वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. १३
  • कुटुंबातल्या सदस्यांवर प्रेम करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुटुंबातल्या सदस्यांवर प्रेम करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • टिकाऊ विवाहाकरता दोन गुरुकिल्ल्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. १३
एक कुटुंब सभेत एकत्र मिळून गीत गात आहे.

ख्रिस्ती जीवन

कुटुंबातल्या सदस्यांवर प्रेम करा

प्रेम एक अशी गोष्ट आहे, जी कुटुंबातल्या सदस्यांना एकत्र बांधून ठेवते. प्रेम नसेल, तर कुटुंबात एकी राहणार नाही आणि कुटुंबातले सदस्य एकमेकांची साथ देणार नाहीत. तर मग पती-पत्नी आणि आईवडील कुटुंबात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काय करू शकतात?

आपल्या पत्नीवर प्रेम करणारा पती, तिच्या गरजा पूर्ण करतो आणि तिच्या भावनांचा विचार करतो. (इफि ५:२८, २९) तो आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्याही सर्व गरजा पूर्ण करतो, त्यांना यहोवासोबत जवळचं नातं टिकवून ठेवायला मदत करतो आणि दर आठवड्याला कौटुंबिक उपासनाही घेतो. (१ती ५:८) जी पत्नी आपल्या पतीवर प्रेम करते, ती त्याच्या अधीन राहते आणि त्याचा “मनापासून आदर” करते. (इफि ५:२२, ३३; १पेत्र ३:१-६) पती-पत्नी नेहमी एकमेकांना माफ करायला तयार असतात. (इफि ४:३२) जे आईवडील आपल्या मुलांवर प्रेम करतात, ते आपल्या प्रत्येक मुलाची काळजी घेतात आणि त्यांना यहोवावर प्रेम करायला शिकवतात. (अनु ६:६, ७; इफि ६:४) ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की शाळेत मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्यावर दबाव येतो तेव्हा त्याचा सामना ते कसा करतात? कुटुंबात प्रेम असतं तेव्हा सर्व सदस्यांना सुरक्षित वाटतं.

कुटुंबात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • “कुटुंबात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा” या ह़डिओतलं एक दृश्‍य. सभेतून घरी आल्यावर पती-पत्नी बायबलमधल्या एका वचनावर चर्चा करत आहेत.

    एक प्रेमळ पती कसं दाखवू शकतो, की त्याला आपल्या पत्नीच्या भावनांची काळजी आहे?

  • “कुटुंबात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा” या ह़डिओतलं एक दृश्‍य. सभेतून घरी आल्यावर एक बहीण सत्यात नसलेल्या आपल्या पतीचं धीराने ऐकून घेत आहे.

    एक प्रेमळ पत्नी आपल्या पतीचा “मनापासून आदर” कसा करू शकते?

  • “कुटुंबात कधीही नाहीसं न होणारं प्रेम दाखवत राहा” या ह़डिओतलं एक दृश्‍य. एक कुटुंब स्नॅक्स खात-खात सभेत शिकलेल्या गोष्टींवर आनंदाने चर्चा करत आहे.

    जे आईवडील आपल्या मुलांवर प्रेम करतात ते त्यांना देवाच्या वचनानुसार वागायला कसं शिकवू शकतात?

टेक्नॉलॉजीचा वापर करताना सावधगिरी बाळगा

मोबाईल फोन, टॅब यांसारख्या गोष्टींमध्ये आपला बराच वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कुटुंबासोबत वेळ घालवता येणार नाही. म्हणून मुलांनी अशा गोष्टींसाठी किती वेळ द्यावा, हे पालकांनी ठरवलं पाहिजे. यासोबतच मुलं जर लहान असतील तर पालकांनी याचाही विचार केला पाहिजे, की मुलांनी इंटरनेटचा वापर करणं योग्य राहील का आणि जर ते करत असतील, तर ते कोणाशी बोलू शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा