तळटीप
a दाखल्यात, “पाहा, वर आला आहे!” अशी हाक येते (६ वं वचन) तेव्हापासून प्रत्यक्ष ‘वर’ येतो (१० वं वचन) तोपर्यंत मध्ये काही काळ जातो. अभिषिक्त जनांनी शेवटल्या काळाची सुरवात झाली तेव्हापासूनच जागृत राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी येशूच्या उपस्थितीचं चिन्ह ओळखलं आहे. त्यामुळे, देवाच्या राज्याचा राजा या नात्यानं तो आज स्वर्गात राज्य करत आहे याचीही त्यांना जाणीव आहे. तरीसुद्धा, तो प्रत्यक्ष येईपर्यंत त्यांनी जागरूक राहणं अतिशय महत्त्वाचं आहे.