तळटीप
b प्राध्यापक मार्विन पेट यांनी आपल्या लिखाणात असं सांगितलं: बरेच विद्वान असं मानतात की “आज” या शब्दाचा उपयोग करून येशूला म्हणायचं होतं की त्याच्या मृत्यूनंतर तो त्याच दिवशी किंवा २४ तासांच्या आत नंदनवनात असेल. हे प्राध्यापक पुढे म्हणतात: पण हा विचार बायबलमध्ये दिलेल्या इतर गोष्टींशी मेळ खात नाही. उदाहरणार्थ, बायबल म्हणतं की मृत्यूनंतर येशू कबरेत होता आणि त्यानंतर तो स्वर्गात गेला.—मत्त. १२:४०; प्रे. कार्ये २:३१; रोम. १०:७.