तळटीप
a योनाचा जन्म एका गालीली शहरात झाला होता, ही गोष्ट उल्लेखण्याजोगी आहे. कारण, परूशी अगदी तोंड वर करून येशूविषयी असे म्हणाले होते: “शोध करुन पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.” (योहान ७:५२) अनेक भाषांतरकार व संशोधक असे म्हणतात, की गालीलातून कोणी संदेष्टा आजपर्यंत आला नाही व पुढेही येणार नाही, असे परुशी मोघमपणे बोलले होते. हे लोक खरोखरच मोघमपणे बोलत असतील तर याचा अर्थ ते इतिहास तसेच भविष्यवाणी यांच्याकडे कानाडोळा करत होते.—यशया ९:१, २.