तळटीप
c काही विद्वानांच्या मते, चिमण्या भूमीवर पडतात म्हणजे त्या मरतात, एवढेच सूचित होत नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की मूळ भाषेत या ठिकाणी वापरलेला शब्दप्रयोग चिमण्यांचे अन्न शोधण्यासाठी जमिनीवर बसण्याला सूचित करते. जर खरोखरच असा अर्थ असेल, तर मग यावरून असा निष्कर्ष काढता येईल की हा लहानसा पक्षी मरतो तेव्हाच नाही, तर त्याच्या दैनंदिन कार्यांतही देव त्याची दखल घेतो, त्याची काळजी वाहतो.—मत्तय ६:२६.