वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 सप्टेंबर पृ. ३२
  • नवनवीन गोष्टी शिकून घ्यायच्या इच्छेने अभ्यास करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवनवीन गोष्टी शिकून घ्यायच्या इच्छेने अभ्यास करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपल्या लोकांची काळजी घेतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • यहोवानं केलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींतून पुरेपूर लाभ मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाच्या वचनात आनंद मिळविणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • राजांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 सप्टेंबर पृ. ३२

अभ्यास करण्यासाठी एक टीप

नवनवीन गोष्टी शिकून घ्यायच्या इच्छेने अभ्यास करा

अभ्यासाची तयारी करत असताना कदाचित आपल्या मनात असा प्रश्‍न येईल, की ‘मला यातून काय शिकायला मिळेल?’ पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला अमुक एक गोष्ट शिकायला मिळेल असं आपल्याला वाटत असलं, तरी आपण तेवढ्यावरच समाधानी नाही राहिलं पाहिजे. तर यहोवा आपल्याला आणखी कोणकोणत्या नवीन गोष्टी शिकवतोय त्यावरही आपलं लक्ष असलं पाहिजे. मग अभ्यास करताना आपण नवनवीन गोष्टी शिकून घ्यायचा प्रयत्न कसा करू शकतो?

बुद्धीसाठी प्रार्थना करा. आपण आत्ता काय शिकून घ्यावं अशी यहोवाची इच्छा आहे हे समजून घ्यायला त्याला प्रार्थना करा. (याको. १:५) तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींवरच अवलंबून राहू नका.—नीति. ३:५, ६.

देवाच्या वचनाला तुमच्यावर कार्य करू द्या. कारण “देवाचं वचन जिवंत” आहे. (इब्री ४:१२) आपण जेव्हा-जेव्हा देवाचं जिवंत “वचन” वाचतो, तेव्हा-तेव्हा आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत होऊ शकते. पण देव जे शिकवतोय ते आपण शिकून घेतलं पाहिजे. ही मनोवृत्ती जर आपण ठेवली तरच देवाच्या वचनाचा आपल्यावर प्रभाव पडू शकतो.

यहोवाच्या मेजावर असलेल्या सर्व गोष्टींची कदर करा. तो देत असलेलं आध्यात्मिक अन्‍न ‘उत्तम अन्‍नपदार्थांच्या मेजवानीसारखं’ आहे. (यश. २५:६) आपल्याला हा ‘अन्‍नपदार्थ’ इतका काही आवडणार नाही म्हणून तो खायचं टाळू नका. कारण त्याचा तुम्हाला फक्‍त फायदाच होणार नाही, तर देव जे पुरवतोय त्याच्यामुळे तुम्हाला खूप आनंदही होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा