तळटीप
b “कीटावाला” हा स्वाहिली शब्द आहे ज्याचा अर्थ “वर्चस्व, मार्गदर्शन किंवा राज्य करणं” असा होतो. त्या चळवळीचा हेतू राजनैतिक होता; या चळवळीचं समर्थन करणाऱ्यांना बेल्जियमपासून विभक्त व्हायचं होतं. कीटावाला गटाने यहोवाच्या साक्षीदारांची साहित्यं मिळवली, त्याचा अभ्यास केला आणि त्यांचं वाटपही केलं. आपले वैयक्तिक राजनैतिक विचार, अंधविश्वासावर आधारित प्रथा आणि अनैतिक जीवनशैली यांचा त्यांनी बायबलमधल्या शिकवणींत समावेश केला. अशा प्रकारे त्यांनी सत्यात भेसळ केली.