स्मारकविधीकरता सूचना
स्मारकविधीच्या तयारीकरता वडिलांनी पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे:
▪ सभेची वेळ ठरवताना सूर्यास्त होण्यापूर्वी बोधचिन्हे फिरवली जाणार नाहीत याची खात्री करावी.
▪ उचित प्रकारची भाकर आणि द्राक्षारस तयार ठेवला जावा.—टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, २००३, पृष्ठे १४-१५ पाहा.
▪ प्लेट्स, ग्लासेस, टेबल आणि टेबल क्लॉथ या सर्व वस्तू आधीच सभागृहात आणून योग्य ठिकाणी ठेवल्या जाव्यात.
▪ राज्य सभागृहाची किंवा ज्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे त्या ठिकाणाची नीट साफसफाई आधीच करण्यात यावी.
▪ सेवकांची तसेच बोधचिन्हे फिरवणाऱ्या बांधवांची आधीच निवड करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल, त्या योग्य पद्धतीने पार पाडण्याबद्दल तसेच उचित वेशभूषा व केशभूषा यांविषयी सूचना देण्यात याव्यात.
▪ आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे कोणी अभिषिक्त जन समारंभाला हजर राहू शकत नसल्यास, त्यांना बोधचिन्हे देण्याची व्यवस्था केली जावी.
▪ एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच सभागृह वापरणार असल्यास प्रतिक्षालय, प्रवेशमार्ग, सार्वजनिक पादचारी मार्ग आणि वाहन तळे यांठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सर्व मंडळ्यांनी एकमेकांना सहयोग द्यावा.
▪ सभेसाठी दुसरे ठिकाण वापरले जाणार असेल तर तेथे योग्य साऊंड सिस्टिम आहे याची खात्री करावी जेणेकरून उपस्थित असलेल्या सर्वांना वक्त्याचे भाषण नीट ऐकता येईल.