तळटीप
c इब्री भाषेतील “प्रचंड मत्स्य” या शब्दाचे ग्रीकमध्ये “समुद्री राक्षस,” किंवा “अवाढव्य मासा” असे भाषांतर करण्यात आले आहे. योनाला नेमक्या कोणत्या माशाने गिळले असावे हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी, अख्ख्या माणसाला गिळंकृत करू शकतील इतके मोठमोठे शार्क मासे भूमध्य समुद्रात असल्याचे पाहण्यात आले आहे. इतर ठिकाणी तर याहीपेक्षा मोठे शार्क आहेत. यांना व्हेल शार्क म्हणतात व ते १५ मीटर किंवा त्याच्यापेक्षा अधिक मोठे वाढू शकतात!