तळटीप
a येशू जेव्हा शेवटल्या दिवसांतील चिन्हांबद्दल सांगत होता तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना अनेक दाखले दिले. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की त्याने सर्वात आधी ‘विश्वासू व बुद्धिमान दासाचा’ उल्लेख केला. अभिषिक्त बांधवांनी बनलेला हा लहान गट देवाच्या लोकांचं नेतृत्व करणार होता. (मत्त. २४:४५-४७) त्यानंतर त्याने सर्व अभिषिक्त जनांना सूचित करणारे काही दाखले दिले. (मत्त. २५:१-३०) शेवटी, जे ख्रिस्ताच्या बांधवांना साहाय्य करतील आणि ज्यांना या पृथ्वीवर राहण्याची आशा असेल त्यांच्याबद्दल तो बोलला. (मत्त. २५:३१-४६) त्याच प्रकारे, जेव्हा यहेज्केलची भविष्यवाणी आपल्या काळात पूर्ण होऊ लागली तेव्हा ती सर्वात आधी स्वर्गात जगण्याची आशा असलेल्यांच्या बाबतीत लागू झाली. हे खरं आहे की इस्राएलचं दहा-वंशीय राज्य पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांना सूचित करत नाही. पण, या भविष्यवाणीत उल्लेखण्यात आलेली एकता आपल्याला अभिषिक्तांमध्ये आणि इतर मेंढरांमध्ये असलेल्या एकतेची आठवण करून देते.