वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp21 क्र. ३ पृ. ३
  • एक चांगलं भविष्य—सगळ्यांचीच इच्छा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक चांगलं भविष्य—सगळ्यांचीच इच्छा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • थोडक्यात परिचय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • चांगलं भविष्य मिळवण्याचा मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • सत्कर्मं करत राहिल्यामुळे पुढे चांगलं आयुष्य जगता येईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • शिक्षण आणि पैसा चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
wp21 क्र. ३ पृ. ३
पालक आपल्या लहान मुलीसोबत बहरलेलं चेरीचं झाड पाहत आहेत.

एक चांगलं भविष्य—सगळ्यांचीच इच्छा

आपलं भविष्य चांगलं असावं असं सगळ्यांनाच वाटतं, नाही का? आपल्या सगळ्यांची हीच इच्छा असते, की आपल्या कुटुंबाने सुखासमाधानात राहावं, सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी असू नये.

पण अशा प्रकारचं भविष्य खरंच मिळवता येईल का, अशी शंका अनेकांना वाटते. कारण अचानक आलेली संकटं त्यांनी पाहिली आहेत. उदाहरणार्थ, कोव्हिड-१९ महामारीमुळे काय घडलं, हे त्यांनी पाहिलं आहे. अचानक लोकांचं जीवन विस्कळीत झालं, नोकरी-धंद्यावर त्याचा परिणाम झाला आणि अनेकांनी आपला जीव गमावला. त्यामुळे येणारे दिवस कसे असतील अशी चिंता अनेकांना भेडसावते.

त्यामुळे ते असं काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे त्यांचे येणारे दिवस चांगले असतील. त्यासाठी काही लोक दैवी शक्‍तींकडे  वळतात आणि नशिबात काय लिहिलंय, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. तर काही जण शिक्षणावर  आणि धनसंपत्तीवर  आपला विश्‍वास ठेवतात. या गोष्टी आपल्याला हवं ते मिळवून देतील असं त्यांना वाटतं. तर असेही काही जण आहेत ज्यांना असं वाटतं, की आपण सत्कर्मं  केली तर आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतील.

यापैकी कुठलाही पर्याय तुम्हाला चांगलं भविष्य मिळवून देईल का? याचं उत्तर मिळवण्यासाठी पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  • तुमचं भविष्य कशावर अवलंबून आहे?

  • शिक्षण आणि पैसा चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकतात का?

  • सत्कर्मं करत राहिल्यामुळे पुढे चांगलं आयुष्य जगता येईल का?

  • एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?

या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला टेहळणी बुरूज  मासिकाच्या या अंकात मिळतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा