तळटीप
a अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्या भाऊबहिणींना तुम्ही असं म्हणताना ऐकलं असेल, की “माझं वय व्हायच्या आधीच मी नवीन जगात जाईन असं मला वाटलं होतं.” आपण सगळेच खरंतर नवीन जगाची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत, खासकरून या संकटाच्या काळात. पण आपल्याला धीर धरायची गरज आहे. म्हणून या लेखात आपण बायबलमधली अशी काही वचनं पाहू जी आपल्याला धीराने वाट पाहायला मदत करतील. त्याचबरोबर आपण अशा दोन परिस्थिती पाहू ज्यांत आपल्याला धीर धरायची गरज आहे. आणि शेवटी आपण हे पाहू, की जे धीर धरतात त्यांना भविष्यात कोणते आशीर्वाद मिळतील.