तळटीप
a इ.स. ५५ साली जन्मलेला टॅसिटस यानं असं लिहिलं: “ख्रिस्तुस म्हणजे ख्रिस्त, याला टायबेरियसच्या शासन काळात एका अधिकाऱ्यानं अर्थात पंतय पिलाताने देहान्ताची शिक्षा दिली होती. ‘ख्रिस्तुस’ याच नावावरून ‘ख्रिस्ती’ किंवा ‘ख्रिश्चन’ ही नावं आली आहेत.” पहिल्या शतकातील स्यूटोनियस आणि यहूदी इतिहासकार जोसिफस यांनीदेखील येशूचा उल्लेख केला होता. तसंच, दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला बिथुनियाचा शासक धाकटा प्लिनी यानंही येशूचा उल्लेख केला होता.