तळटीप
a आज यहुदी धर्म ज्या स्वरूपात अस्तित्वात आहे त्यासाठी परुशी लोक बहुतकरून जबाबदार आहेत; यास्तव, अनेक अतिरिक्त शब्बाथ निर्बंधांतून यहुदी धर्म आजतागायत पळवाटा शोधतो यात काहीही नवल नाही. उदाहरणार्थ, शब्बाथाच्या दिवशी एखाद्या ऑर्थोडॉक्स यहुदी इस्पितळास भेट देणाऱ्याला दिसून येईल की यात्रेकरूंना लिफ्टची कळ दाबण्याचे पापमय “काम” करण्याचे टाळता यावे म्हणून, येथील लिफ्ट प्रत्येक मजल्यावर आपोआप थांबते. काही ऑर्थोडॉक्स डॉक्टर अशा शाईने औषधोपचार लिहून देतात जी काही दिवसांनी उडून जाईल. का बरे? कारण मिश्ना, लिहिणे याचे “काम” याअर्थी वर्गीकरण करते पण ते “लिहिणे” याची व्याख्या कायमची खूण सोडणे या शब्दांत करते.