तळटीप
a प्रायश्चित्ताचे मूल्य, अर्पण केल्या जाणाऱ्या प्राण्याच्या रक्तात असल्यामुळे देव त्या रक्ताला पवित्र समजत होता. (लेवीय १७:११) याचा अर्थ, गरीब इस्राएली करीत असलेल्या सपीठाच्या अर्पणाला काही मूल्य नव्हते का? असे नाही. नम्र व स्वेच्छेने केल्या जाणाऱ्या या अर्पणांना यहोवा मौल्यवान समजत होता. शिवाय दर वर्षी येणाऱ्या प्रायश्चित्ताच्या दिवशी अर्पण केल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या रक्तामुळे संपूर्ण राष्ट्राच्या पापांचे ज्यात गरिबांच्या पापांचा देखील समावेश होतो, प्रायश्चित्त व्हायचे.—लेवीय १६:२९, ३०.