तळटीप
b योनाला किती गाढ झोप लागली होती यावर जोर देण्याकरता, सेप्ट्युजंट मध्ये, तो घोरू लागला होता, हा वाक्यांश आढळतो. यावरून, योना किती बेफिकीर होता, असा आपण निष्कर्ष काढू नये. कारण, कधीकधी जे खूप निराश झालेले असतात त्यांच्याही डोळ्यांवर खूप झोप असते, ही गोष्ट खरी असल्याचे आपण आणखी एका घटनेवरून सांगू शकतो. गथशेमाने बागेतील येशूच्या मृत्यूच्या काही तासाआधी त्या तणावपूर्ण काळात, पेत्र, याकोब व योहान ‘खिन्न झाल्यामुळे झोपी गेले होते.’—लूक २२:४५.