वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 ऑगस्ट पृ. ३२
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • त्याने ईश्‍वरी मार्गदर्शन स्वीकारले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • गर्भवती पण अविवाहीत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • “पाहा! मी प्रभूची दासी!”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 ऑगस्ट पृ. ३२

वाचकांचे प्रश्‍न

येशूच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल मत्तयच्या अहवालामध्ये दिलेली माहिती ही लूकच्या अहवालापेक्षा वेगळी का आहे?

येशूच्या जन्माबद्दल आणि त्याच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल मत्तयच्या अहवालामध्ये दिलेली माहिती ही लूकच्या अहवालापेक्षा वेगळी आहे, कारण प्रत्येक लेखकाने एका वेगळ्या व्यक्‍तीच्या विचारांवर आणि अनुभवांवर लक्ष केंद्रित केलं आहे.

मत्तयचा अहवाल, योसेफशी संबंधित असलेल्या घटनांवर लक्ष केंद्रित करतो. मरीया गर्भवती आहे हे कळल्यावर योसेफची काय प्रतिक्रिया होती, देवदूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन या परिस्थितीबद्दल काय सांगितलं आणि त्याने कशा प्रकारे देवदूताच्या सूचनांचं पालन केलं, या सर्व घटनांचं वर्णन मत्तयच्या अहवालात करण्यात आलं आहे. (मत्त. १:१९-२५) तसंच, एका देवदूताने स्वप्नाद्वारे योसेफला आपल्या कुटुंबांसह मिसर देशात पळून जाण्याचा इशारा कसा दिला आणि त्याने त्याचं कसं पालन केलं याचंही वर्णन त्यात करण्यात आलं आहे. नंतर, देवदूताने कशा प्रकारे मिसर इथे योसेफला स्वप्नात पुन्हा दर्शन देऊन परत इस्राएल देशात जायला सांगितलं आणि त्यानुसार योसेफ कशा प्रकारे इस्राएल देशात निघून गेला आणि नासरेथ नावाच्या शहरात आपल्या कुटुंबासह राहण्याचा निर्णय त्याने घेतला, हे मत्तयच्या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. (मत्त. २:१३, १४, १९-२३) मूळ ग्रीक भाषेत, मत्तय शुभवर्तमानाच्या पहिल्या दोन अध्यायांत योसेफच्या नावाचा आठ वेळा उल्लेख करण्यात आला आहे, तर मरीयाचा फक्‍त चार वेळा.

पण, लूकच्या अहवालात मात्र मरीयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. गब्रीएल देवदूताने तिला दिलेलं दर्शन, तिने आपली नातेवाईक अलीशिबा हिला दिलेली भेट आणि यहोवाची केलेली स्तुती यांबद्दलचं वर्णन लूकच्या अहवालात करण्यात आलं आहे. (लूक १:२६-५६) तसंच, भविष्यात येशूला सोसाव्या लागणाऱ्‍या छळाबद्दल शिमोनने मरीयेला जे काही सांगितलं तेसुद्धा या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नंतर, येशू १२ वर्षांचा असताना आपल्या कुटुंबासह मंदिरात गेला त्या घटनेचा उल्लेख लूकच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे; इथेसुद्धा लूक, योसेफच्या नाही, तर मरीयाच्या शब्दांचा उल्लेख करतो. आणि या सर्व घटनांचा मरीयेच्या मनावर किती प्रभाव पडला याचं वर्णन करतो. (लूक २:१९, ३४, ३५, ४८, ५१) मूळ ग्रीक भाषेत, लूकने सांगितलेल्या शुभवर्तमानाच्या पहिल्या दोन अध्यायांत मरीयाच्या नावाचा बारा वेळा उल्लेख करण्यात आला आहे, तर योसेफचा फक्‍त तीन वेळा. यावरुन दिसून येतं, की मत्तयच्या शुभवर्तमानात योसेफच्या विचारांबद्दल आणि त्याने केलेल्या कार्यांबद्दल जास्त माहिती दिली आहे. पण, लूकच्या शुभवर्तमानात मरीयाचे विचार आणि तिला आलेल्या अनुभवांबद्दल जास्त माहिती दिली आहे.

त्याचप्रमाणे, या दोन्ही अहवालांत येशूच्या वंशावळीबद्दल वेगवेगळ्या याद्या दिल्या आहेत. मत्तयच्या यादीमध्ये, योसेफच्या वंशावळीबद्दल सांगितलं आहे. त्या यादीवरून दिसून येतं, की येशू हा योसेफचा दत्तक पुत्र होता आणि त्याला दावीदच्या राज्यावर कायदेशीर हक्क होता. असं आपण का म्हणू शकतो? कारण, योसेफ हा दावीद राजाचा पुत्र, शलमोन याच्या वंशावळीतला होता. (मत्त. १:६, १६) दुसरीकडे पाहता, लूकच्या अहवालात मरीयाच्या वशांवळीची यादी दिली आहे. आणि ती वशांवळी दाखवून देते, की येशू “शरीराने एक मनुष्य” असल्यामुळे त्याला दावीदच्या राज्यावर स्वाभाविक हक्क होता. (रोम. १:३) कारण, मरीया ही राजा दावीदचा पुत्र, नाथान याच्या वंशातली होती. (लूक ३:३१) मग लूकने दिलेल्या वंशावळीच्या यादीत, मरीया ही एलीची मुलगी आहे अशी माहिती का दिलेली नाही? कारण, सहसा जेव्हा वंशावळीची नोंद केली जायची तेव्हा फक्‍त कुंटुबातल्या पुरुषांच्या नावांचाच समावेश केला जायचा. त्यामुळे लूकने वंशावळीच्या यादीमध्ये, योसेफचा उल्लेख ‘एलीचा पुत्र’ असा केला तेव्हा त्याचा अर्थ योसेफ एलीचा जावई आहे हे लोकांनी समजून घेतलं.—लूक ३:२३.

लूक आणि मत्तय यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानांत येशूच्या कुटुंबाच्या वंशावळीची जी यादी दिली आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते; ती म्हणजे, येशू हाच प्रतिज्ञा केलेला मसीहा होता. येशू हा दावीदच्या वंशावळीतला होता ही गोष्ट इतकी स्पष्ट होती, की परूशी आणि सदूकी हेसुद्धा ती गोष्टी कधी नाकारू शकले नाहीत. लूक आणि मत्तय यांच्या शुभवर्तमानांत दिलेल्या येशूच्या कुटुंबाच्या वंशावळीमुळे आपला विश्‍वास भक्कम होतो आणि देवाने दिलेली इतर अभिवचने नक्कीच पूर्ण होतील यावरचा आपला भरवसाही बळकट होतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा