तळटीप
a यरीहोच्या भीतींच्या ढिगाऱ्यात पुरातत्व शास्त्रज्ञांना धान्याचा मोठा साठा सापडला. लोकांनी कापणी करून धान्य साठवून ठेवलं होतं पण ते वापरलं नव्हतं. ही गोष्ट बायबल अहवालाचं समर्थन करते. त्यात म्हटलं आहे, की वेढा फार कमी काळ होता आणि यरीहो शहराला लुटण्यासाठी इस्राएली लोकांना मनाई होती. कापणीचा हंगाम असल्यामुळे यरीहो शहर काबीज करण्याची ही चांगली वेळ होती कारण शेतात भरपूर अन्न होतं.—यहो. ५:१०-१२.