणाले: “हे यहोवा,* तू सर्वांची अंतःकरणे जाणतोस. तेव्हा यांपैकी तू कोणाला निवडलं आहे ते आम्हाला दाखव. २५ म्हणजे, तो ते सेवाकार्य व प्रेषितपण हाती घेऊ शकेल, जे सोडून यहूदाने आपला मार्ग निवडला.” २६ तेव्हा त्यांनी त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यामुळे, त्या अकरा जणांसोबत त्याचाही प्रेषितांमध्ये समावेश करण्यात आला.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा