तळटीप
a आधीच्या लेखात आपण १ करिंथकर १५ व्या अध्यायाच्या काही भागावर चर्चा केली होती. आता या लेखात आपण उरलेल्या भागावर चर्चा करू या. यात खासकरून अभिषिक्त ख्रिश्चनांच्या पुनरुत्थानाबद्दल सांगितलं आहे. पण पौलने लिहिलेली ही माहिती पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असणाऱ्यांसाठीही महत्त्वाची आहे. हा लेख आपल्याला दोन गोष्टी समजायला मदत करेल. पहिली गोष्ट म्हणजे, पुनरुत्थानाच्या आशेवर जर आपला विश्वास असेल तर आज आपण कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. आणि दुसरी, या आशेमुळे भविष्यात आपल्याला आनंदी जीवन कसं मिळेल.