देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ८७-९१
सर्वसमर्थाच्या गुप्त स्थळी वस्ती करा
आज आपल्याला यहोवाच्या “गुप्त स्थली” आध्यात्मिक रीत्या संरक्षण मिळतं
या गुप्त स्थळी राहण्यासाठी आपण समर्पण करणं आणि बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे
ज्या लोकांना देवावर भरवसा नाही त्यांना या स्थळाबद्दल माहीत नाही
जे या गुप्त स्थळी राहतात, ते कुठल्याही व्यक्तीमुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे देवावरील आपलं प्रेम व विश्वास कमी होऊ देत नाही
‘पारधी’ आपल्याला पाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो
पक्षी खूप सावध असतात आणि त्यांना जाळ्यात पकडणं सोपं नसतं
पारधी पक्ष्यांच्या सवयींचं नीट निरीक्षण करतो आणि त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतो
सैतानसुद्धा ‘पारध्याप्रमाणे’ यहोवाच्या लोकांचं निरीक्षण करतो आणि त्यांची आध्यात्मिक हानी करण्यासाठी धूर्तपणे फासे रचतो
सैतान वापरत असलेले चार घातक फासे:
मनुष्याचे भय
भौतिकवाद
हानिकारक मनोरंजन
आपसांतील मतभेद