तळटीप
a शास्त्रवचनांत, “द्वेष” या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. काही संदर्भांत त्याचा अर्थ केवळ तुलनेत कमी प्रीती करणे असा होतो. (अनुवाद २१:१५, १६) “द्वेष” तीव्र नापसंती देखील सूचित करू शकतो, ज्यात द्वेष केल्या जाणाऱ्या व्यक्तीचे काही नुकसान करण्याचा इरादा नसतो, केवळ तिच्याबद्दल किळस वाटत असल्यामुळे तिला टाळण्याचा प्रयत्न केला जातो. पण “द्वेष” या शब्दाचा अर्थ तीव्र शत्रूभाव, जुने वैमनस्य आणि त्यासोबत हानी करण्याची दुष्टबुद्धी असाही होऊ शकतो. या लेखात द्वेष हा शब्द या अर्थाने वापरला आहे.