तळटीप
a “निखाऱ्यांची रास” हा शब्दप्रयोग धातू शुद्ध करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या एका प्राचीन पद्धतीला सूचित करतो. या पद्धतीत धातू वितळण्यासाठी त्याच्या वर व खाली जळते निखारे ठेवले जात असत. यामुळे त्यातील अशुद्ध घटक नाहीसे होऊन शुद्ध धातू प्राप्त केला जात असे. आपल्यासोबत जे कठोरपणे वागतात त्यांच्याशी आपण प्रेमळपणे वागतो तेव्हा त्यांच्या स्वभावात नरमाई येऊन त्यांच्यातील चांगले गुण दिसून येतात.