तळटीप
e यरुशलेमच्या बाहेर केरकचरा जाळण्याची जागा. प्राचीन यरुशलेमच्या दक्षिण-पश्चिमेला असलेल्या ‘हिन्नोम खोऱ्याचं’ ग्रीक नाव. अनेकांना वाटतं, की गेहेन्ना हे असं एक अदृश्य ठिकाण आहे जिथे मेलेल्या व्यक्तीला कायम यातना देण्यासाठी खरोखरच्या आगीत टाकलं जातं. पण, गेहेन्नामध्ये प्राण्यांना किंवा माणसांना जिवंत जाळलं जायचं किंवा यातना दिल्या जायच्या याचा कोणताही पुरावा नाही. म्हणूनच, गेहेन्ना हे कायम यातना देण्यासाठी असलेल्या आगीच्या ठिकाणाला सूचित करत नाही. याउलट, येशूने आणि त्याच्या शिष्यांनी जेव्हा गेहेन्नाचा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी तो कायमच्या नाशाला सूचित करण्यासाठी केला.