तळटीप
c कुलपित्यांच्या काळात प्रत्येक घराण्याचा प्रमुख देवापुढे आपल्या पत्नी व मुलांचा प्रतिनिधी होता; त्यांच्यावतीने तो बलिदानेही अर्पण करत असे. (उत्पत्ति ८:२०; ४६:१; ईयोब १:५) पण नियमशास्त्र स्थापित करण्यात आल्यानंतर यहोवाने अहरोनाच्या घराण्यातील पुरुषांना याजक नेमले आणि लोकांना त्यांच्याद्वारे बलिदाने अर्पण करण्यास सांगण्यात आले. सदर घटनेतील २५० बंडखोर हा फेरबदल अंमलात आणण्यास तयार नव्हते असे दिसते.