तळटीप
a घरी आलेल्या पाहुण्यासाठी मेंढीच्या मटणाचे जेवण बनवणे ही आदरातिथ्य दाखवण्याची रीत होती. पण, मेंढरू चोरणे हा एक गुन्हा होता ज्याच्यासाठी चोरी करणाऱ्याला चौपट भरपाई द्यावी लागत होती. (निर्गम २२:१) दाविदाच्या नजरेत, मेंढरू घेणारा तो श्रीमंत मनुष्य निर्दयीपणे वागला होता. कारण, या मेंढीमुळे त्या गरीब माणसाच्या कुटुंबाला दूध व लोकर मिळाली असती. एवढेच नव्हे तर या मेंढीद्वारे तो आपला कळप वाढवू शकला असता, पण आता असे होणे शक्य नव्हते.